“मी खोल डोहात डुबकी मारली आहे, हात पाय मारतोय खरा, पण सारखा डोहाच्या तळाशीच चाललो आहे. डोहाचा तळ गाठलाय मी! खाली दिसतोय नुसता काळा कुट्ट अंधार! आता पुन्हा वर येणे नाही! अशाच गटांगळ्या खायच्या!” माझा पेशंट प्रकाश मला त्याची डायरी दाखवायला घेऊन आला होता.
त्याची डायरी म्हणजे त्याच्या मनःस्थितीचे प्रतिबिंब होते.

आणखी वाचा: Health Special: जीवनसत्त्वांचा समतोल कसा साधणार?

Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
chaturang nature disorder harmful to society Personality American Psychological Association
स्वभाव-विभाव: समाजासाठी विघातक विकार
under Section 294 of IPC encouraging women in dance bar to dance is not offence High Court
डान्सबारमधील अश्लील नृत्यास प्रोत्साहन गुन्हा नाही, एकाविरोधातील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Kolkata Rape Case
Kolkata Rape Case : “मुलीच्या वेदना आठवल्या तरी…”, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या आईची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
abortion, rape victim, High Court,
गर्भपात करावे की नाही हा सर्वस्वी बलात्कार पीडितेचा अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
pukar seva pratishthan ngo for destitute elderly homeless
रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’!

“कधीपासून असे वाटते आहे? कशी सुरुवात झाली?” मी सगळी माहिती विचारायला सुरुवात केली. त्याच्या पत्नीकडूनही माहिती घेतली. प्रकाश हा शिकला सवरलेला, चांगली नोकरी असलेला, कुटुंबात स्थिरस्थावर झालेला मध्यमवयीन माणूस. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा सगळा नूरच बदलला
होता. खांदे पडलेले, पाठीला बाक आलेला, कपाळावर जगाचे ओझे असावे अशा आठ्या, चेहरा पडलेला आणि सतत खाली पाहणारी नजर! त्याचे असे रूप पाहून सगळ्यांना धक्का बसत असे. उत्साही, कामसू, मित्रांच्या गोतावळ्यात रमणारा प्रकाश असा का दिसतो हल्ली? सगळ्यांनाच प्रश्न पडला होता.

आणखी वाचा: Health Special: डेंटिस्टकडे जाताना काय काळजी घ्याल?

“सकाळी उठवेसेच वाटत नाही. रात्री झोप नीट लागत नाही. पहाटे एकदा जाग आली की परत झोप लागत नाही, उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही, सतत स्वप्ने पडतात. जेवायची तर इच्छाच होत नाही. काहीही करण्यात रस उरला नाही आहे. सगळी कामे पुढे ढकलतो. ऑफिसमध्येसुद्धा कुठलाही निर्णय करायचा म्हटला की काही सुचत नाही. वाटते मला काही जमणारच नाही. एकीकडे अगदी एकटे पडल्यासारखे वाटते, दुसरीकडे आपणच सगळ्यांपासून दूर जावे असे वाटते. मनात नुसती निराशा असते. काहीही चांगले घडणार नाही, मग कशासाठी काही करायचे? स्वस्थ बसलेले बरे. आपल्यामुळे उगाच सगळ्यांना त्रास! माझेच सगळे चुकले आहे आयुष्यात आणि माझ्यामुळे उगाच माझ्या कुटुंबाला त्रास. सतत उदास!” डिप्रेशनची (उदासीनता) सगळी लक्षणे प्रकाशमध्ये होती. मनात सतत उदास वाटणे, कशातही रस न वाटणे, मनात निराशा, एकटेपणा, आपल्या जगण्यात काही अर्थ नाही राहिला असे वाटणे, झोप आणि भुकेवर परिणाम ही त्यातली काही.

आणखी वाचा: Health Special: उन्हाळ्यातील सर्दी-ताप आणि खोकला-दमा याचे कारण काय?

“मनातच काय शरीरातही उभारी राहिलेली नाही. घरातले काम करणे इतके जिवावर येते, कसेबसे रेटते मी ते! गळून गेल्यासारखे, काही शक्तीच उरली नाही असे वाटते. सारखे डोके दुखते, कंबर दुखते. कामात लक्ष लागत नाही. हल्ली स्वयंपाक करताना पण सारख्या चुका होतात. गॅसवर दूध तापत
ठेवते आणि विसरून जाते. कित्येक दिवसात एकही मालिका पहिली नाही मी. अहो, माझ्या भाचीला मुलगी झाली, इतकी चांगली बातमी, पण मला मनात काही वाटलेच नाही! आनंद म्हणजे काय हेच विसरून गेले आहे जणू!” आशाताई सांगत होत्या. थकवा, अनेक शारीरिक तक्रारीही डिप्रेशनमध्ये दिसून येतात, त्याच बरोबर बौद्धिक कामांवरही परिणाम होतो- विसरणे, लक्ष केंद्रित न होणे, विचारांमध्ये स्पष्टता नसणे, निर्णय क्षमतेवर परिणाम. अनेकदा शारीरिक आजारांचा परिणाम म्हणून किंवा शारीरिक आजाराचे लक्षण म्हणून डिप्रेशन येते. थायरॉईडच्या आजारात डिप्रेशन खूप वेळा दिसून येते. ब्लड प्रेशर, मधुमेह, अर्धांगवायू, हृदयरोग, कॅन्सर अशा अनेक रोगांबरोबर डिप्रेशन येऊ शकते.

अशा प्रकारे डिप्रेशनचा आजार माणसाचे आयुष्य व्यापून टाकतो, त्याच्या दैनंदिन आयुष्यावर, नातेसंबंधांवर, कामावर खोलवर परिणाम करतो. आयुष्यातला आनंद हरवून जातो. अशा मनःस्थितीत मनात येणारे विचारही नकारात्मक असतात. स्वतःबद्दल, आजूबाजूच्या माणसांबद्दल, परिस्थितीबद्दल आणि भविष्याबद्दल केवळ नकारात्मकता मनात असते, म्हणून आपण एकटे पडलो(helplessness) असे वाटते, आपल्याला काही किंमत राहिली नाही(worthlessness) असे वाटते आणि भविष्याविषयी निराशा(hopelessness) वाटते. डिप्रेशन हा आजार मूलतः mood disorder म्हणजे भावनिक अवस्थेचा आजार आहे. पण या उदास भावनेमागे विचारांचा विपर्यास (cognitive distortions)असतो. त्यामुळे पेशंट प्रत्येक घटनेचा अर्थ लावताना या विपर्यस्त विचारांचा चष्मा लावतो.

‘आता हळू हळू लोक माझ्यापासून दूर निघून जातील. माझ्यासारख्या बोअरिंग माणसाच्या जवळ कोणाला थांबावेसे वाटेल?’ ‘या परीक्षेत चांगले मार्क नाही ना मिळाले तर पुढे कधीच काही चांगले घडू शकत नाही. माझ्यावर ‘अपयशी’ म्हणून कायमचा शिक्का बसेल.’ ‘ हल्ली माझी शेजारीण माझ्याशी बोलत नाही. बहुधा तिला मी आता आवडेनाशी झाले आहे. बरोबरच आहे, माझ्यात असे काय आहे की तिने माझ्याशी मैत्री ठेवावी?’ ‘नेहमी माझे काहीतरी चुकते. त्यामुळे मग गैरसमज होतात, लोकांशी वाद होतात. माझ्यातच काहेतारी fault असला पाहिजे.’ “इतकी निराशा मनात साठली होती की असे वाटले आता जगायचे तरी कशासाठी? म्हणून मग झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. आता वाटते, का केले मी असे? माझ्या मुलांची मला क्षमा मागायची आहे” डिप्रेशनमध्ये ६०-७०% पेशंटना मनात आत्महत्त्येचे विचार येतात.

मेंदूतील अनेक रासायनिक बदल, अनेक अंतःस्रावाचे बिघडलेले प्रमाण, अनुवांशिकता अशा जैविक घटकांबरोबरच एखाद्याच्या समोरील परिस्थिती डिप्रेशनला कारणीभूत ठरते. अनेक समस्या एकत्र समोर उभ्या ठाकल्या तर त्यांना तोंड देताना माणूस थकतो आणि डिप्रेशन येऊ शकते. कठीण परिस्थितीला समोरे जाण्याचे अयोग्य मार्ग(emotional coping mechanism), मनाची कमी पडणारी लवचिकता(resilience) यामुळे उदासीनतेची शक्यता वाढते. लहानपणी विपरीत परिस्थितीत राहावे लागले असेल, म्हणजे घरात कौटुंबिक हिंसाचार, व्यसनाधीनता, शारीरिक किंवा लैंगिक शोषण अशा अनेक अनुभवांचा मुलाच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो आणि मोठेपणी डिप्रेशनची शक्यता
वाढते. लवकरात लवकर मनोविकारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यांची मदत घेणे आवश्यक आणि उपयोगी.
डिप्रेशनचा परिणाकारक इलाज करता येतो. जेव्हा डिप्रेशन सौम्य प्रमाणात असते तेव्हा केवळ
मानसोपचार (psychotherapy) करून ते बरे करता येते. डिप्रेशनची तीव्रता मध्यम किंवा जास्त असेल
तर औषध गोळ्या (antidepressant) घेणे गरजेचे असते. त्याबरोबर मानसोपचार केला तर त्याचा खूप
चांगला फायदा होतो. जेव्हा डिप्रेशनची तीव्रता जास्त असते, तेव्हा गरज पडल्यास ईसीटीसुद्धा द्यावे लागतात.
प्रकाशने इलाज सुरू केले. त्याच्या डायरीचे पान पालटले, ‘डोहाच्या तळाशी पोचल्यावर प्रयत्न करून
उसळी मारली आणि अचानक प्रकाशाचा एक तुकडा दिसू लागला!’