Health Tips: योग्य आहाराप्रमाणेच अन्नपचन होणं आवश्यक आहे. तुम्ही भरपूर प्रमाणात पोषक आहार घेत असाल, मात्र त्याचे पचन योग्य प्रकारे होत नसेल, तर तुम्ही घेत असलेल्या पोषक आहाराचं पूर्ण पोषण तुम्हांला मिळत नाही. अशात कधीही अंघोळ करणं किंवा अनेकदा जेवणानंतर अंघोळ करण्याची सवयही अनेकांना असते. आता उन्हाळा सुरु झालाय गरमीमुळे अनेकजण दिवसातून २ ते ३ वेळा अंघोळ करतात, मात्र जेवणानंतर अंघोळ करणं आरोग्यास नुकसानदायक ठरु शकतं. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की, जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? चला तर आज आपण याबद्दल डॉक्टर डिंपल यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया.
जेवणानंतर लगेच अंघोळ करण्याचे दुष्परिणाम
नाश्ता, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच अंघोळ केल्यामुळे शरीराचं तापमान कमी होतं. अशा परिस्थितीत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, हात, पाय, चेहरा यासारख्या शरीराच्या इतर भागात रक्त प्रवाह वाढतो. त्यामुळे शरीरात अस्वस्थता वाढते. त्याशिवाय पोटाच्या आस-पास असलेलं रक्त अन्न पचनासाठी मदत करतं. परंतु जेवणानंतर लगेच अंघोळ केल्यामुळे तापमान कमी झाल्याने, त्या तापमानात संतुलन साधण्यासाठी रक्त शरीराच्या इतर भागात वाहू लागते. यामुळे, अन्नपचन योग्यरित्या होत नाही किंवा पचण्यास जास्त वेळ लागतो. यामुळे आपल्याला वजन वाढीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
पाहा पोस्ट –
हेही वाचा – गरोदरपणात तूप खाल्ल्याने प्रसूती वेदना कमी होतात का? काय सांगतात डॉक्टर, जाणून घ्या
जेवणानंतर किती तासांनी करावी अंघोळ
तज्ज्ञांचे असे मत आहे की, जेवल्यानंतर किमान २,३ तासांनी अंघोळ करणे चांगले. त्याचबरोबर आंघोळ केल्यावर जेवण केले तर जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका. यामुळेही पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होते आणि हे तुमच्या आरोग्यांसाठी घातक ठरू शकते. आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिण्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. पचनक्रिया मंदावल्याने शरीराच्या काही भागांमध्ये गॅस तयार होतो. शिवाय पोटात अन्न असल्याने थकवा आणि सुस्तपणा जाणवतो