‘आई, मी आले गं कॉलेज मधून, भूक नाही मला अजिबात’, प्रणाली घरात आल्या आल्या आईला म्हणाली. आई जणू ती घरात शिरण्याचीच वाट पाहत होती. ती तरातरा प्रणालीच्या खोलीत आली आणि म्हणाली, ‘आज तुझे कपाट आवरले मी’. प्रणाली जागीच उभी राहिली आणि अचानक आईवर चिडली. ‘तू का हात लावलास माझ्या कपाटाला? मी मला हवे तेव्हा कपाट आवरेन नाही तर नाही आवरणार ! काय फरक पडतो? कोण बघायला येणार आहे माझे कपाट’? आईही चिडली. म्हणाली, ‘मी आई आहे तुझी. कॉलेजमध्ये जातेस म्हणजे काही फार मोठी झाली नाहीस! किती पसारा होता! कपडे नुसते कोंबून भरलेले! तो एक क्रॉप टॉप कधी आणलास? मी बघितलेला नाही तो कधी! आणि एक ग्रीटिंग कार्ड मिळाले. अभिजीतने दिलेले. कोण हा? लाल गुलाबांचे चित्र आहे कार्डावर ! काय चाललंय काय? आम्ही लाड करतो म्हणून काय झालं? आपलं वागणं स्वच्छ हवं. समजलं’? प्रणाली आणखीच चिडली आणि आई मुलीच्या वादाला तोंड फुटले. प्रणालीच्या मते एक मुलाने ग्रीटिंग कार्ड दिल्याने काही फरक पडत नाही. ती म्हणाली त्याप्रमाणे तिचा त्या मुलाशी काही संबंध नाही. दुसरे आईने तिला त्यावरून ‘जज’ करू नये.. तसेच प्रणालीला वाटले क्रॉप टॉप एखादेवेळेस मैत्रिणींबरोबर घालायला काय हरकत आहे? आई म्हणजे फारच जुनाट कल्पना बाळगते! काकूबाईसारखे कपडे घातले तरच मुलीचे वागणे बरोबर का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा