-डॉ. अश्विन सावंत
Health Special : सध्या उन्हाच्या तीव्र झळांना सुरुवात झाली आहे. त नेते आणि लोकसभा निवडणूक सुरू आहे, प्रचारासाठी याच उन्हात नेते आणि कार्यकर्त्यांना पायपीट करावी लागते आहे. कधी कार्यकर्ते तर कधी नेतेही उष्माघाताने चक्कर येऊन खाली पडल्याची छायाचित्रेही प्रसिद्ध होऊ लागली आहे. यंदाचा उन्हाळा एरवीपेक्षा अधिक कडक असणार हे तर हवामानशास्त्र विभागाने यापूर्वीच जाहीर केले आहे. अशा वेळेस उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काय करावे हे आपण आज जाणून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सूर्यप्रकाशात किंवा उष्णतेच्या निकट काम करणे, हे शरीरामध्ये उष्माघातास (उष्णता वाढण्यास) कारणीभूत ठरते. सर्वांनी उन्हातान्हांत किंवा उष्णतेजवळ काम करताना कोणती काळजी घ्यायची, ते समजून घेऊ.
आणखी वाचा-Health Special: डॉक्टर गुगलचे फायदे अधिक की, तोटे? काय कराल? काय टाळाल?
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर पाणी प्यावे. भरपूर म्हणजे किती, तर दर २०-३० मिनिटांनी एक ग्लास पाणी प्यावे किंवा दर दोन-चार मिनिटांनी घोड-घोट पाणी अखंड पित राहावे. विशेषतः उन्हातान्हांत किंवा उष्णतेच्या संपर्कात असताना. शक्य असल्यास पाण्यामध्ये वाळा भिजवून ते पाणी प्यावे, जे शरीराला नैसर्गिकरित्या आतून थंड ठेवते.
- नारळपाणी हे उष्माघाताचा किंवा शरीरामध्ये उष्णता वाढण्याचा धोका टाळण्यासाठी अमृत आहे.
- दिवसातून एक तरी फळांचा रस प्यावा, विशेषतः थंड गुणांच्या फळाचा. जसे की- कलिंगड, डाळींब, आवळा वगैरे (आवळा सर्वाधिक थंड आहे)
- वाळ्याचे, लिंबाचे, गुलाबाचे, आवळ्याचे, कोकमाचे सरबत, कैरीचे पन्हे प्यावे.
- नारळ पाणी, फळांचे रस, सरबत वगैरे घटाघटा न पिता थांबून- थांबून घोट-घोट प्यावे.
- सब्जा पाण्यात भिजवून दिवसातून तीन- चार वेळ घ्यावा. शरीरामध्ये थंडावा निर्माण होण्याचा नैसर्गिक उपाय.
- सलग काम न करता अधूनमधून कामामधून आराम घ्यावा, एकाने दीर्घकाळ काम करण्याऐवजी आळीपाळीने आलटून-पालटून काम करावे.
- सुश्रुतसंहितेनुसार उन्हाचे (उष्णतेचे) सर्व धोके सावलीमध्ये गेल्याने टळतात, वा नष्ट होतात.
- आराम करताना शक्यतो सावलीमध्ये गार हवा लागेल असे, पंख्याखाली, थंड वातावरणामध्ये बसावे. ही सूचना ज्यांना विशेष प्रकारचे संरक्षक वेष (सूट) घालावे लागतात, त्यांनी अधिक सावधतेने पाळावी. सावलीमध्ये बसल्यामुळे अंगाचा दाह कमी होतो, शरीरात वाढलेली उष्णता घटते, तहान व घाम कमी होतो, चक्कर व डोळ्यासमोर येणारा अंधार नाहीसा होतो आणि एकंदरच शरीराला टवटवी येते.
- घट्ट- जाड कपडे कटाक्षाने टाळून हलके सुती (कॉटनचे) कपडे वापरावे, गडद रंगाचे कपडेसुद्धा टाळून फिक्या रंगाचे कपडे वापरावेत.
- काम करताना अधून मधून किंवा शक्य नसेल तर घरी गेल्यानंतर थंड पाण्यामध्ये पाय बुडवून बसणेसुद्धा निश्चित फायद्याचे होईल (शक्य असल्यास त्या पाण्यामध्ये दोन चमचे वाळ्याचे चूर्ण टाकावे).
- उन्हातान्हांत व उष्णतेजवळ काम करणार्यांनी मंडळींनी आहारामध्ये उष्ण पदार्थ (शरीरामध्ये उष्णता वाढवणारे) पदार्थ कटाक्षाने टाळावे. जसे की – हिरवी मिरची, गरम मसाले, मोहरी, आले, लसूण,ओवा, हिंग, तिखट- तळलेले- खारवलेले पदार्थ, मासे (विशेषतः बांगडा- मुशी असे तेलयुक्त मासे व कोलंबी, खेकडा असे कवचयुक्त जलचर), शेंगदाणे, काजू, पिस्ते, अक्रोड, खजूर, खारीक, तीळ-अळशी-सूर्यफूल वगैरे तेलबिया, बाजरी, कुळीथ, जवस, उडीद, मका, शेवगा, दही, मध वगैरे.
- शरीरात उष्णता वाढवणारी पेयं कटाक्षाने टाळावीत. जसे की- चहा, कॉफी, कोको, शीतपेये (कोल्ड्रिन्क्स), बीयर, मद्य (आयुर्वेदानुसार सर्व प्रकारची मद्य ही पित्तकारक असल्याने शरीरात उष्णता वाढवतातच)
- उन्हातून आल्यावर ताक पिण्यास आयुर्वेदाने निषेध केला आहे, हा सल्ला अनेकांना माहीत नाही, तो ध्यानात घेऊन अनुसरण करावे.
- उन्हातुन आल्यावर आयुर्वेदाने थंड दूध पिण्याचा सल्ला दिलेला आहे. दूधसुद्धा उन्हातून सावलीत येऊन थोडा वेळ बसल्यानंतर आणि थांबून-थांबून घोट-घोट प्यावे.
- आहारामध्ये थंडावा वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन वाढवावे. जसे की,- दूध, लोणी, तूप, नारळपाणी, गुलाबजल, तांदूळ, नाचणी, ज्वारी, मूग, मटकी, तूर, मसुर, वाटाणे, थंड भाज्या व थंड फळांचे सेवन वाढवावे.
- शरीराला थंडावा व पाणी पुरवणार्या फळांचे सेवन वाढवावे,जसे- कलिंगड, काकडी, टरबूज, केळे, द्राक्षे, सीताफळ, पेअर, सफरचंद इत्यादी
आणखी वाचा-Health Special: दुर्लक्षित पण महत्त्वाचा आजार ‘स्क्रब टायफस’ आहे तरी काय? उपचार काय कराल?
ही सर्व काळजी ज्यांना उन्हातान्हांत व उष्णतेजवळच्या कामांमध्ये दीर्घकाळ राहावे लागते आणि ज्यांनी उष्णतेजवळ कामे करण्यास नवीनच सुरुवात केली आहे, त्यांनी अधिक सजगतेने पाळावी. आणि कडक उन्हाळ्यांत दीर्घकाळ थेट सूर्यप्रकाशात वावरल्याने किंवा अतिउष्णतेमुळे आरोग्याला जे धोके संभवतात, ते पुढीलप्रमाणे-
- उष्णतेच्या संपर्कामध्ये शरीर आल्यानंतर शरीर स्वतःचे तापमान सांभाळण्याचा प्रयत्न करतेच. जेव्हा शरीराचे तापमान नेमके ९८.६ फ़ॅरनहाईटहून अधिक होते, तेव्हा हे प्रयत्न सुरु होतात.
- सर्वप्रथम हृदय आपली पंपिंगची क्रिया वाढवून रक्तवाहिन्यांमध्ये अधिक प्रमाणात रक्त खेळवते.
- याच दरम्यान रक्तवाहिन्या अधिकचे रक्त स्वीकारण्यासाठी विस्फारतात व अधिकाधिक रक्त त्वचेजवळ नेले जाते, जेणेकरुन उष्णता शरीराबाहेर फेकणे सोपे व्हावे.
- यानंतर मेंदुतर्फे त्वचेखालील स्वेदग्रंथींना अधिक प्रमाणात घाम तयार करण्याचा आदेश दिला जातो. त्वचेवर जेवढा अधिक घाम येतो, तेवढ्या घामाचे बाष्पीभवन होण्यासाठी शरीरातलीच उष्णता वापरली जाते. त्वचेवर येणार्या घामाचे बाष्पीभवन होताना त्वचेखाली असलेल्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांमधील रक्तातली उष्णता कमी केली जाते व शरीराचे उष्ण तापमान कमी होते.
- या सर्व प्रक्रियेमध्ये धोका निर्माण होतो, तो हृदयामार्फत अधिक प्रमाणात त्वचेकडे ढकललेल्या अतिरिक्त रक्तामुळे. शरीराला अर्थात रक्ताला थंडावा मिळावा यासाठी शरीराच्या केंद्राकडून अधिकाधिक रक्त त्वचा आणि स्नायुंकडे पाठवण्याचा शरीराचा प्रयत्न असतो, तेव्हा साधारण मिनिटाला आठ लीटर या गतीने रक्त त्वचेच्या दिशेने
धावत असते. - त्या प्रयत्नात हृदय व फुफ्फुसे या महत्त्वाच्या अवयवांवर विलक्षण ताण पडतो. रक्त त्वचेकडे अधिक प्रमाणात येते आणि महत्त्वाच्या अवयवांना व क्रियांना मात्र रक्ताची कमी, अशी बिकट परिस्थिती ओढवते.
- साहजिकच त्यामुळे शरीराच्या केंद्रामधील मुख्य अवयवांना रक्ताची कमतरता जाणवते. त्यातही मूत्रपिंड व आतडे यांमधील रक्तसंवहन मोठ्या प्रमाणावर घटते. अन्नपचनाची क्रिया व मूत्र निर्मितीची क्रिया या त्या क्षणी दुय्यम असल्याने
शरीर असे करते. - उन्हाळ्यात मूत्रविसर्जनाचे प्रमाण कमी होण्याचे हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे.
- उन्हातान्हांत किंवा अतिउष्णतेच्या साहचर्यामध्ये अधिक काळ काम करणार्यांना शरीराचे तापमान वाढल्यामुळे अस्वस्थ वाटण्यापासून ते मृत्यूपर्यंतचा धोका संभवतो.
- त्यातही ज्या प्रदेशांमध्ये तापमान ४० अंशाच्या आसपास असते, त्या प्रदेशांमध्ये उष्णताजन्य मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो.
आणखी वाचा-Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
पित्तप्रकोपाची शक्यता
आपल्या भारतामधील राज्यांचा विचार करता राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश व ओरिसा या राज्यांमध्ये उष्णताजन्य मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मागील एका दशकापासून महाराष्ट्रामध्ये सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पारा ४० अंश सेल्सियसच्या वरची पातळी गाठू लागला आहे आणि २०२२-२३ पासून मुंबई- ठाण्यामध्ये सुद्धा तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचू लागले आहे. उन्हाळ्याचा धोका वयाची साठी ओलांडलेल्या लोकांना अधिक असतो, विशेषतः उष्ण आणि दमट वातावरणामध्ये. हे झाले तात्कालिक- ताबडतोब दिसणारे परिणाम. आयुर्वेदानुसार या शरीरामध्ये वाढणार्या अतिउष्णतेचे दीर्घकालिन परिणामसुद्धा होतात. विविध पित्तप्रकोपजन्य साध्या व गंभीर अशा व्याधींमध्ये मूळ कारण हे ‘उष्णतेचे दीर्घकालीन साहचर्य’ असल्याचे दिसून येते.
मुंबईसारखी जी शहरे दमट तापमानाची आहेत, तिथे हवेतल्या दमटपणामुळे त्वचेवरील घामाच्या बाष्पीभवनाची व पर्यायाने शरीर थंड करण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. हे समीकरण मुंबईप्रमाणेच समुद्रालगतच्या सर्वच गावांना- नगरांना लागू होते. त्यामुळे अशाठिकाणी अतिउष्णतेच्या संपर्कात कामे करणार्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी.