डाएट म्हटलं की -नो कार्ब्स किंवा लो कार्ब्स हा गैरसमज अजूनही आहे. मला तर कोणी “मी कार्ब्स बंद केलेत किंवा कार्ब्सबद्दल कोणीही वाईट बोलू लागलं की कार्ब्स ना सगळे “ए व्हिलन” अशी हाक मारतायत असंच वाटू लागतं आणि त्यांची कणव येऊ लागते. कर्बोदकांचे शरीरातील प्रमाण हे साठवण आणि वाहतूक या दोन प्रकारात होत असते म्हणजे ग्लायकोजनची साठवणूक आणि ग्लुकोजचे रक्तातील वावरणे यावर कर्बोदकांचा शरीरावर होणार परिणाम अवलंबून असतो. सोपं सांगायचं झालं तर आपण खाल्लेली कर्बोदके ग्लुकोज स्वरूपात रक्तात मिसळून त्याचे विघटन होते आणि त्यानंतर ती स्नायू आणि यकृतामध्ये ग्लायकोजन स्वरूपात साठवली जातात. आणि या दोघांचे संतुलन राखण्याचे प्रमाण आपण करत असलेला व्यायाम, हालचाली यामुळे ठरत असते.

आणखी वाचा: Health special: त्वचेचा कर्करोग कसा टाळाल? (भाग दुसरा)

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Cardamom benefit in winter Wonderful Cardamom Benefits You Should Definitely Know About
हिवाळ्यात वेलची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; आहारात समावेश करण्याआधी नक्की वाचा

खरं तर अन्नपदार्थातील कर्बोदके ऊर्जेचा झटपट स्रोत आहेत. आणि त्यांचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत.
१) पिष्टमय पदार्थ आणि २) तंतुमय पदार्थ
पिष्टमय पदार्थ म्हणजे तांदूळ ,गहू , बटाटे, रताळी हे योग्य प्रकारे खाल्ल्यास म्हणजे भाजीचा भाग म्हणून खाल्ल्यास अपाय होत नाही, शक्यतो तळून खाणे टाळावे ! (सॉरी, फ्रेंच फ्राईज फॅन्स)
तंतुमय पदार्थ अर्थात फायबर – यांना आता आहारशास्त्राच्या वेगळं स्थान आहे .
आतड्यातील पचनक्रिया सोपी करणे, शरीरातील साखरेचे संतुलन राखणे, अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी करणे अशी अनेकविध कार्ये करणारे तंतुमय पदार्थ शरीरासाठी वरदान आहेत. तंतुमय पदार्थ आतड्यातील अन्नाचे आकारमान वाढवून मल सरकवायला मदत करतात. बद्धकोष्ठ असणाऱ्या व्यक्तींसाठी तंतुमय पदार्थ गुणकारी आहेत . काकडी , गाजर , पालेभाज्या यांत तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते.

आणखी वाचा: Health special: वृद्धत्व व त्वचारोग

कर्बोदकांबद्दल त्याहून महत्वाचा घटक म्हणजे कर्बोदकांचा ‘ग्लासेमिक इंडेक्स’ ज्याला सामान्यपणे ‘जीआय’ असं म्हणतात. या कर्बोदकांचा ‘जीआय’ जास्त, त्यांचा शरीरातील तो खरा व्हिलन – अर्थात अतिरिक्त साखर साठवून ठेवण्यात या जीआयचा मोठा वाटा असतो. ज्या अन्नपदार्थांचा ‘जीआय’ कमी त्यांचे पचन आणि विघटन सोपे आणि सुलभ होते.

आणखी वाचा: Health special: तृणधान्ये कोणती एकत्र करावीत? कोणती करू नयेत?

कमी जीआय असणारे पदार्थ – तृणधान्ये , कडधान्ये , सफरचंद , पेर , जांभूळ, करवंद इत्यादी
मध्यम जीआय असणारे पदार्थ – गहू, हातसडीचा तांदूळ , ओट्स , अननस , आंबा , रताळं इ .
उच्च जीआय असणारे पदार्थ – मैद्याचे पदार्थ , चिकू , कलिंगड , पांढरी साखर, मिठाई दुग्धजन्य गोड़ पदार्थ इत्यादी .

कर्बोदकांचा शरीरावरील परिणाम हा त्यांच्या एकूण प्रकार आणि प्रमाणावर देखील अवलंबून आहे. म्हणजे आपण पाव खाऊन वाढणारी साखर कायमच जास्त असते आणि संत्र किंवा एखादे फळ खाऊन वाढणारी साखर संतुलित असते .
जर फळाच्या ज्यूसमध्ये साखर एकत्र करून खाल्ल्यास ती तितकीच धोकादायक असते. मधुमेह असणाऱ्यांनी किंवा वजन कमी करू पाहणाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष ठेवायला हवे.

जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे लो कार्ब्स किंवा नो कार्ब्स डाएट/ आहारशैली करू पाहते – तेव्हा खूप थकवा येणे, झोप अपुरी होणे, दिवसभर चिडचिड होणे असे अनुभव येऊ शकतात. याउलट योग्य प्रमाणात खाल्ले जाणारे कार्ब्स शरीरातील आनंदी ग्रंथींना कार्यरत करून मानसिक आरोग्य राखण्यास मदत करतात. मधुमेह असणाऱ्यांमध्ये योग्य कर्बोदकांची निवड करणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे खेळाडू किंवा नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींनी कर्बोदके योग्य प्रमाणात खाणे आवश्यक आहे. भारतासारख्या ऋतुमानानुसार वेगवेगळ्या प्रकारची कर्बोदके संस्कृतीचा भाग म्हणून सामावून घेणाऱ्या देशात योग्य कार्ब्स निवडणे नक्कीच अवघड नाहीये!