Health Special वर्तमानपत्रात येणाऱ्या अनेक बातम्या मनाचा थरकाप उडवणाऱ्या असतात. पार्किंगवरून भांडण झाले आणि एकाने दुसऱ्याला भोसकले, भाजी आणायला म्हणून बाहेर पडलेल्या बाईला एका मोटरसायकलने उडवले, मित्रमंडळींनी एका मित्राचे अपहरण केले आणि पैशाची मागणी केली, भर रस्त्यामध्ये कोणाची हत्या झाली, अचानक एक गट एकत्र येऊन तोडफोड करू लागला अशा अनेक बातम्या वर्तमानपत्रांमध्ये तर येतातच; तसेच दृकश्राव्य माध्यमांमधूनही त्यांचा सतत मारा होत असतो. विशेषतः टीव्हीवरच्या किंवा सोशल मीडियातल्या बातम्यांमध्ये विस्तृत दृश्य दाखवणारे अनेक व्हिडिओ असतात. या सगळ्यामधून मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण होत असते, जिचा खूप परिणाम अनेकांवर होतो.
तीस वर्षांपूर्वी…
प्रकाशकाका सांगत होते, “हल्ली आपल्या परिसरात फिरायला भीती वाटायला लागली आहे. कोणाच्या संतापाचा भडका कधी उडेल, कोण दारूच्या नशेत समोरून चालत येईल की कोण आपल्याला धक्का देऊन निघून जाईल याचा अंदाज येत नाही. आपला भाग खरे म्हणजे अत्यंत सुरक्षित! कोणीही रात्री बारा एक दोन कितीही वाचता यावे भीती वाटायची नाही. गल्लीच्या टोकाशी अनेक तरुण मुले टवाळक्या करत उभी असत, पण वस्तीत राहणाऱ्या लोकांकडे त्यांचे नीट लक्ष असे. अगदी कोणाच्या घरी ॲम्बुलन्स आली, त्यांना काही मदतीची गरज भासली, तर हीच मुले पुढे धावून येत. मुलीबाळींना सुद्धा उशीर झालेला दिसला तर त्यांच्यापैकी सीनियर कोणी चौकशी सुद्धा करत आणि घरापर्यंत सोडायला सुद्धा येत.” अर्थात ही तीस वर्षांपूर्वीची गोष्ट झाली!
हेही वाचा >>>दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
अलीकडच्या दहा वर्षांमध्ये…
गेल्या दहा वर्षांमध्ये आपण राहत्या वस्तीमध्ये झालेला बदल प्रकाशकाकांना फार जाणवायचा. आता वयही झाले आहे, त्यामुळे भर दुपारी किंवा रात्रीच्या वेळेस एकटे येताना भीती वाटते. दुचाकी वाहने कुठूनही अचानक अवतरतात…
कधी धक्का लागेल आणि आपण रस्त्यात पडू अशी भीती त्यांना वाटते. मंगला काकूंचीही तीच स्थिती! असे वाटते बँकेतून पैसे काढले आणि रस्ता क्रॉस करून आले, कोणी पैशाची पिशवीच घेऊन गेले तर? आजकाल कोणाचे कोणाकडे लक्ष नसते. ती कोपऱ्यावरची मुले आता तिथे नाहीत किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्या ही नाहीत. त्यांची पुतणी मधुरा कॉलेज संपून नुकतीच नोकरीला लागली होती. कॉर्पोरेट मधली नोकरी. रोज टॅक्सीने जायचे आणि टॅक्सीने यायचे. कधी दुपारी दोनला निघायचे, कधी रात्री अकराला परत यायचे. कामाच्या वेळा विचित्र, त्याचबरोबर तिथले वातावरण ही कधीकधी
मधुराला अस्वस्थ करे. अनेक पुरुष सहकारी बरोबर, काही जण अधिक मित्रत्वाचं नातं जोडणारे, मधुराच्या मनात एक असुरक्षिततेची भावना कधी कधी निर्माण होत असे. एक दिवस तिची धाकटी बहीण कॉलेजमधून घरी आली आणि दुसऱ्या दिवसापासून कॉलेजला जायचे टाळू लागली. मधुराने खोदून खोदून विचारल्यावर तिच्या लक्षात आले की, कॉलेजमध्ये आपल्या बहिणीला सुरक्षित वाटत नाही. कोणी आपला गैरफायदा घेईल, एखाद्या फंक्शनमध्ये, दांडियाच्या वेळेला, अॅन्युअल डेच्या वेळेला काही ठराविक मुलांची तिला भीती वाटे.
