जूनचा पहिला आठवडा सुरू झाला की, लोकांना पावसाचे वेध लागतात. अंगाची काहिली करणार्‍या उष्म्याने नागरिक इतके त्रासलेले असतात की, ते पावसाची चातकासारखी वाट पाहात असतात. पाऊस कधी येईल या आशेने शेतकरीसुद्धा आकाशाकडे नजर लावून बसलेले असतात… कधी एकदा पाऊस येईल आणि पेरण्या सुरू करता येतील, अशी त्याची स्थिती असते. अशा वेळी हवामानतज्ज्ञ ढग वाहून आणणार्‍या वार्‍यांचा अभ्यास करून अंदाज वर्तवत असतात. आपल्या देशात पडणार्‍या पावसाचे ढग हे पश्चिम दिशेकडूने येणार्‍या वार्‍याकडून वाहून आणले जातात.

आणखी वाचा: Health Special: चिंता/ काळजीचे रूपांतर मनोविकारात केव्हा होते?

nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
The minimum temperature in Mumbai is decreasing and the winter season is beginning Mumbai print news
मुंबईत थंडीची चाहुल
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान

वर्षा ऋतूमध्ये पश्चिमेकडून येणारे वारे वाहतात याचा उल्लेख आयुर्वेदीय ग्रंथांमध्येही आढळतो. पाणी म्हणजेच वरुण देवतेला आणणारे या अर्थाने या वार्‍यांना आयुर्वेदाने ‘वारुण वारे’ असे संबोधले आहे. वरुण देवता ही पश्चिम दिशेची अधिष्ठाती देवता आहे. साहजिकच या ऋतूमध्ये पश्चिम दिशेचे म्हणजे वरुण देवतेचे वारे वाहू लागतात, अशी मान्यता आहे. जोवर हे वारे ढगांना वाहून आणत नाहीत तोवर काही पाऊस येत नाही. निसर्गचक्रामध्ये आणि आपल्या आयुष्यातसुद्धा वार्‍यांचे किती महत्त्व आहे, हे इथे अधोरेखित होते. मात्र, या प्रत्येक दिशेच्या वार्‍यांचेही स्वतःचे असे गुण-दोष असतात; ज्यांचा आरोग्यावर बरा-वाईट परिणाम होऊ शकतो, हे माहीत आहे का?

आणखी वाचा: Health Special: पावसाळी आहार कसा असावा? (पूर्वार्ध)

आयुर्वेदशास्त्राने या वार्‍यांचा आरोग्यावर होणारा परिणामसुद्धा अभ्यासला. आपल्याकडे पाऊस घेऊन येणार्‍या या पश्चिम दिशेच्या वार्‍यांचे जे गुण-दोष आहेत, ते पुढीलप्रमाणे :
पश्चिम दिशेकडून वाहून येणारे वारे हे अतिशय सूक्ष्म, रुक्ष (कोरडे) व खर (खरखरीत) असतात. ज्यामुळे ते सूक्ष्म-रुक्ष-खर गुणांच्या वाताचा प्रकोप करतात; अर्थात वात वाढवतात. दुसरीकडे ते अतिशय तीक्ष्ण असल्याने रक्त व पित्तसुद्धा वाढवतात. एकंदरच या वार्‍यांमध्ये शोषक गुण आहे. त्यामुळेच शरीरामधील पाणी शोषण्याचा या वार्‍यांचा गुण त्यांच्यात असतो; जो मेद व चरबी घटवण्याचे व कफनाशनाचे कार्य करतो. साहजिकच कफामुळे अर्थात शरीरामध्ये पाणी जमल्याने येणार्‍या सुजेमध्ये हे वारे उपकारक असतात आणि जखमांमधील द्रव शोषून जखमा भरण्यासही सहायक होतात. हाच शोषक गुण शरीराला आवश्य़क असणारा स्नेह व ओलावा शरीरामधून शोषत असल्याने हे पश्चिमेचे वारे शरीराचे बल कमी करून शरीराला सुकवतात आणि क्षयाला कारणीभूत होऊ शकतात. त्याचमुळे या वार्‍यांना शास्त्राने बल घटवणारे म्हटले आहे.

