पावसाळा सुरू झाला की, अनेक संसर्गजन्य आजारांचेही प्रमाण वाढते. पावसाच्या पाण्यामुळे, चिखलामुळे, तसेच ओलसर कपड्यांमुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. लहान मुले पाण्यात अधिक प्रमाणात खेळतात. त्यामुळे त्यांना त्वचेचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्वचेचे आजार लहान मुलांना त्रासदायक ठरू शकतात. अशा वेळी मुलांचे त्वचेच्या आजारांपासून कसे संरक्षण करावे, हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
पावसाळा आणि मुलांचे आरोग्य
कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट आणि केस ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. आंचल पंथ यांनी सांगितले की, पावसामुळे मुलांना त्वचेचे आजार होण्याची शक्यता अधिक आहे. मुलांना पावसात भिजायला अधिक आवडतात. पावसामुळे ताप किंवा सर्दी सहजच होते. तसेच चिखल लागल्यामुळे त्वचेचे आजार होण्याच्या शक्यता वाढतात. तसेच पावसाळ्यात कीडे आणि डास यांचेही प्रमाण अधिक असते. त्यामुळेही त्वचेचे आजार होऊ शकतात.
ऑरिजिन क्लिनिकच्या सह-संस्थापक, त्वचाविज्ञान आणि सौंदर्यशास्त्र विषयातील डॉ कृतू भंडारी एम.डी. म्हणाल्या, “पावसात भिजल्यामुळे मुलांना बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच, उच्च आर्द्रता पातळी लक्षात घेता, एटोपिक डर्माटायटिस वाढणे सामान्य असते आणि त्यामुळे इतर जीवाणूंचा संसर्ग देखील होऊ शकतो.”
हेही वाचा : रोमन काळापासून विकसित झालेली बिकिनी; काय आहे बिकिनीचा इतिहास
संतुलित आहाराचे पालन करून, त्वचा हायड्रेटेड ठेवून आणि संपूर्ण स्वच्छता राखून मुलांची प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. परंतु, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी काही स्किनकेअर टिप्स तुम्ही पाळल्या पाहिजेत.
कपड्यांची स्वच्छता
डॉ. पंथ यांनी बाहेरून आल्यावर मुलांना ताबडतोब आंघोळ घालावी असे सांगितले आहे. त्यांना कधीही ओल्या कपड्यांमध्ये बसू देऊ नका. दुसरीकडे डॉ.भंडारी यांनी या दमट हवामानात कपडे कोरडे ठेवावेत आणि कापड कोरडे राहावे, यासाठी त्यांना हलके इस्त्री करण्याचे सुचवले. तसेच पावसाळ्यात सिंथेटिक्स कपडे टाळावेत. हलके, हवेशीर असे सुती कपडे घालावेत. तसेच कपडे जीवाणू प्रतिबंधात्मत्मक औषधांनी धुवावेत. साबणाचा पुरेसा वापर करावा.
मुलांच्या त्वचेची काळजी
पावसाळ्यात मुलांची त्वचा कोरडी राहील, याची खात्री करा. विशेषत: वाळलेल्या मऊ मायक्रोफायबर टॉवेलने घाम येण्याची शक्यता असलेल्या भागात, ओलसर राहणाऱ्या भागांमध्ये स्वच्छता करून घ्यावी. तसेच स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी, वस्तू कोणालाही शेअर करू नये. स्वतःचे कंगवे, कपडे, टॉवेल इतरांना देऊ नये. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते. तसेच अंघोळीनंतर अँटी-फंगल पावडरचा वापर करावा. डॉ. पंथ म्हणाले की, अंघोळीनंतर मुलांच्या संपूर्ण शरीरावर मॉइश्चरायझरचा पातळ थर लावणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, त्यामुळे चिखल थेट मूळ त्वचेला लागणार नाही. रॅश आलेल्या भागात कॅलामाइन लोशन वापरा. तसेच अंघोळीनंतर ते भाग कोरडे करून तिथे पावडर लावावी.
गरम पाण्याची आंघोळ टाळावी
साबण आणि कोमट पाणी वापरून त्वचा स्वच्छ करावी. साबणही आयुर्वेदिक वापरण्यावर भर द्यावा. रसायनयुक्त साबण वापरू नये. ‘पीएच’ बघून साबण घ्यावेत. दोन ते तीन वेळा पीएच बॅलेन्स असलेल्या सौम्य शॅम्पूने तुमच्या मुलाचे डोके धुण्याची शिफारस केली.
हेही वाचा : विश्लेषण : विठ्ठल देवतेचे मूळ स्वरूप कोणते ? काय आहे विठ्ठल देवतेचा इतिहास
डासांपासून प्रतिबंधात्मक उपाय करावे
डॉ. भंडारी म्हणाले की, डासांपासून होणार्या सामान्य आजारांपासून तुमच्या मुलाला सुरक्षित ठेवण्यासाठी डास प्रतिबंधक औषधांचा वापर करा.
दरम्यान, डॉ. पंथ यांनी डासांच्या चाव्याद्वारे आराम मिळण्यासाठी खाजवू नये. त्यावर लोशन लावावे. बाहेर जाण्याआधी लोशन लावावे.
तुमची सर्व काळजी घेऊनही पावसाळ्यात त्वचेची कोणतीही समस्या उद्भवली असेल तर वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या आणि तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांकडून योग्य उपचार घ्या.