यंदाच्या जागतिक संधिवात दिवसाची संकल्पना ‘इन्फॉर्म्ड चॉईसेस अँड बेटर आउटकम्स’ अशी आहे. रुग्णांना संपूर्ण आणि योग्य माहिती देऊन उत्तम उपचार आणि परिणाम साध्य करणं असं मूळ उद्दिष्ट आहे. आर्थरायटिस हा आजार सर्वपरिचित आहे, मात्र याची संपूर्ण माहिती लोकांमध्ये अजूनही नाही.

या अनुषंगाने एकंदरीत आर्थरायटिस आणि त्यामध्ये होणार्‍या वेदनांबद्दल जाणून घेणं आपली क्वालिटी ऑफ लाइफ निश्चितपणे वाढवणार आहे. यामुळे आर्थरायटिसमुळे समाजावर आलेला शारीरिक, आर्थिक आणि भावनिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?

मागच्या दोन लेखात आपण, ऑस्टियो आर्थरायटिस आणि रूमटोइड आर्थरायटिस याबद्दल जाणून घेतलं. आज आपण या दोन्हीच्या फिजिओथरेपी उपचारांबद्दल जाणून घेऊया.

हेही वाचा – Weight Loss : वजन कमी करण्यासाठी हळू चालणे फायदेशीर ठरू शकते? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….

u

सौम्य आणि मध्यम प्रकारच्या आर्थरायटिसवर फिजिओथेरपी या तत्वांवर काम करते. पेशंट एज्युकेशन आणि पेन एज्युकेशन- मागच्या दोन भागात आपण बद्दल ऑस्टियो आर्थरायटिस आणि रूमटोइड आर्थरायटिसबद्दल पूर्ण माहिती त्याच्या टप्प्यांसहित समजून घेतली. फिजिओथेरपिस्ट रूग्णाला ही माहिती त्याला समजेल अशा भाषेत उदाहरणांसहित समजावून देतात, यामुळे रुग्णाच्या मनातील गैरसमज दूर होतात, भीती कमी होते, आणि आपल्याला नक्की काय झालंय हे कळल्यामुळे पुढचा प्रवास सोपा होतो. वेदना का होते आहे, होणार्‍या वेदनेवर कसे उपाय करता येतील, आपला या वेदनेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला हवा असे अनेक पैलू यातून उलगडतात. रूमटोइड आर्थरायटिस हा पूर्णपणे बरा होणारा आजार नाही, आपल्याला यासहित आपलं आयुष्य परिपूर्णपणे जगायचं आहे हा विचार रुग्णाच्या मनात रुजवावा लागतो.

मसल स्ट्रेन्थ वाढवणं: ऑस्टियो आर्थरायटिसमध्ये गुडघ्याच्या आणि खुब्याच्या आजूबाजूच्या स्नायूंची शक्ती वाढवणारे व्यायाम रूग्णाला शिकवले जातात.
बर्‍याच वेळा रुग्णांना मसल स्पेसिफिक व्यायाम आणि शारीरिक हालचाल या वेगळ्या गोष्टी आहेत हे माहिती नसतं. ऑस्टियो आर्थरायटिसमध्ये जितकी गरज ही शारीरिक हालचालीची असते तितकीच मसल स्पेसिफिक व्यायामांचीही असते. मनाने केले जाणारे योगासनाचे प्रकार किंवा हालचाली या फिजिओथेरपिस्टने शास्त्रीय दृष्टीकोनातून ठरवून दिलेल्या व्यायामांची जागा घेऊ शकत नाहीत. रूमटोइड आर्थरायटिसमध्ये स्नायू आणि सांधे अत्यंत नाजूक परिस्थितीत असतात, अशावेळी व्यायाम ठरवताना आणि करवून घेताना अतिशय काळजी घ्यावी लागते. हे घरच्या घरी किंवा फिजिओथेरपिस्ट शिवाय होऊ शकत नाही.

एरोबिक व्यायाम: यामध्ये रूग्णाला अनुसरून चालणं, सायकल चालवणं किंवा शक्य असेल तेव्हा स्विमिंग करणं असे व्यायाम प्रकार त्यांच्या कालावधी आणि तीव्रतेनुसार शिकवले संगितले जातात. हे जनरल बॉडी एक्सरसायजेस असतात ज्यामुळे वजन कमी होणं, हृदयाची क्षमता वाढणं, वेदनेची तीव्रता कमी होणं, मूड सुधारणं असे फायदे दिसून येतात. हे रूग्णाला अनुसरून असल्याने यामध्ये व्यक्तीगणिक भिन्नता असते.

मसल स्ट्रेचिंग : ज्याप्रकारे गुडघ्याच्या आणि खुब्याच्या आजूबाजूच्या स्नायूंची शक्ती वाढवणारे व्यायाम संगितले जातात त्याचप्रमाणे यापैकी काही स्नायूंना ताण देणारे व्यायाम देखील आवश्यक असतात, शक्ती वाढवणारे आणि लवचिकता वाढवणारे व्यायाम हे एकमेकांना परस्पर पूरक असतात. कुठल्या स्नायूंना बळकटी वाढवण्याच्या व्यायामांची गरज आहे आणि कोणत्या स्नायूंना लवचिकता वाढवणार्‍या व्यायामांची गरज आहे हे ओळखून त्यानुसार व्यायाम ठरवले जातात.

जीवनशैलीतील बदल : आपला आहार, झोप, विचार, वजन, सवयी या होणार्‍या वेदनेवर कसा आणि कुठपर्यंत परिणाम करू शकतात, आणि यात सुधारणा करण्यासाठी कोणते बदल करायला हवे याची सखोल माहिती रूग्णाला दिली जाते.

हेही वाचा – हृदयविकाराचा झटका ओळखून स्मार्ट वॉच तुमचा जीव वाचवू शकतो का? वाचा संशोधनातून समोर आलेली माहिती…

तोल आणि चपळता वाढवणारे व्यायाम : रोजच्या आयुष्यातील चालणं, पायर्‍या कुठल्याही आधाराशिवाय चढणं आणि उतरणं, उठबस करणं, हातात वजन उचलून चालणं, या आणि अशा अनेक हालचाली सुलभ आणि आत्मविश्वासपूर्ण होण्यासाठी या व्यायामांची नितांत गरज असते.

जॉइंट प्रोटेक्शन टेकनिक्स रूमटोइड आर्थरायटिसच्या रुग्णाला विविध जॉइंट प्रोटेक्शन टेक्निक शिकवले जातात ज्याद्वारे हाताच्या छोट्या स्नायूंवर येणारा भार कमी करून, कोपर आणि खांदा यांचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा हे रुग्णाला शिकवलं जातं. तसंच रुग्णाच्या कामाच्या ठिकाणी, घरात किंवा स्वयंपाकघराच्या रचनेत काही बदल सुचवले जातात.

Story img Loader