आणखी वाचा: Health Special: (आतड्यांचा) ‘आतला आवाज’ म्हणजे काय?

एक ऋतू संपून नवीन ऋतू सुरू होताना वास्तवात तो बदल सावकाश होणे अपेक्षित असते. मागच्या ऋतूची लक्षणे हळूहळू कमी होत जातात आणि पुढच्या ऋतूची लक्षणे हळूहळू दिसू लागतात. ऋतूमध्ये असा नैसर्गिकरीत्या झालेला बदल सहसा आरोग्याला तेवढासा बाधक होत नाही. ‘ऋतूमध्ये होणारा अकस्मात बदल’ हे काश्यप संहितेने शरीर-संचालक वात-पित्त-कफ या तीन दोषांमध्ये विकृती होण्याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे आणि ते आयुष्य क्षीण करण्यास कारणीभूत होते, असेही म्हटले आहे.

आज २१ व्या शतकामध्ये तर निसर्गाचे हे ऋतुचक्र अनैसर्गिक झाले आहे. ग्रीष्मातल्या कडक उन्हाळ्यामध्ये दिवसभर कडक ऊन, सूर्याकडेच काय आकाशाकडेही पाहता येणार नाही अशी तीव्र सूर्यकिरणे, उष्म्याने शरीरात वाढलेली उष्णता, घामाच्या धारा अशा वातावरणामध्ये अचानक एक दिवस गार वारे वाहू लागतात. आकाशात काळे ढग दाटून येतात आणि पावसाचे थेंब पडू लागतात. वातावरणातला उष्मा नाहीसा होऊन हवेत थंडावा पसरतो. सभोवतालच्या वातावरणातला हा अकस्मात झालेला बदल मनाला सुखावह वाटू लागतो. मात्र, मनाला आनंद देणारा हा बदल शरीराला सुखावह होईलच असे नाही. त्यातही जे शीत प्रकृतीचे आहेत त्यांना तर नाहीच!

गेले काही महिने उष्ण वातावरणाशी जुळवून घेतलेल्या शरीराला वातावरणातला हा अकस्मात बदल त्रासदायक होतो. या नवीन शीत-आर्द्र वातावरणाशी जुळवून घ्यायला शरीराला थोडा वेळ लागतो आणि जेवढे दिवस जुळवून घ्यायला लागतात, तेवढे दिवस स्वास्थ्य बिघडते. एक ऋतू सुरू होऊन दुसरा ऋतू सुरू होण्याच्या या काळाल ऋतुसंधिकाळ म्हणतात.
या ऋतुसंधिकाळात बहुधा सर्वांचे आरोग्य बिघडते. या दिवसांमध्ये ज्यांचे स्वास्थ्य बिघडत नाही ते खरे निरोगी. म्हणूनच तर स्वस्थ व्यक्तीची लक्षणे सांगताना जो थंडी-ऊन-पाऊस सहन करूनही आपले आरोग्य टिकवून ठेवतो, त्याला आयुर्वेदाने ‘स्वस्थ माणूस’ म्हटले आहे. सर्वसामान्य माणसे मात्र या दिवसांमध्ये आजारी पडतातच. या दिवसांत आपले स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठीच आयुर्वेदाने ऋतुचर्या सांगितलेली आहे.
सहसापरिवर्तादृतोस्तथा…त्रयो दोषाः प्रकुप्यन्ति क्षीणे चायुषि भार्गव।।

टीप- आयुर्वेदाने हजारो वर्षे निसर्गाचे निरिक्षण करून सांगितलेल्या या विचारांमागील अर्थ
समजून घेऊन, त्यांचा वैज्ञानिक अभ्यास व्हायला हवा.