“कानाला ear pods लावून (माझ्या आईच्या भाषेत ‘कानात बोळे घालून’) आपल्याच नादात गाणे ऐकत होते. एकीकडे आपोआप हातवारे करत होते. समोरून एक आजोबा आले, इतके विचित्र नजरेने त्यांनी माझ्याकडे पहिले म्हणून सांगू? ‘काय विक्षिप्त आहे ही’ असे जणू त्यांची नजर म्हणत होती.” शाल्मली सांगत होती.

आणखी वाचा : Health special: तुम्हाला होणाऱ्या वेदनेची तीव्रता कशावर ठरते?

hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
loksatta readers feedback
लोकमानस: संशय आणि असुरक्षिततेचा परिणाम

‘माझ्या मनात दुखतंय, खुपतंय’ किंवा ‘काय विक्षिप्त आहे ही’ या वाक्यांमधून एखाद्याची भावनिक स्थिती, एखाद्याच्या वागण्यातील विचित्रपणा व्यक्त होतो. कधी कधी ही मानसिक विकारांची लक्षणे असू शकतात. पण केवळ एका लक्षणाने मानसिक आजाराचे निदान करता येत नाही. त्यासाठी रुग्णाच्या विचार- भावना आणि वर्तणूक या सगळ्यातील बदलांचा आढावा घ्यावा लागतो.

आणखी वाचा : Health special: मुलांना विकार आणि आजारांपासून दूर कसे ठेवाल?

ताप आला तर त्याची ज्याप्रमाणे अनेक कारणे असू शकतात, तसेच केवळ कोणीतरी स्वतःशी बोलते आहे, हातवारे करते आहे म्हणून स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर मानसिक रोगाचे निदान करता येत नाही. एखादा मानसिक विकार ओळखायचा असेल तर विविध लक्षणे एकत्रितपणे किमान काही काळ पर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये असावी लागतात आणि त्या लक्षणांचा त्या रुग्णाच्या जीवनावर झालेला परिणाम दिसून यावा लागतो. लक्षणावर आधारित मानसिक विकारांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेल्या वर्गवारीनुसार मनोविकारतज्ज्ञ (psychiatrist) आणि मानसोपचारतज्ज्ञ (psychologist) मनोविकारांचे निदान करतात आणि उपायांची योजना करतात.

आणखी वाचा : Health special: नॉर्मल काय नि ॲबनॉर्मल काय? कसा ओळखाल मानसिक विकार? 

बालपणापासून वर्धक्यापर्यंत कोणत्याही वयोगटात मानसिक विकार होऊ शकतो. अतिचंचलता (Attention deficit hyperactivity disorder), स्वमग्नता(autistic spectrum disorder) अशा विशेषतः बालपणात आढळणाऱ्या मानसिक आजारांपासून स्मृतिभ्रंशासारख्या (dementia) मुख्यत्वे वार्धक्यामध्ये आढळणाऱ्या मानसिक आजारापर्यंत अनेक मानसिक विकार आढळतात. उदासीनता(depression), अतिचिंता(anxiety disorder) हे सर्वत्र आढळणारे मानसिक विकार आहेत, तर स्किझोफ्रेनिया (schizophrenia), उन्माद(mania) हे गंभीर मानसिक आजार आहेत.

आपण बाजारात जातो तेव्हा कुठल्याही उत्पादनावरचे(डब्यावरचे, बाटलीवरचे) ‘लेबल’ पाहतो. हे लेबल आपल्याला कंपनीचे नाव सांगते, त्याची किंमत सांगते, त्याचे गुणधर्म सांगते. लेबल पाहून आपण एखादी गोष्ट विकत घ्यायची की नाही ते ठरवतो. किंवा लेबल पाहून आपण एखादी गोष्ट चांगली की वाईट तेही ठरवतो. दुर्दैवाने, मानसिक आजाराचे ‘लेबल’ लागले तर काही खरे नाही, असे प्रत्येकालाच वाटते! एखाद्या मनोविकाराचे निदान झाले तर रुग्ण आणि नातेवाईक दोघांनाही कमीपणाचे वाटते. अनेकदा असेही विचारले जाते की, नाहीतरी प्रत्येकाला कधी ना कधी उदास वाटते, मनात चिंता प्रत्येकाच्याच असतात, कधी मधी संशय प्रत्येकालाच येतो, मन शंकाखोर अनेक वेळा होते, मग एखाद्यालाच विशिष्ट निदान (diagnosis) देण्याची काय गरज? त्यामुळे एक तर त्याला आणि कुटुंबाला कलंक लागतो. ते ‘लेबल’ चिकटले की आजूबाजूच्या लोकांचीही दृष्टी बदलते. रुग्णाच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. त्याला अनेक संधींना मुकावे लागते.

एखादे लहान मूल चपळ असते आणि एका जागी स्थिर बसत नाही. त्याला लगेच अतिचंचल म्हणायचे? वय झाले की सगळेच हळू हळू विसरायला लागतात, थोडासा एकटेपणा येतोच. लगेच आपण त्याला डिमेन्शियाचे नाव द्यायचे? असे केल्याने उलट आपण त्या माणसाचे नुकसानच करत नाही का? “आमच्या वडीलांना हल्ली थोडे विस्मरण व्हायला लागले होते. डिमेन्शियाविषयीचा एक लेख माझ्या वाचनात आला आणि मी अस्वस्थ झाले. वाटले, बाबांना दाखवले पाहिजे. लगेच सायकीयाट्रिस्टकडे घेऊन गेले. अनेक तपासण्या झाल्या. लक्षात आले, अगदी वेळेवर नेले त्यांना… काहींना उपचार सुरु झाले, डिमेन्शिया या आजाराची माहिती मिळाली आणि कशी काळजी घ्यायची याची मानसिक तयारी करता आली.

“मागच्या वर्षी तीन महिने मी रजा टाकून घरी बसले. दिवसभर काही न करता झोपून असायचे. माझी मैत्रीण मला पाहून हादरलीच. ओढत ओढतच ती मला डॉक्टरकडे घेऊन गेली. डिप्रेशन असे निदान झाले. औषध घ्यायला लागले आणि थेरपी सुरू केली. पुढच्या काही महिन्यात आयुष्य पूर्वपदावर आले होते!”

…अशा कितीतरी कहाण्या, कितीतरी पेशंटचे अनुभव! मानसिक त्रासाला योग्य नाव म्हणजेच योग्य निदान झाल्यामुळे त्यांच्या आयुष्यात झालेले परिवर्तन! अचानक आपल्या अनुभवांना, अस्वस्थ करणाऱ्या भावनांना अर्थ आहे असे त्यांच्या लक्षात येते. एखादा पेशंट जे वागतो आहे ते तसे का वागतो आहे हे समजते. पेशंटचे वागणे बोलणे, ही कोणत्या तरी आजाराची लक्षणे आहेत, त्या आजाराविषयी डॉक्टरांना माहिती आहे आणि काही उपचार करता येऊ शकतात, ह्यामुळे तर फार धीर येतो. योग्य निदान म्हणजे पुढची दिशा स्पष्ट होणे. नातेवाईकांच्या दृष्टीने तर ते फार आश्वासक ठरते.
अनेकदा, एकच मनोविकार असलेले रुग्ण उदा. डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया किंवा व्यसनाधीनता असलेले, एकत्रितपणे गटामध्ये आपल्या समस्यांची, अनुभवांची चर्चा करतात आणि त्याचा सगळ्यांनाच उपयोग होतो. नातेवाईकांचेसुद्धा असे गट असतात. आपल्या आपल्या रुग्णाची काळजी घेताना अशा गटशः चर्चांचा खूप फायदा होतो.

एखाद्याचे योग्य निदान झाले तर उपचार करणाऱ्यांनासुद्धा औषध योजना आणि मानसोपचार यांचा आवश्यक असा वापर करता येतो, पेशंटच्या प्रगतीचा आलेख मांडता येतो. एखाद्या मानसिक आजाराचे निदान हे केवळ ठोकताळे बांधून केलेले नसते. शास्त्रीय वर्गवारीमध्ये विविध मानसिक रोगांच्या लक्षणांचे वर्णन असते, अनेक मानसिक चाचण्या उपलब्ध असतात आणि अर्थात त्या त्या मनोविकारतज्ज्ञाचे, मानसोपचारतज्ज्ञाचे कौशल्य ही असते. प्रशिक्षण आणि संशोधन या साठीही मानसिक विकारांच्या निदानाची आवश्यकता असते. असे म्हणता येईल की योग्य नाव म्हणजे निदान हे मनोविकाराच्या योग्य इलाजासाठी आणि पेशंटच्या आयुष्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी आवश्यक आहे. हे नाव ‘लेबल’ नाही, हे पाहणे आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे!