Health Special जन्मापासून अखेरच्या श्वासाबरोबर साथसंगत करणारा पोटातील गॅस ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण दीर्घकाळ राहिल्यास पोट फुगण्याचा त्रास, सतत ढेकर येणे, वात सुटत राहतो आणि पोटातून आवाज येत राहणे असे अनेक त्रास होत राहतात. कोणताही आजार टाळण्यासाठी आहार हा आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा पहिला महत्त्वाचा मार्ग असतो. शिवाय, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. संतुलित आणि पौष्टिक आहार घेतल्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत राहते, शरीरातील अवयव योग्यरित्या कार्य करतात आणि शरीर निरोगी ठेवण्यात मदत होते. योग्य आहाराच्या निवडीने आपण अनेक सामान्य आणि गंभीर आजार टाळू शकतो. त्यात पोटात वायू होणे या समस्येचाही समावेश आहे.

पोटात वायू जमा होणे ही एक सामान्य समस्या आहे ज्याचा अनुभव अनेकांना येतो. ही समस्या तात्पुरती असू शकते किंवा काही वेळा सतत त्रास देणारी ठरू शकते. योग्य उपचार आणि उपाय यांसह जीवनशैलीत बदल करून आपण या समस्येवर नियंत्रण मिळवू शकतो. चला तर, पोटातील वायूची कारणे, लक्षणे आणि यावर उपायांबद्दल सविस्तर माहिती घेऊ.

yoga poses to relieve gas
Health Special: पोटातील गॅसवर योगासनांचा जालीम उपाय; नेमके काय कराल? – भाग २
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह ‘या’ राशींवर होणार धन-सुखाचा वर्षाव, तुमच्यावर असणार का लक्ष्मीची कृपा? वाचा राशिभविष्य
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What is A B form Why A B form so important during elections
ए. बी. फॉर्म म्हणजे काय? या फॉर्मला निवडणूक काळात इतके महत्त्व का?

हेही वाचा >>>Health Special: आर्थरायटिसमुळे शरीरात काय बदल होतात?

पोटातील वायूंची कारणे

अ) अयोग्य आहार: अयोग्य आहार आणि काही विशिष्ट खाद्यपदार्थ वायू निर्माण करतात. अति तेलकट, मसालेदार किंवा जंक / फास्ट फूड अशा अन्नपदार्थांमध्ये असलेल्या घटकांमुळे पोटात वायू जमा होतो. फास्ट फूडमध्ये असणारे कृत्रिम रंग, चव आणि प्रिझर्व्हेटिव्हज पचन प्रक्रियेला त्रासदायक ठरतात. कोबी, कांदा, मुळा, सोयाबीन, बीन्स, मटर, राजमा हे पदार्थ पचनासाठी जड असतात आणि यांच्यामुळे पोटात वायू निर्माण होतो.

लॅक्टोज असलेले दुग्धजन्य पदार्थ: काही जणांना लॅक्टोज पचवण्यास त्रास होतो, ज्यामुळे पोटात गॅस जमा होतो.

ब) खाण्याच्या सवयी: खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटात वायू जमा होऊ शकतो.

जलद खाणे: खाण्याची गती वाढवल्याने हवाही पोटात जाते, ज्यामुळे वायू तयार होतो. बोलताना खाणे, खाण्याच्या वेळेस बोलणे किंवा हसणे यामुळे देखील पोटात वायू जमा होऊ शकतो.

चावणे /चघळण्याचा अभाव: अन्न नीट न चावल्याने व चघळल्याने पचन योग्य

प्रकारे होत नाही आणि वायू तयार होतो.

क) जीवनशैली: शरीरात शिरणारा आळस, व्यायामाच्या आवश्यकतेबद्दल उदासीनता व अज्ञान. 

बसून राहण्याची सवय: सतत एका जागी बसून राहिल्यास पचनसंस्थेचे कार्य मंद होते, ज्यामुळे पोटात वायू तयार होतो.

व्यायामाचा अभाव: शारीरिक हालचाल नसल्यामुळे पचनक्रिया नीट होत नाही, ज्यामुळे पोटात वायू साचतो.

तणावग्रस्त जीवन: मानसिक तणाव पचनसंस्थेवर परिणाम करतो, ज्यामुळे वायूची समस्या वाढू शकते.

ड) वैद्यकीय कारणे:  पचनसंस्थेचे विकार (इर्रिटेबल बॉवेल सिन्ड्रोम, GERD गॅस्ट्रो इसोफेगल डिसीज

ज्यात पोटातील आम्ल अन्ननलिकेत येते ): पचनाशी संबंधित विकार असल्यास पोटात वायूची समस्या होऊ शकते.

काही औषधांचे दुष्परिणाम: काही औषधे पचनसंस्थेवर दुष्परिणाम करतात, ज्यामुळे वायू तयार होतो.

आंत्रातील जीवाणूंचे असंतुलन: पचनसंस्थेत असलेल्या चांगल्या जीवाणूंचा अभाव किंवा असंतुलन वायूची समस्या निर्माण करते.

हेही वाचा >>>Health Special: पावसाळ्यातील कोणते पाणी प्यावे? कोणते पिऊ नये?

पोटातील वायूंची लक्षणे

 पोटात फुगवटा येणे: पोटात हवा साठल्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते.

 पोटात दुखणे किंवा अस्वस्थता: पोटात ताण जाणवणे, पोटदुखी किंवा अस्वस्थता होणे.

 ढेकर येणे: पोटातील वायू तोंडातून बाहेर पडणे म्हणजेच ढेकर येणे.

 वायू बाहेर पडणे: मलद्वारातून वायू बाहेर पडणे हे या समस्येचे सामान्य लक्षण आहे.

 पोटात गुडगुड आवाज येणे: पोटात वायू असल्याने गुडगुड आवाज येणे.

 भूक मंदावणे: पोटात फुगवटा असल्यामुळे भूक कमी होते.

पोटातील वायू नियंत्रित करण्याचे उपाय

अ) आहारात बदल:

 संतुलित आहार: पोटातील वायू टाळण्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. फायबरयुक्त अन्न, ताज्या फळांचा समावेश आहारात करा. फळे आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे, फायबर, आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक

प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

 संत्र, लिंबू, आवळा, आणि बेरीसारखी फळे: या फळांमध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते, जे प्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दी, फ्लू, इन्फेक्शनसारखे आजार टाळण्यास मदत करते.

 पालेभाज्या: पालक, मेथी, कोथिंबीर, ब्रोकली यांसारख्या पालेभाज्यांमध्ये लोह,

कॅल्शियम, आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या भाज्या आपल्या रक्तातील पोषक तत्वांची पूर्तता करतात आणि शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवतात.

काकडी, गाजर आणि प्रोबायोटिक्स

 काकडी, गाजर, बीटसारख्या भाज्या: यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

 प्रोबायोटिक्स: दही, ताक, आणि इतर किण्वलेले पदार्थ खाणे लाभदायक ठरते.

 वायू निर्माण करणारे पदार्थ टाळा: बीन्स, सोयाबीन, कोबी, मुळा, आणि अत्यधिक तेलकट पदार्थ कमी खा.

 पूर्ण धान्य (Whole Grains):पूर्ण धान्यांमध्ये फायबर, बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, आणि लोह भरपूर प्रमाणात असतात. हे घटक आपल्या शरीराची ऊर्जा पूर्तता करतात आणि अनेक आजारांपासून संरक्षण करतात. ओट्स, बाजरी, ज्वारी, गहू, नाचणी या धान्यांमुळे हृदयाच्या आरोग्याचे रक्षण होते, पचन सुधारते, आणि मधुमेह, उच्च रक्तदाब टाळण्यास मदत होते.

 प्रथिने आपल्या शरीरातील स्नायू, त्वचा, केस, आणि इतर अवयवांच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी अत्यावश्यक असतात. प्रथिने मिळवण्यासाठी खालील पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. डाळी, कडधान्ये, सोयाबीन, तूर, मूग:

शाकाहारींसाठी प्रथिनांचा मुख्य स्रोत आहेत. प्रथिने शरीरातील पेशींच्या दुरुस्तीचे काम करतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. 

अंडी, मासे, कोंबडीचे मांस:

प्रथिनांसोबतच हे अन्न ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स, आणि जीवनसत्त्वे पुरवतात, जे हृदय आणि मेंदूसाठी लाभदायक असतात.

 फायबर पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रित ठेवते आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. संपूर्ण धान्ये, पालेभाज्या, फळे, बियाणे यामध्ये असलेले फायबर आतड्यांची कार्यक्षमता सुधारते आणि बद्धकोष्ठता, डायबिटीज, आणि हृदयविकार टाळण्यास मदत करते.

 पाणी प्या: दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. नारळपाणी, ताक, सूप, फळांचे रस  हे द्रवपदार्थ शरीरातील पोषण आणि हायड्रेशनला चालना देतात.

