‘मला इतकं ब्लोटींग होतं काय सांगू … कधी कधी वाटत नुसती हवा खाऊन पण पोट फुगेल. मी आताच टेस्टदेखील केल्या पण कशातच काहीही नाहीये. कशामुळे होत असावं ? मी काही ज्यूस पिऊन पाहू का? ‘

‘मला पचतच नाही बाहेरच काही – फक्त ढेकर येतात आणि डोकं दुखत. झोपही नीट लागत नाहीये. फक्त गोळ्या आणि गोळ्यांचं घेतेय मी.’

Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
mayonnaise food poisoning banned
‘या’ राज्याने मेयोनीजवर बंदी का घातली? मेयोनीज शरीरासाठी खरंच घातक आहे का?
pushkar jog shares angry post
“कुत्र्यांच्या शेपटीजवळ फटाके लावताना दिसलात तर…”, पुष्कर जोगने दिला थेट इशारा! म्हणाला…
Belly fats how to burn belly fat using 5 20 30 method know from expert
Belly Fats: पोटाची चरबी वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ पद्धत एकदा वापरून पाहा
only mother can do this jugaad
हा जुगाड फक्त आईच करू शकते! चिमुकली औषध पीत नाही म्हणून…; Viral Video एकदा पाहाच

‘मला ना काहीतरी स्ट्राँग सांगा. माझं पोट गोड खाल्ल्याशिवाय भरतचं नाही. आणि पाणी प्यायलं की, तात्पुरतं बरं वाटत’

असे संवाद आहारतज्ज्ञांना अनेक वेळा कानावर पडतात. आहार म्हणजे फक्त खाद्यपदार्थांची निवड किंवा काहीतरी स्ट्राँग असादेखील अनेकांचा समज असतो. मी नेहमी सांगते की, आहारनियमन म्हणजे तात्पुरता उपाय नव्हे तर तुमच्या पचनशक्तीचे संगोपन आहे. आज याच संगोपनाविषयी थोडंसं…

आपण नेहमीच्या जगण्यात ‘आतला आवाज ऐकणे’ असा शब्दप्रयोग करतो. आहारनियमन करताना हा ‘आतला आवाज’ म्हणजे ‘आतड्यांशी मैत्री’! आपण जे पदार्थ खातो त्याचं पचन करणं आणि अनावश्यक पदार्थ शरीराबाहेर टाकून देणं हे काम अथक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आतड्यांत असणारे मायक्रोब महत्त्वाचे असतात. आपल्या खाद्य पदार्थांच्या निवडीवर या मायक्रोबचं प्रमाण अवलंबून असत. सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या रोपट्यासाठी जसं माती आणि खत आवश्यक असतं आणि योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश आणि पाणी मिळताच रोपटं उत्तम वाढत; तसंच आतड्यांमध्ये हे मायक्रोब चयापचय रूपी रोपटं जपत असतात.

हेही वाचा… Health Special: पाऊस सुरु होताना आंबा खावा का?

आपल्या आतड्यांचं आणि मेंदूच समीकरण विलक्षण आहे. आपल्या खाण्यापिण्याचे आणि विचारचक्राचे नाते उलगडून पाहताना आपलं मन, मेंदू आणि आतड्यांत असणार्‍या मायक्रोबंचं विशेष सख्य असल्याचं अनेक प्रयोगांमध्ये आढळून आलेले आहे. आपल्या विचारांशी संलग्न सिग्नल्स आपल्या चयापचय संस्थेला पाठवले जातात. ज्याप्रमाणे आपल्या चेहर्‍यावरचे स्नायू बदलून चेहर्‍यावरचे भाव बदलतात तितक्याच सहजतेने ही प्रक्रिया होत असते. एखाद्या व्यक्तीचा जितक्या तीव्रतेने आपल्याला राग येतो तितक्याच तीव्रतेने पोटातील आम्लांचे प्रमाण बदलत असते. तसेच जेव्हा एखाद्या वेळी खूप वाईट वाटत असताना आतड्यात पीळ पडून आम्ल घुसळून निघत असते. मानसिकरित्या खचून गेलेल्या व्यक्तींमध्ये आतडं तितकंच मलूल होऊन जातं. आपलं आतडं हे आपल्या मेंदूत तयार होणार्‍या प्रत्येक भावभावनांचा आरसा आहे.

हेही वाचा… Mental Health Special: ‘Lockdown Teenagers’च्या समस्या काय आहेत?

गट इन्स्टिक्ट (Gut instinct) किंवा हा ‘आतला आवाज’ आपण अनेक वर्षे ऐकत आलो आहोत, कारण तो प्रखर आहे. जेव्हा सगळ्या प्रकारच्या रक्त चाचण्या, एन्डोस्कोपी करूनही काहीही निदान होत नाही तेव्हा प्रो- बायोटीक आणि विविध औषधे दिली जातात, हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळेच आतड्यांचं आणि मेंदूतील विचारचक्राचं गणित उलगडून पाहणं आवश्यक आहे. बरेचदा आपल्या नेहमीच्या वैचारिकतेचा आपल्या शरीरावर परिणाम होतोय, हेच माहीत नसल्यामुळे वेगवेगळी औषधे, काढे, गोळ्या घेतल्या जातात. या प्रयोगांमध्ये मायक्रोब्सचं प्रमाण अत्यल्प होत जातं. त्यामुळे त्यांचं प्रमाण योग्य राखण्यासाठी पोषक आहार घेणं आवश्यक आहे. जसं रोपटं माफक पाणी, सूर्यप्रकाश आणि खत मिळाल्यावर उभारी घेत तशीच आपली पचनसंस्था पाणी, योग्य वैचारिकता आणि आहारामुळे निरोगी आरोग्य राखत असते.