वाढती असुरक्षितता
आपल्या अवतीभवतीचे वातावरण अनेक कारणांनी असुरक्षित बनू शकते. एखाद्या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडतात. अनेक बांधकामे पाडून नवीन कामे सुरू होतात. एखाद्या भागामध्ये अनेक पायाभूत सुविधा नसतात. गर्दीचे रस्ते, रस्त्यावरचे दिवे, पाण्याचा पुरवठा, घरांच्या दुरुस्त्या अशा अनेक गोष्टींमध्ये कमतरता असतात. अशा गैरसोयीच्या परिसरामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. आर्थिक अस्थैर्याचा सुद्धा आपल्याला जाणवणाऱ्या सुरक्षिततेच्या भावनेवर परिणाम होत असतो. एकमेकांमधील संघर्ष वाढला म्हणजे, कौटुंबिक कलह असेल, शेजाऱ्या- शेजाऱ्यांमधील भांडणे असतील, सामाजिक संघर्षाचे पडसाद असतील, की असुरक्षित वाटते. आपल्या परिसरातील व्यसनाधीनता वाढली,गुन्हेगारी वृत्ती, शिक्षण न घेण्याकडे कल, बेकारी अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या अवतीभवतीचे वातावरण असुरक्षित होते.
हेही वाचा >>>व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार
रात्री किंवा दिवसाढवळ्याही भीती
कधी कधी वस्तीचे स्वरूप बदलते. एखादी एकसंघ असलेली वस्ती तुटते, दुभंगते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या, भिन्न भिन्न प्रवृत्तीच्या लोकांना एकमेकांशी जुळवून घेणे जमत नाही. अशा संघर्षामधून सुद्धा वातावरण असुरक्षित होते. आपल्या घरामध्ये आपल्याला अंधारामध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षित वाटते का, आपल्या राहत्या परिसरामध्ये दिवसाढवळ्या एकटे दुकटे फिरताना, तसेच अंधार झाल्यावर रात्रीच्या वेळी ये- जा करताना सुरक्षित वाटते का आणि आपण ज्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये राहत आहोत त्या शहरांमध्ये आपल्याला दिवसाढवळ्या एकटे दुकटे फिरताना आणि अंधार झाल्यावर रात्रीच्या वेळी ये- जा करताना सुरक्षित वाटते का अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या मनात किती सुरक्षिततेची भावना आहे याची कल्पना देतात.
बदलती मनोवृत्ती
माणसाच्या बदलत्या मनोवृत्तीचा प्रत्ययही बदलत्या वातावरणामध्ये येतो. एकटेपणा, दुसऱ्याशी जमवून न घेणे, दुसऱ्याच्या भावना आणि विचारांची कदर न करणे, दुरभिमान बाळगणे अशा अनेक प्रकारच्या प्रवृत्ती आढळून येतात. एकमेकांवरील विश्वास संपतो, मनात इतरांविषयी संशय निर्माण होतो. या संगळ्यातून मन असुरक्षित होते. स्त्री विषयीचा आदर नसणे, आपल्या पुरुषी सत्तेचा अहंकार असणे आणि हीच आपली ताकद आहे अशी गुर्मी मनात असणे अशा वृत्तीमुळे महिलांना सुरक्षित वाटेनासे होते, महिलांवरील अत्याचार वाढतात.
आजुबाजूच्या घटनांचा परिणाम
जगातील विविध घटनांचा आपल्या मनात जाणवणाऱ्या सुरक्षिततेच्या भावनेवर परिणाम होतो. हवामानात होणाऱ्या बदलांना रोजच्या रोज तोंड द्यावे लागते. जगातल्या आर्थिक उलाढाली, चाललेली युद्धे, दहशतवाद या संगळ्यातून एक असुरक्षित असल्याची जाणीव अनेकांना होते. देशांतर्गत अशांतता, अस्थिरता यांचा त्रास होऊ लागतो. मी, माझे आप्तेष्ट, माझे गांव, माझ्या देश इत्यादी कुठल्याही बाबतीत मन जर असे म्हणत असेल की, ‘मी सुरक्षित नाही’, म्हणजेच कोणत्याही कारणाने मनात असुरक्षिततेची जाणीव असेल तर त्याचा मानसिक स्वास्थ्यावर सखोल परिणाम होतो. एकतर एखादी मोठी घटना दुर्घटना आपल्या वस्तीत घडली, उदाहरणार्थ मारामारी, एखादा अपघात किंवा मोठी आपत्ती कोसळली उदा. पूर तर त्याचा मनावर आघात होतो आणि मनात एक प्रकारची भीती निर्माण होते. काही जणांच्या बाबतीत अशा एखाद्या दुर्घटनेचा खूप काळ परिणाम राहतो. डोळ्यासमोर घडलेली जर घटना असेल तर ती सतत डोळ्यांसमोर येत राहते, जणू ती अनुभूती परत परत घेतली जाते. मनात त्यासंबंधीचे विचार राहतात, आठवणी राहतात, सहजपणे दचकायला होतं, जरा खुट्ट झाले तरी छातीत धडधडायला लागते, थरथर सुटते, घाम फुटतो, रात्री झोप लागत नाही. इतरांच्या मध्ये मिसळावेसे वाटत नाही, एक प्रकारचे एकटे पण येते. अशी मानसिक आघातामुळे Post traumatic stress disorder होऊ शकते.
असुरक्षिततेमुळे वाढतात शारीरिक व्याधी
दीर्घकाळ वातावरण असुरक्षित राहिले तर मनावर सततच एक ताण राहतो. मनात कायम भीती वाटत राहते. आज काय घडणार माझ्या आयुष्यात? काही विपरीत तर होणार नाही ना? मी, माझे कुटुंबीय, माझी मुलं, आई-वडील हे सगळे सुरक्षित राहतील ना? कोणाला काही इजा तर नाही ना पोहोचणार? अशाप्रकारचे विचार मनामध्ये गर्दी करू लागतात. कामासाठी बाहेर पडल्यावर सुद्धा लक्ष घराकडे राहते. मनाच्या सततच्या तणावामुळे विविध शारीरिक व्याधींची शक्यता वाढते उदाहरणार्थ ब्लडप्रेशर, डायबिटीस आणि त्याचबरोबर अतिचिंता, डिप्रेशन यांचे प्रमाणही वाढते.
सुरक्षित वाटणे सर्वाधिक महत्त्वाचे
याउलट अवतीभवतीचा परिसर, आपले वातावरण मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करत असेल तर एक मानसिक बळ मिळते. शेजारीपाजारी एकमेकांशी मित्रत्वाचे, घरोब्याचे संबंध जोडतात. त्यातून मानसिक आणि प्रत्यक्ष आधाराची एक साखळी तयार होते. एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे अनेक जण आपल्यापाशी असतात. आपण एकटे नाही, तर सारेजण मिळून आहोत ही भावना मनाला खूप मोठा धीर देणारी असते. आपल्यावर संकट आले तरी देखील आपल्याला आधार देणारे अनेक जण आहेत याचा प्रत्यय येतो. वस्तीमध्ये, समाजामध्ये एकसंघपणा निर्माण होतो. सुरक्षित वस्तीमध्ये
राहिले, अवतीभोवतीचे वातावरण सुरक्षित असले तर आयुष्यामधील समाधानही वाढते. सुरक्षित वातावरणामध्ये आलेल्या संकटाला सामोरे जाण्याची क्षमता वाढते. आपल्यामधल्या क्षमतांवर विश्वास निर्माण होतो. थोडक्यात काय तर मनःस्वास्थ्याच्या दिशेने प्रवास करताना मनाला सुरक्षित वाटणे महत्त्वाचे!