कोणताही खाद्यपदार्थ मिठामुळे चविष्ट होतो. मिठाचे प्रमाण थोडे कमी जास्त झाले की लगेच त्या पदार्थाची चव बिघडते. त्यामुळे मिठाचे प्रमाण अगदी योग्य असणे गरजेचे असते. फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही जेवणातील मिठाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. काही प्रमाणात मीठ शरीरासाठी फायदेशीर मानले जाते, पण त्याचे प्रमाण जर जास्त झाले तर आरोग्याशी निगडित गंभीर समस्या उद्भवू शकतात. जेवणात मिठाचे प्रमाण वाढल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिरिक्त मिठामुळे उद्भवू शकतात हे गंभीर असतात
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार एका व्यक्तीने जर दिवसभरात पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्ले तर त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. तसेच यामुळे भविष्यात हृदयविकार होण्याचीही शक्यता असते. ‘अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशन’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अहवालानुसार प्रत्येक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये ३.८ ग्रॅम पर्यंत मीठ असते. एवढ्या मिठाचा जेवणात समावेश केल्याने शरीरात रक्तपुरवठा करणाऱ्या नसांची रक्तपुरवठा करण्यासाठी आवश्यक असणारी उघडण्याची क्षमता कमी होते. यामुळे रक्तप्रवाहावरही परिणाम होतो.

आणखी वाचा : जेवल्यानंतर Blood Sugar वाढु शकते; २५० mg/dl झाल्यास उद्भवू शकते समस्या, नियंत्रणात ठेवण्यासाठी करा हे उपाय

आहारात कमी मिठाचा समावेश करण्याचे उपाय

  • खाद्यपदार्थांचे प्रमाण जितके असेल तितकेच मीठ टाका.
  • नेहमी मोजून मीठ टाकण्याची सवय लावा.
  • खाद्यपदार्थ शिजवून झाल्यानंतर त्यात वरून मीठ टाकणे टाळा.
  • प्रोसेस केलेले, पॅकेटमधील खाद्यपदार्थ खाणे टाळा कारण त्यामध्ये मीठ जास्त वापरले जाते.
  • आहरात अशा पदार्थांचा समावेश करा ज्यात कमी मीठ टाकले जाते.

मीठ किती प्रमाणात खावे
आहारात जितक्या कमी मिठाचा समावेश असेल तितकी हृदयासाठी आणि मेंदुच्या आरोग्यासाठी चांगले असते. डॉक्टरांच्या मते एका दिवसात २ ते ४ ग्रॅम मीठ खावे, पण हायपरटेन्शन हा आजार असणाऱ्यांनी १.५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips amount of increased salt in food can cause serious diseases know how much should be added in daily diet pns
Show comments