आपण गेल्या भागात मायक्रोबायोमबद्दल म्हणजे सूक्ष्म जैविकांबद्दल जाणून घेतलं. आहार नियमन आणि सूक्ष्मजैविके यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे आजच्या भागात आहाराशी संबंधित काही संप्रेरके आणि त्यांचं सूक्ष्मजैविकांशी असलेले नातं आपण जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेप्टीन

भूक शमली आहे, असं आपल्या मेंदूला सांगणार संप्रेरक म्हणजे लेप्टीन! लेप्टीन रक्त आणि मेंदूतील संवाद सुलभ करते (ज्याला वैद्यकीय भाषेत BBB -ब्लड -ब्रेन बॅरिअर म्हटले जातं) लेप्टीन आपल्या न्यूरॉन्सवर परिणाम करतं. ज्यात टायरोसीन आणि अगौटी प्रोटीन यांचे संतुलन राखत भूक भागल्याचं मेंदूला अधोरेखित केलं जातं. ज्यावेळी शरीरात विशेषतः आतड्यांत योग्य प्रमाणात सूक्ष्मजैविके असतात तेव्हा लेप्टीन वर होणार परिणाम वेगळा आहे, असं आढळून आलेलं आहे. अतिरिक्त तेल असणाऱ्या आहारातून सूक्ष्मजैविकांवर परिणाम होतो आणि त्यांचं प्रमाण कमी होऊ शकत. मात्र चयापचय क्रियेच्या वेगावर याचा परिणाम होतो आणि भूक अचानक वाढू शकते. प्री-बायोटिक्स किंवा प्रोबायोटिक्सचे सेवन केल्यानंतर मात्र लेप्टीनवर उत्तम परिणाम होऊन चयापचय क्रिया संतुलित होऊ शकते.

इन्सुलिन

लेप्टीन आणि घ्रेलिन प्रमाणेच आणि तितकाच प्रभावी असणारा भुकेसाठी कारण असणारं संप्रेरक म्हणजे इन्सुलिन. इन्सुलिन भूक शमल्याचे दर्शविते आणि सोबत चयापचय क्रियेवर देखील परिणाम करते. आतड्यांतील सूक्ष्मजैविकांचा समुदाय इन्सुलिनला प्रभावित करतो. जितकं यांचं प्रमाण जास्त तितका इन्सुलिनवर नेमका अंकुश असतो.

ग्लुकागॉन

खरं तर ग्लुकोजचे योग्य विघटन होण्यात या संप्रेरकाचा मोलाचा वाटा आहे, असे संशोधनातून आढळून आले आहे. योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थांचे सेवन केल्यास सूक्ष्म जैविकांचे प्रमाण मुबलक राहते परिणामी ग्लुकागॉनचे कार्य सोपे होऊन जाते. केवळ ग्लुकागॉनचे एककलमी कार्य नसून यात शरीरातील अम्लांचा देखील समसमान वाटा असतो.

ग्लुकागॉन

खरं तर ग्लुकोजचे योग्य विघटन होण्यात या संप्रेरकाचा मोलाचा वाटा आहे, असे संशोधनातून आढळून आले आहे. योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थांचे सेवन केल्यास सूक्ष्म जैविकांचे प्रमाण मुबलक राहते परिणामी ग्लुकागॉनचे कार्य सोपे होऊन जाते. केवळ ग्लुकागॉनचे एककलमी कार्य नसून यात शरीरातील अम्लांचा देखील समसमान वाटा असतो .

आपल्या आतड्यात सूक्ष्मजीवांचे समुदाय वेगवेगळ्या घनतेने कधी दाटीवाटीने, तर कधी अत्यल्प प्रमाणात नांदत असतात. त्यांच्यामार्फत शरीरात या संप्रेरकाशी समसमान प्रथिने तयार करून भूकेवर संयम ठेवणे शक्य असते. उदाहरण द्यायचं झालं तर ए-coli शरीरात अशा प्रकारचे घटक तयार करतं ज्यामुळे भूक शमल्याचं आपल्या मेंदूला जाणवतं. गमतीची गोष्ट अशी की, नेमकं खाणं खाल्ल्यास हीच सुखजैविके खाण्यामुळे “तृप्त” झाल्याचा निरोप मेंदूपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे आपल्याला सहजी आवश्यक भुकेचा अंदाज येतो.

लठ्ठ व्यक्तीमध्ये किंवा अतिरिक्त चरबीचे प्रमाण जास्त असणाऱ्या लोकांमध्ये आपण सरसकट पदार्थांची बंदी ठरवून ठेवतो आणि मनाविरुद्ध अनावश्यक बंधने घालतो. त्यांचा थेट परिणाम आपली भूक, चयापचय क्रिया, भुकेची संप्रेरके यावर होत असतो. त्यामुळे अनेक स्वयं-आहार नियमांचे प्रयोग फसतात. अशा व्यक्तींमध्ये घेतला जाणारा आहार आणि त्याचे सूक्ष्म जैविकांवर होणारे परिणाम यावर विचार होणंदेखील आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special who sends the message to the brain that you are hungry or not hldc dvr