पावसाळ्यामध्ये आजारी पडणाऱ्यांची संख्या अधिक असते. अर्धे रुग्ण हे पोटाच्या विकाराने त्रस्त असतात, त्याचा संबंध दूषित पाण्याशी अनेकदा असतो. तर उर्वरित रुग्णांना सर्दी- ताप- खोकल्याने गाठलेले असते. दरवर्षी पावसाळ्यात हेच चित्र पाहायला मिळते. पण आपणच काही खास काळजी घेतली तर हे टाळताही येवू शकते. त्यामुळे जाणून घेवूया, पावसाळ्यात घ्यावयाची काळजी…

१) पावसाळ्यामध्ये पाणी साचल्यामुळे डेंग्यू मलेरिया लेप्टोस्पिरोसिस व पोटाचे विकार इत्यादी आजार होऊ शकतात. म्हणूनच पावसाळ्यात आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक असते.

prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?

२) पाणी: पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. कारण, नदी, नाले विहिरी, तळी यांच्यात येणारे पाणी बऱ्याच घाणीतून प्रवास करुन येत असते. पण बऱयाच जणांना उकळलेल्या पाण्याची चव आवडत नाही. आजकाल सर्वांच्या घरी फिल्टर किंवा आर ओ (Reverse Osmosis) चे मशीन असते. परंतु ज्यांना ते शक्य नाही त्यांनी पावसाळ्याच्या वेळी नगरपलिकेकडून क्लोरिनच्या गोळ्या/ थेंब मिळतात, ते प्यायच्या पाण्यात टाकल्याने पाणी शुध्द होण्यास मदत होते. विकत मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या चांगल्या असतात. परंतु हल्ली तेथेही कधी कधी भेसळ असते. पावसाळ्यातील नवे पाणी बाधते. लोकांना सर्दी-पडसे याचा त्रास होत राहतो. ते टाळण्यासाठी म्हणून पाण्यात (पिंपात) सुंठेचा एक तुकडा घालावा, तो दर तीन-चार दिवसांनी बदलावा.

हेही वाचा… Health Special: पावसाळ्यात आजार बळावण्याचे कारण काय?

३) अन्न: पावसाळ्यात पचायला हलका आहार व प्रमाणशीर असाच आहार असावा. अधिक प्रमाणात घेतलेला आहार जो पचायला कितीही हलका असला तरी अयोग्यच! पचायला हलका आहार म्हणजे अग्निसंस्कार केलेला आहार. लाह्या, भाकरी, चपाती, दूधभात पिठले असा आहार, नुसत्या पावापेक्षा त्याचा टोस्ट बनवून खावा.

४) पावसाळ्याच्या सुरुवातीला शरीरात अग्नी कमी प्रमाणात असतो, जो अन्नपचनासाठी आवश्यक असतो. त्यामुळे या ऋतूत पक्वान्ने टाळावीत. मात्र स्वयंपाकाचे पदार्थ तेल-तुपाने मसाल्याचे चमचमीत बनवलेत तरी चालेल. आपण स्वयंपाकात जे हिंग मिरी, आलं, लसूण, कडीपत्ता, कोथिंबीर, पुदीना इ. वापरतो, ही सर्व द्रव्ये दीपन-पचन करणारी आहेत. थोडक्यात, म्हणजे अन्नपचनाला मदत करणारी आहेत. मोजकेच तेल, वात कमी करणारे आहे तर साजुक तूप, वात व पित्त दोन्ही कमी करणारं आहे. कारण पावसाळयात वात व पित्त दोन्ही वाढलेले असते म्हणून जमल्यास अन्नपदार्थ साजुक तुपात करावेत; वनस्पती तुपात नव्हे.

हेही वाचा… Health Special: चिंता/ काळजीचे रूपांतर मनोविकारात केव्हा होते?

५) तेलातील विशिष्ट घटकामुळे पित्त वाढते आणि वर्षा ऋतू म्हणजे पित्तसंचयाचा ऋतू ! म्हणून तेलात तळलेले पदार्थ या दिवसात खाऊ नयेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला गरम भजी, बटाटेवडे खावेसे वाटले तरी, प्रमाणात खाल्लेले बरे. अन्यथा असे पदार्थ जास्त खाणे म्हणजे आजारांना निमंत्रणच.

६) या ऋतूत दही कमी खावे. दह्यामुळे शरीरातील अग्नी मंदावतो, पण ताक याच्याविरुध्द गुणधर्माचे आहे. म्हणून या दिवसात ताक प्यावे. सुंठ, आलं व सैंधव मीठ घातलेले ताक व दह्याच्या वरचे पाणी नियमित प्यावे.

७) पालेभाज्यांमध्ये माठाची भाजी योग्य. शिवाय दुधी, दोडका, पडवळ, भेंडी, अशा वातशामक भाज्या अधिक प्रमाणात घ्याव्यात.

८) जुने धान्य पचावयास हलके असते. त्यामुळे या ऋतूत जुने गहू, जुने तांदूळ, जुनी धान्ये (मूग, मटकी, चवळी) वापरावीत. आवळा, लिंबू यांची सरबते उत्तम. ओवा, हळद, मिरी, सुंठ यांची पावडर करुन भाकरी, चपातीत वापरल्यास उत्तम.

९) मांसाहारी व्यक्तीने मांस खाण्यापेक्षा त्याचे सूप करुन प्यावे. यातही सुंठ, मिरी, पुदीना इ. चा सढळ हाताने वापर करावा.

हेही वाचा… Health Special: पावसाळी आहार कसा असावा? (पूर्वार्ध)

आपल्या संस्कृतीत आषाढी ते कार्तिकी एकादशीपर्यंत “चातुर्मास” पाळला जातो. यामध्ये मांसाहार बंद असतो व उपवास जास्त असतात. उपवासाच्या पदार्थांत पिष्टमय पदार्थ जास्त असतात व ते पचण्यास सोपे असतात. उपवासात पोटास आराम मिळतो. म्हणून चातुर्मासाचे जरी धार्मिक निमित्त असले तरी, त्यामागे वैज्ञानिक कारणही असण्याची शक्यता आहे.

नेहमी लक्षात ठेवा, तुमचे पोषण आणि प्रतिकारशक्ती तुम्ही खात असलेल्या अन्नावर अवलंबून असते. म्हणून, तुम्ही काय खात आहात याची जाणीव ठेवली पाहिजे. महामारीच्या काळात किंवा पावसाळ्यात, तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असताना, तुमच्या आहारावर आणि सुरक्षिततेवरही लक्ष केंद्रित करा!