Health Special ग्रीष्मातला म्हणजे एप्रिल-मे महिन्यातला कडक उन्हाळा. या उन्हाळ्यामधील उष्म्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो हे तर प्रत्यक्षसिद्ध आहे. त्वचा काळवंडण्यापासून, शरीरामधील जलांश घटण्यापर्यंत आणि चक्कर, डोकेदुखीपासून शरीर अशक्त होण्यापर्यंत विविध आरोग्य- समस्या उन्हाळ्यामध्ये संभवतात. तसाच उन्हाळ्यातील उष्म्याचा केसांवर बरा-वाईट परिणाम होऊ शकतो का? तर याचे उत्तर निश्चितच होतो, असे आहे. तो कसा व काय होतो हे समजून घेण्यासाठी या विषयावर झालेले संशोधन जाणून घेऊ.
मेंदूमध्ये उष्णता वाढणे घातक
उन्हाळा अर्थात ग्रीष्म ऋतूमध्ये केसांची स्थिती कशी असते? या प्रश्नाचे उत्तर हे उन्हाळ्यामधील उष्म्याशी निगडीत आहे. आयुर्वेदाने आपले शिर हे शरीरातले सर्वात महत्त्वाचे मर्म मानले आहे, ज्याची काळजी सदैव घ्यावी लागते. आपल्या मस्तिष्काची काळजी स्वतः शरीरसुद्धा घेते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे उन्हाळ्यामध्ये डोक्यावरचे केस वाढणे. उन्हाळ्यामध्ये डोक्यावर ऊन पडल्याने मेंदूमध्ये उष्णता वाढणे, हे घातक सिद्ध होऊ शकते. डोक्यावर ऊन पडल्याने मस्तिष्कामधला द्रवभाग कमी होऊन मेंदूचा रक्तप्रवाह कमी झाल्याने भोवळ येणे, उष्माघात होणे शक्य असते. ते टाळण्याचा शरीराचा संरक्षणात्मक प्रयत्न म्हणजे डोक्यावर केसांचे आवरण वाढवणे. उन्हापासून डोक्याचा व पर्यायाने डोक्यामधील मेंदू आदी महत्त्वाच्या अंगांचा बचाव करण्याचा, उन्हाळ्यात संभवणार्या उष्माघातापासून शरीराचे रक्षण करण्याचा, उन्हामधील अतिनील अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांपासूनही शरीराचे संरक्षण करण्याचा तो एक प्रयत्न असतो. हा प्रयत्न म्हणजे ऋतुकालानुसार शरीरामध्ये होणार्या सकारात्मक बदलांचे एक उत्तम उदाहरण आहे.
हेही वाचा – तरुणाला आजूबाजूला दिसते करीना; मानसोपचार तज्ज्ञांकडून जाणून घ्या, नेमका हा प्रकार काय?
घामाचे बाष्पीभवन महत्त्वाचे
स्वाभाविकरित्या ग्रीष्मामध्ये केस गळण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते आणि उलट केस घन व दाट होऊ लागतात, त्यातही डोक्यावरचे केस. हा मुद्दा अंगावरील केसांना मात्र तितकासा लागू होत नाही. कारण त्वचेवाटे घाम निर्माण करणे हे उन्हाळ्यामध्ये एक महत्त्वाचे कार्य असते, तेव्हाच शरीराचे तापमान नियंत्रणात राहू शकते. जितका अधिक घाम येईल तितकी घामाच्या बाष्पीभवनाची क्रिया उत्तम होईल. त्वचेवर अधिकाधिक घामाचे बाष्पीभवन व्हायचे असेल तर त्वचेचा अधिकाधिक पृष्ठभाग मोकळा मिळणे गरजेचे असते, ज्यांमध्ये त्वचेवरील लोमांची (लहान केसांची) बाधा येऊ शकते.
साहजिकच लोम वाढू न देण्याचा किंबहुना लोम कमी करण्याचा प्रयत्न शरीर करेल, जी स्थिती हिवाळ्याच्या अगदी उलट असते, कारण हिवाळ्यात त्वचेला थंड वार्यांपासून वाचवण्यासाठी अधिकाधिक लोमांची गरज असते. तात्पर्य हेच की, उन्हाळ्यामध्ये डोक्यावरील केसांचे प्रमाण वाढेल तर त्वचेवरील केसांचे (लोमांचे) प्रमाण घटेल.
केस गळण्याची शक्यता कमी
मथितार्थ हाच की, उन्हाळ्यामध्ये तुमच्या केसांवर विपरित नाही, तर सकारात्मक परिणाम होतो. साहजिकच उन्हाळ्यात तुमचे केस गळण्याची शक्यता कमी आणि वाढण्याची शक्यता अधिक. अर्थात याचा अर्थ उन्हाळ्यात केसांची काळजी घेऊ नये, केसांना तेल लावू नये, केसांना पोषक आहार घेऊ नये असा होत नाही.