What happens to the body if you consume more than 30 grams of protein: आहारात प्रथिनांचे महत्त्व भरपूर आहे. प्रत्येक सजीवाच्या शरीरातला महत्त्वाचा मूलघटक म्हणजे प्रथिनं. प्रथिने म्हणजे आहारनियमनातील महत्त्वाचा पोषण घटक. प्रथिनांना अनेकदा पोषक तत्वांचा राजा म्हटले जाते. कारण स्नायूंची दुरुस्ती आणि वाढ, प्रतिकारशक्ती, संप्रेरक नियमन (हार्मोन्स संतुलन) आणि वजन नियंत्रण यांसह मुख्य शरीराच्या कार्यांमध्ये त्याची बहुउद्देशीय भूमिका असते. तुम्ही ॲथलिट असाल आणि तुमची कार्यक्षमता वाढवण्याचा विचार करत असाल किंवा स्नायू तयार करण्याच्या उद्देशाने फिटनेसची काळजी घेत असाल किंवा फक्त निरोगी आरोग्यासाठी स्नायू बनवण्याचे उद्दिष्ट असलेली व्यक्ती असाल, तर पुरेशा प्रथिनांचे सेवन करण्याची खात्री करणे आवश्यक आहे. पण, तुम्हाला माहितीये का प्रथिने आपल्या आरोग्यासाठी चांगले असले तरीही त्याचे प्रमाण माहिती असणे गरजेचे आहे. दरम्यान, तुम्ही नाश्त्यात ३० ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने घेतल्यावर काय होते, प्रथिनांचे प्रमाण काय असावे या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना श्री बालाजी मेडिकल कॉलेजमधील नोंदणीकृत आहारतज्ज्ञ आणि बालरोग आणि नवजात पोषणतज्ज्ञ दीपलक्ष्मी श्रीराम यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

“नाश्त्यात ३० ग्रॅम प्रथिने घेणे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर आहे. मात्र, यापेक्षा जास्त प्रथिनांचं सेवन केल्याने अपचनासारख्या पाचन समस्या उद्भवू शकतात, यामुळे निर्जलीकरणदेखील होऊ शकते; कारण प्रथिने चयापचयासाठी कार्बोहायड्रेट्स किंवा चरबी चयापचयापेक्षा जास्त पाणी आवश्यक आहे.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Benefits of lemon water Is Warm Lemon Water On An Empty Stomach Good for You? Expert Says This know more
Lemon water:सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे वाचून व्हाल थक्क

श्रीराम यांच्या मते, आधीपासून किडनीचा आजार असलेल्या व्यक्तींनी उच्च प्रथिनेयुक्त आहार घेऊ नये, कारण त्यामुळे मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.

नाश्ता करताना प्रथिनांचे प्रमाण किती असावे?

पोषणतज्ज्ञ दीपलक्ष्मी श्रीराम म्हणाल्या की, व्यक्तीच्या एकूण दैनंदिन प्रथिनांच्या गरजेनुसार हे बदलू शकते; जे वय, लिंग, वजन आणि फिटनेस यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. न्याहारीसाठी सुमारे १५-३० ग्रॅम प्रथिनांचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं.

हेही वाचा >> Monkeypox Virus: मंकीपॉक्सची भारतात एन्ट्री! गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी? ऐका डॉक्टर काय सांगतात

नाश्त्यासाठी प्रथिनांचे स्त्रोत

शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांमध्ये प्रथिने असतात. यापैकी अंडी, मासे, मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि शेंगा जसे की मसूर, चणे, काळे बीन्स, मूग डाळ, नट आणि बिया, पनीर, सोया उत्पादने. तसेच पोषणतज्ज्ञांनी उच्च-प्रथिने नाश्त्याच्या पर्यायांची काही उदाहरणेदेखील शेअर केली आहेत. जसे की, मूग डाळ इडली, हरभरा डोसा, पनीर डोसा, अंडी डोसा, चणे आणि भाज्या.

Story img Loader