 ताजे आणि स्थानिक अन्न शरीराला पोषक ठरते. परदेशी महागड्या आणि शरीराला नवीन पदार्थांपेक्षा स्थानिक फळे आणि भाज्य, ताजे अन्न आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्यास अधिक सक्षम असते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

चहा – कॉफी अतिसेवन टाळा

 चहा आणि कॉफी यांचे अतिसेवन घातक ठरते. त्याऐवजी  हर्बल चहा आणि नैसर्गिक पेय रोगप्रतिकारशक्ती सुधारतात आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात.

 हळदीचा चहा, आले-पुदीना चहा, ग्रीन टी: यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

ब ) स्वयंपाकघरातील उपयुक्त पदार्थ –

प्राचीन औषधप्रणालीमध्ये वापरण्यात येणारे अनेक पदार्थ ज्यात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

 आवळा, हळद, आले, लसूण, तुळस: ह्या पदार्थांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून दूर ठेवतात.

 मेथीचे दाणे, अलसीच्या बिया, चिया सीड्स: हे ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सचा चांगला स्रोत आहेत, ज्यामुळे हृदय आणि मेंदू निरोगी राहतात.

 नट्स आणि बियाणे -हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त असतात आणि यामध्ये प्रथिने, फायबर, आणि हेल्दी फॅट्स असतात. बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयविकारांचा धोका कमी करतात.

 आळशीचे दाणे, सूर्यफुलाच्या बिया, चिया सीड्स: यामध्ये फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स असतात, ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते.

 ताजे आणि स्थानिक अन्न शरीराला पोषक ठरते. परदेशी महागड्या आणि शरीराला नवीन पदार्थांपेक्षा स्थानिक फळे आणि भाज्य, ताजे अन्न आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्यास अधिक सक्षम असते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

क ) खाण्याच्या सवयीत सुधारणा:

 हळूहळू खा आणि चांगले चघळा: अन्न नीट चघळल्यास पचन व्यवस्थित होते आणि वायू निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

 नियमित वेळेवर जेवण करा: ठराविक वेळेवर नियमित जेवण केल्याने पचनसंस्था नीट काम करते.

 छोटे आहार घ्या: मोठ्या प्रमाणात एकाच वेळी खाण्याऐवजी छोटे-छोटे आहार घेणे अधिक चांगले.

ड ) जीवनशैलीत बदल:

 नियमित व्यायाम: चालणे, जॉगिंग, योगा यासारखा नियमित व्यायाम पोटातील वायू कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो.

 तणाव कमी करा: ध्यान, योगा, श्वासोच्छवासाचे व्यायाम तणाव कमी करतात.

 पुरेशी झोप घ्या: चांगली झोप आरोग्यासाठी आवश्यक आहे. झोपेचा अभाव पचनावर परिणाम करू शकतो.

 धूम्रपान आणि मद्यपान टाळा: धूम्रपान आणि मद्यपानामुळे पचनसंस्था कमकुवत होते.

इ) घरगुती उपाय:

 पुदीना व आले, बडीशेप  चहा: या औषधी वनस्पती पोटातील वायू कमी करण्यास मदत करतात.

 जिरे, धणे, वेलची, हिंग : हे घटक पचन सुधारण्यासाठी उपयुक्त असतात

 गरम पाण्याने पोटावर शेक: पोटातील वायू कमी करण्यासाठी गरम पाण्याने शेक द्या.

 ओवा अर्क किंवा थोडा ओवा चावून खाणे व कोमट पाणी पिणे. 

इ) औषधोपचार:

 अँटासिड किंवा गॅस-प्रतिरोधक औषधे: डॉक्टरांच्या सल्ल्याने गॅस कमी करण्यासाठी औषधे घ्या.

 वैद्यकीय सल्ला घ्या: लक्षणे तीव्र असतील किंवा सुधारणा होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

४. महत्त्वाचे मुद्दे:

 पोटातील वायू ही सामान्य समस्या आहे: त्याबद्दल लाज वाटून घेऊ नका.

 सतत लक्षणे राहिल्यास: सतत किंवा गंभीर लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 वैयक्तिक निरीक्षण: आपल्या शरीराला कोणते पदार्थ मानवतात हे ओळखा आणि त्यानुसार आहारात बदल करा.

 स्वच्छता आणि आरोग्य: आपली स्वच्छता राखणे आणि शरीराचे आरोग्य राखणे महत्वाचे आहे.

 सकारात्मक दृष्टिकोन: योग्य काळजी घेऊन या समस्येवर सहज मात करता येते.

Story img Loader