पल्लवी सावंत पटवर्धन

२०२३ सरता सरता मुंबईत पोषणशास्त्रावर एक व्याख्यान करण्यात आलं होतं. व्याख्याते नवे होते आणि तिथे गेल्यावर कळलं की ते समाजमाध्यमावर (इन्स्टाग्रामवर ५०००० फॉलोअर्स असणारे आहारतज्ज्ञ) होते. ते स्टेज वर जाण्याआधी त्यांच्याबरोबर फोटो मिळावा म्हणून धडपड सुरु होती. रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि आश्वासक देहबोली असणाऱ्या या आहारतज्ज्ञांनी व्यासपीठावर प्रवेश करताना एका कोपऱ्यावरुन खूप मोठ्याने त्यांचं स्वागत केलं गेलं. माझ्या आजूबाजूची माणसंही आश्चर्याने पाहू लागली. मी कुतूहलाने त्यांचं बोलणं ऐकू लागले.

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Health tips diet advice from social media influencers can be harmful
तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा डाएट सल्ला ऐकत असाल तर सावध व्हा; शरीरावर होऊ शकतो घातक परिणाम
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया

​त्यांचा विषय होता स्निग्ध पदार्थ , किटो आहार आणि शरीरयष्टी. अचानक त्यांनी वजनाबद्दल बोलायला सुरुवात केली. वजन कमी करणे कसे महत्त्वाचे आहे, चालणे असे आवश्यक आहे. डाएट म्हणजे काय? नेहमीच्या आहारात पोषण घटकांचे प्रमाण कसे असायला हवे. त्यांचं व्याख्यान संपेपर्यंत मी त्यांच्या बोलण्यात त्यांचा विषय शोधत राहिले. मनातून खट्टू होत मी आयोजकांपैकी एकाला विचारलं या गृहस्थांना बोलायला दिलेला विषय वेगळा होता असं नाही वाटत का? त्यांनी हताश होऊन माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, प्रायोजकांना जास्तीत जास्त फॉलोअर असणारी व्यक्ती हवी होती’.

आणखी वाचा-Health Special: थंडीमध्ये सकाळी लवकर अन्नसेवन का करावे?

प्रसंग दुसरा

जागतिक पोषण विषयावर आधारित व्याख्यानमाला सुरु होती आणि सुप्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळख करून दिलेली “इन्फ्लुएन्सर” व्यक्ती व्याख्याती म्हणून समोर उभी राहिली. उत्तम आलेख, चित्रे वापरून त्यांनी सुरेख सादरीकरण केले. विषयानुरूप बोलण्याला बेमालूम बगल देत त्यांनी मेडिटेशन आणि स्वतःची काही तत्त्वं सगळ्यांसमोर मांडली. समोरचा श्रोतावर्ग त्यांच्या बोलक्या खेळाला बळी न पडता शांतपणे सादरीकरण संपायची वाट पाहत बसला होता. त्यांनाही हे जाणवलं असावं. त्यांनी हलकेच व्याख्यान संपवून काढता पाय घेतला आणि आम्ही आहारतज्ज्ञांनी सुटकेचा निश्वास सोडला.

आयोजकांशी बोलताना जाणवलं की या विशेष पाहुण्यांचं सदर त्यांच्याच इच्छेखातर ठेवण्यात आलं होतं. वरील दोन्ही प्रसंग सांगण्याचा मुद्दा हा की या दोन्ही बाबतीत प्रबोधनहून प्रसिद्धी महत्वाची असा सूर होता. समाज प्रबोधन करताना विशेषतः ते त्याला विज्ञाननिष्ठ, योग्य आणि विषयानुरूप आयाम असणं आवश्यक असतं. आहारतज्ज्ञ म्हणून काम करताना आपण समाजाच्या प्रगतीशील असण्याशी संलग्न आहोत ही जाणीव कायम मनात असणं आवश्यक आहे.

आज हे सगळं सांगण्याचं निमित्त म्हणजे जागतिक आहारशास्त्र दिन. योग्य आहारशास्त्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतातील विविध राज्यांमध्ये २ ते ५ वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. गेली अनेक वर्षे स्त्रियांचे वर्चस्व असणाऱ्या या शाखेत सध्या पुरुष आहारतज्ज्ञांची संख्यादेखील वाढते आहे .

३ वर्षे आहारशास्त्र /पोषण विज्ञान
२ वर्षे मास्टर्स / डिप्लोमा

आहारशास्त्राचं शिक्षण घेताना ३ ते ६ महिने संबंधित आहारशास्त्र शाखेसंलग्न इंटर्नशिप याचा समावेश असणं अत्यावश्यक असतं. वैद्यक , क्रीडा पोषणविषयक, शिशु आहारशास्त्र ,अतिदक्षता विशेष, मधुमेह विशेष, सूक्ष्मजैव विशेष अशा विविध उपशाखांसाठी आहारतज्ज्ञांना प्रशिक्षित केलं जातं.
अनेक आहारशास्त्रातील विद्यार्थी आहारशास्त्राविषयक संशोधन शाखेकडे वळतात.

आणखी वाचा-Health Special : पिझ्झा हेल्दी कसा करावा? 

आहारशास्त्रातील साधारण २ ते ५ वर्षांनी बदलणारे निकष , समाजातील विविध स्तरांमधील आहारविषयक आवश्यक बदल यानुसार आहारशास्त्रातील मूळ तत्त्वांशी आणि वैज्ञानिक संदर्भाशी समाजाला जोडून ठेवणं आणि समाजातील अत्यावश्यक गरजांमधील “अन्न ” या घटकाभोवतीची वैज्ञानिक वीण मजबूत ठेवण्याचं काम आहारतज्ज्ञ करतात.

अन्न ही आपली मूलभूत गरज आहे आणि त्यासंबंधी योग्य ज्ञान, त्यामागचं विज्ञान, तथ्य , मिथ्य जाणून घेणं हीदेखील तितकीच महत्वाची गरज आहे. आहारतज्ज्ञाचा सल्ला आचरणात आणणं, चुकीच्या सल्ल्यांबद्दल सजग राहणं, योग्य प्रश्न विचारणं ही आपलीच जबाबदारी आहे. सध्याच्या शाब्दिक भूलप्रयोगाच्या सुळसुळाटात चुकीच्या चटपटीत आहार सल्ल्याची आपल्या शरीराला भूल पडू देऊ नये यासाठी दक्ष राहणं ही आपली जबाबदारी आहे.

आजच्या आहारशास्त्र दिनानिमित्ताने आहारशास्त्रामधील सुजाण, सजग, प्रामाणिक आहारतज्ज्ञांना भरपूर शुभेच्छा! तसेच आहारशास्त्रावर विश्वास ठेवून स्वतः सुजाण होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक आहार जाणकाराचं मनपूर्वक अभिनंदन!

Story img Loader