एके दिवशी पंचविशीचा एक रुग्ण माझ्या दवाखान्यात आला व म्हणाला ” डॉक्टर बघाना, मला वर्षातून जवळजवळ दोनदा हे शिबं उठतं. कधी कधी ट्रीटमेंट शिवायही निघूनही जातं. पण परत येतं. काय करावं कळत नाही “. तो बोलत होता ते खरंच होतं. शिबं किंवा सुरमा किंवा हिंदीमध्ये त्याला सिहुवा म्हणतात; हा एक बुरशीजन्य त्वचारोग आहे. या बुरशीचे शास्त्रीय नाव Malassezia Furfur असे आहे व शिब्याला वैद्यकीय परिभाषेत Pityriasis Versicolor असे म्हणतात. ते एक संधीसाधू इन्फेक्शन आहे. ज्या ठिकाणी वातावरण दमट व गरम असते अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यातही त्वचा तेलकट व घामट असते अशांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
हा बुरशीजन्य रोग असला तरी हा फारसा संसर्गजन्य रोग म्हणता येणार नाही. कारण हे जंतू वातावरणात नेहमीच असतात व जेव्हा त्यांच्या वाढीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते आपलं रूप दाखवतात. जे लोक किनारपट्टीजवळ राहतात त्यापैकी काहींना वर्षातून साधारण दोनदा म्हणजे मार्च-एप्रिल-मे महिना व ऑक्टोबर हिट या काळात हा आजार परत परत उद्भवण्याची शक्यता असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा