What happens to the body if you consume more than 30 grams of protein: आहारात प्रथिनांचे महत्त्व भरपूर आहे. प्रत्येक सजीवाच्या शरीरातला महत्त्वाचा मूलघटक म्हणजे प्रथिनं. प्रथिने म्हणजे आहारनियमनातील महत्त्वाचा पोषण घटक. प्रथिनांना अनेकदा पोषक तत्वांचा राजा म्हटले जाते. कारण स्नायूंची दुरुस्ती आणि वाढ, प्रतिकारशक्ती, संप्रेरक नियमन (हार्मोन्स संतुलन) आणि वजन नियंत्रण यांसह मुख्य शरीराच्या कार्यांमध्ये त्याची बहुउद्देशीय भूमिका असते. तुम्ही ॲथलिट असाल आणि तुमची कार्यक्षमता वाढवण्याचा विचार करत असाल किंवा स्नायू तयार करण्याच्या उद्देशाने फिटनेसची काळजी घेत असाल किंवा फक्त निरोगी आरोग्यासाठी स्नायू बनवण्याचे उद्दिष्ट असलेली व्यक्ती असाल, तर पुरेशा प्रथिनांचे सेवन करण्याची खात्री करणे आवश्यक आहे. पण, तुम्हाला माहितीये का प्रथिने आपल्या आरोग्यासाठी चांगले असले तरीही त्याचे प्रमाण माहिती असणे गरजेचे आहे. दरम्यान, तुम्ही नाश्त्यात ३० ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने घेतल्यावर काय होते, प्रथिनांचे प्रमाण काय असावे या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना श्री बालाजी मेडिकल कॉलेजमधील नोंदणीकृत आहारतज्ज्ञ आणि बालरोग आणि नवजात पोषणतज्ज्ञ दीपलक्ष्मी श्रीराम यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा