मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना त्यांच्या आहारावरदेखील नियंत्रण ठेवावं लागतं. याबरोबरच त्यांना रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासावी लागते. मधुमेहाच्या रुग्णांना कमी दिसण्याचा त्रास, हृदयाशी संबंधित आजार आणि किडनीचे आजार अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, या सर्व समस्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवल्याने नाहीशा होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुमेहाच्या समस्येमुळे रुग्णांच्या डोळ्यांवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. अनेकदा रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने अंधत्वाचा सामना करावा लागण्याती शक्यता असते. मधुमेहामुळे, रेटिनोपॅथी, ग्लुकोमा आणि मोतीबिंदू अशा डोळ्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांना डोळ्यांची काळजी घेणे गरजेचं आहे. डोळ्यांशी संबंधित कोणत्याही प्रकारचे आजार टाळण्यासाठी काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेही वाचा- डायबिटीजच्या रुग्णांनी धूम्रपान केल्यास वाढू शकतो किडनी खराब होण्याचा धोका; जाणून घ्या Sugar कंट्रोल करायच्या टिप्स

साखर नियंत्रित ठेवा- जेव्हा रक्तातील साखरेची पातळी जास्त होते तेव्हा तुमच्या डोळ्यांच्या लेन्सचा आकार बदलू लागतो. ज्यामुळे तुम्हाला अस्पष्ट दिसू लागते. तसंच रक्तातील साखरेची पातळी जास्त झाल्यास त्याचा डोळ्यांच्या रक्तपेशींवरही खूप वाईट परिणाम होतो. या सर्व समस्यांपासून सुटका करुन घ्यायची असेल तर, आपल्या शरीरातील साखर नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी वेळोवेळी साखरेची पातळी तपासून ती नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य ते उपाय करणं गरजेचं आहे.

धूम्रपान सोडा- धूम्रपान प्रत्येकाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतेच मात्र मधुमेहाच्या रुग्णांसाठी धूम्रपान खूपच धोकादायक आहे. धूम्रपानामुळे मधुमेही रुग्णांच्या नसा, पेशी आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. यासोबतच मधुमेहाच्या रुग्णांना न दिसण्याच्या समस्येला सामोरे जावं लागतं.

हेही वाचा- लिव्हरचा ‘हा’ आजार आहे खूप गंभीर; वेळीच लक्ष न दिल्यास मृत्यूही होण्याची शक्यता

शरीराच्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका – उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल या दोन गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या दिसण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवल्यामुळे तुमच्या डोळ्यांची समस्या कमी होतात शिवाय ते तुमच्या एकूण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

व्यायाम करा – रोज व्यायाम करण्याची सवय शरीरासाठी चांगली असते. व्यायामाने मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते. दररोज व्यायाम करणं हे तुमच्या डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. मात्र, कोणताही नवीन व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांना सल्ला घेणही आवश्यक आहे.

हेही वाचा- तुम्हीही झोपेत दात चावता का? हे असू शकतं ‘या’ गंभीर आजाराचं लक्षण, वेळीच ओळखा

आरोग्यदायी जेवण – आरोग्यदायी आणि उत्तम आहार घेतल्याने आपली दृष्टी तीक्ष्ण होते. अशा परिस्थितीत, आपण संतुलित आहाराचे पालन करणे आणि आपल्या शरीराला सर्व प्रकारची पोषक तत्वे प्रदान करणे महत्वाचे आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips diabetes warns how to protect vision during high blood sugar jap
Show comments