डोळ्यात काही विकार नसताना आणि नंबर चष्मा देऊन दुरूस्त केला तरी डोळ्याची नजर कमी होणे यालाच ‘आळशी डोळा’ असे म्हणतात. आळशी डोळा हा विकार बालपणीच होतो. लहान मुलांमध्ये दृष्टी तयार होण्याची प्रक्रिया नऊ वर्षापर्यंत होते. जेवढे वय लहान तेवढीच हा विकार होण्याची शक्यता अधिक असते.

आणखी वाचा : Health special: वृद्धत्व व त्वचारोग

woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण

डोळा आळशी कशामुळे होतो?

  • तिरळेपणा
  • दोन डोळ्यातील चष्म्याच्या नंबरमधील तफावत.
  • जन्मजात मोतीबिंदू
  • पापणी पडणे

आणखी वाचा : Health special:आपल्या शरीराला किती कॅलरीज लागतात? कसे ओळखणार?

डोळा आळशी का होतो?

जेव्हा दोन डोळ्यांमधील चष्म्याच्या नंबरमध्ये तफावत असते, तेव्हा जास्त नंबर असलेल्या डोळ्याकडून अस्पष्ट
प्रतिमा मेंदूकडे पाठविली जाते. तिरळेपणामध्ये एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळ्या प्रतिमा दोन्ही डोळ्यांकडून मेंदूस
पाठविल्या जातात. त्यामधील तिरळ्या असलेल्या डोळयाकडून येणारी प्रतिमा ही आपोआपच दुर्लक्षित होते व तिरळा
असणारा डोळा आळशी होतो. ही अस्पष्ट प्रतिमा मेंदू दुर्लक्षित करतो त्यामुळे त्या डोळ्याची दृष्टी कमी होते व
डोळा आळशी होतो.

आणखी वाचा : Health special: वृद्धांना उन्हाळा अधिक का बाधतो?

त्वरित उपचार न केल्यास हा रोग कायमचा जडतो व नंतर कोणतीही उपाययोजना करून दृष्टी परत मिळवता येत
नाही. या विकारावर उपचाराचे चांगले परिणाम मिळण्यासाठी रुग्णाचा व रुग्णाच्या नातेवाईकांचा योग्य प्रतिसाद आवश्यक
असतो.
आळशी डोळ्यावर उपचार कसे करावेत?
लवकर निदान झाल्यास व लवकर उपचार केल्यास हा विकार बरा होऊ शकतो.
१) आळशी डोळा या विकारावरील सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे रुग्णाच्या आळशी डोळ्याकडूनच काम
करून घेणे आवश्यक असते. चांगली दृष्टी परत मिळविण्यासाठी सामान्य (काम करणारा) डोळा पट्टी लावून
झाकणे (पॅचिंग) व आळशी डोळ्याकडून काम करून घेणे, हा महत्त्वाचा उपाय आहे.
२) रुग्णांस दृष्टीदोष असल्यास योग्य नंबरचा चष्मा देणे.
३) आळशी डोळा व तिरळेपणा एकत्र असल्यास शस्त्रक्रिया केली जाते.
४) सामान्य डोळ्यास पट्टी लावून ठेवण्याच्या प्रक्रियेस ‘डोळाबंद’ असे म्हणतात. ही प्रक्रिया रुग्णाच्या
वयोमानानुसार व विकाराच्या तीव्रतेनुसार काही तास किंवा काही दिवसांसाठी केली जाते.
५) पट्टी लावणाऱ्या (पॅचिंग केलेल्या) रुग्णांचा, पाठपुरावा हा नेत्रतज्ज्ञांकडून ठरावीक कालावधी नंतर होणे गरजेचे
असते.
६) पट्टी लावून ठेवण्याच्या (पॅचिंगच्या) प्रक्रियेस सुरुवातीला मुलं प्रतिसाद देत नाहीत; परंतु दृष्टीत सुधारणा होत
राहिल्याने या प्रक्रियेचा स्वीकारही वाढत जातो.
७) लहान मुलांमध्ये सुरुवातीस थोडा काळच पॅचिंग केले जाते. नंतर चांगल्या परिणामांसाठी त्याचा कालावधी
हळूहळू वाढवला जातो.
८) पॅच हा डोळ्यावर चेहऱ्यालाच लावला जातो.
९) चष्मा वापरणाऱ्या रुग्णांमध्येही हा पॅच चष्म्याला न लावता डोळ्यावरच लावला जातो.
एकूणात उपचारांची दिशा योग्य असेल तर या विकारावर कष्टपूर्वक मात करता येते.