Health Tips: नवीन वर्ष सुरू झालेले आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला सगळ्यांनी जसं संकल्प करायला सुरुवात केलेली असते. यात आहार, आर्थिक घडी, दैनंदिन जीवन, आरोग्य यांसारख्या अनेक बाबतीत आपण संकल्प करत असतो. यावर्षीच्या संकल्पांमध्ये मी असा संकल्प केलाय की, मी समाजमाध्यमांवर सांगितल्या जाणाऱ्या प्रत्येक सल्ल्याची शहानिशा करेन आणि इतरांसाठीदेखील त्यातील सत्यासत्यता ओळखण्यासाठी हातभार लावेन. त्यामुळे तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा डाएट सल्ला ऐकत असाल किंवा सोशल मीडियावर ऐकलेल्या माहितीच्या आधारे त्याचं अनुकरण करत असाल तर सावध व्हा. याची सुरुवात म्हणून आजच्या लेखात मी समाजमाध्यमांवर असणारं धुंवाधार सल्ल्यांचं वादळ कसं थोपवायचं याबद्दल सांगणार आहे?

१. सल्ले देणाऱ्या व्यक्तीची शैक्षणिक विश्वासार्हता

Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
Mother Play Aaj Ki Raat On harmonium And Son dancing
Video: आई-मुलाची जोडी इन्स्टाग्रामवर व्हायरल! ‘आज की रात’ गाण्यावर चिमुकल्याचा जबरदस्त डान्स; ठुमके, हावभाव पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
food and drug interactions
Food And Drug Interactions : औषधे घेण्यापूर्वी किंवा औषधे घेतल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावेत? वाचा, आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ माहिती…
Here’s what happens to the body if you have ghee water on an empty stomach daily
Ghee: झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा
brothers and sisters funny video
ब्लॉग शूट करता करता लहान भावा-बहिणीमध्ये कडाक्याचं भांडण; मजेशीर VIDEO पाहून हसाल पोट धरून
How eating adulterated ghee affects health
तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडूमध्ये बीफ टॅलो वापरल्याचा दावा! भेसळयुक्त तूप खाल्ल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो?

२. तुम्ही ज्या व्यक्तींचा सल्ला ऐकताहेत ती व्यक्ती कोण आहे?

त्यांच्या शिक्षणाची पार्श्वभूमी काय ? त्यांनी कोणत्या विषयात किंवा लोकांसोबत अनुभव घेतले आहेत? त्यांनी कोणत्या स्तरावर काम केलेले आहे? आरोग्य क्षेत्रात किंवा सल्ल्यानुरूप तत्सम क्षेत्रात त्यांनी कोणत्या प्रकारचं काम केलेलं आहे? हे काम किती वर्ष केलेलं आहे? ही व्यक्ती व्यवसाय म्हणून काय करते ? यात कोणता धोका असू शकतो ? अशाप्रकारे सध्या वेगेवेगळ्या माहितीच्या साधनांमुळे कोणत्याही विषयाबद्दल माहिती उपलब्ध आहे. अशा माहितीद्वारे लोकांची दिशाभूल करण्याचे काम सर्रास सुरू असते .

याबद्दलची काही उदाहरणे पाहुयात :

१. मध्यंतरी एका संशोधकीय वाचकाने उत्स्फूर्तपणे सांगितलं की, मला कॉफी आवडते आणि त्याबद्दल ‘एक’ शोधनिबंध सांगतो की ती शरीराला चांगली आहे, त्यामुळे कॉफी चांगलीच आहे .

२. एका उत्साही नव्याने आई झालेल्या इन्फल्युएन्सरने लहान बाळांना साखरेऐवजी गूळ वापरणे कायम योग्य असे सांगत त्याबद्दल माझं बाळ कसं ॲक्टिव्ह आहे याबद्दल माहिती दिली होती.

३. नुकतेच निवृत्त झालेल्या काकांनी मी रोज सायकल चालवून वजन नियंत्रणात आणले, तुम्हीपण हे करू शकता असं सांगत उत्कृष्ट चटपटीत वाक्यांची पोस्ट करत “फिटनेस”बद्दल चॅनेल उभं केलंय.

४. एखाद्या भलत्याच क्षेत्रातील व्यक्तीने अत्यंत गोजिरवाणे आणि चटपटीत वैज्ञानिक शब्द वापरून आहाराबाबत मी जे केलं तेच कसं योग्य आहे याचा पुरस्कार करत राहणं. उदा. “हा ज्यूस प्यायल्याने शरीरातील अमुक अमुक ग्रंथींवर परिणाम होऊन चरबी वितळते आणि म्हणून हा ज्यूस सगळ्यांनी घ्यावा.”

यातील धोका

  • अनेकदा माहितीच्या अर्धवटपणामुळे अनेक जण या सल्ल्यानं बळी पडतात आणि जेव्हा तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात तेव्हा केवळ औषधांशिवाय पर्याय राहत नाही.
  • कॉफीमुळे होणारे नुकसान हे शरीरातील पाणी कमी होणे, यापासून ते पोटाचे आरोग्य बिघडणे इथपर्यंत वेगेवेगळ्या प्रकारचे असू शकते.
  • गूळ, मध हे देखील साखरेचेच पर्याय असल्यामुळे बाळांसाठी तो चुकीचाच आहार आहे. अशा प्रकारच्या अर्धवट माहितीने लोकांची दिशाभूल होते.

हेही वाचा >> मोठ्या आतड्याचा कॅन्सर म्हणजे काय? तो होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी? डॉक्टरांनी दिली माहिती

एखाद्या पदार्थाबद्दल चटपटीत शब्दांत किंवा वाक्यात ठाम दावा

एखादी व्यक्ती ठराविक पदार्थाबद्दल ठाम दावे करत आहे. उदाहरणार्थ – अमुक एका पदार्थामुळे तुम्हाला हे फायदे होतात. अमुक एक पदार्थ आहारात असेल किंवा नेहमीच्या आहारात केल्यास तुम्हाला इतर काहीही करण्याची आवश्यकता नाही. अमुक एक पदार्थ केवळ अमुक दिवस घ्या आणि फरक बघा. वरवर अत्यंत साधं वाटणाऱ्या या पदार्थाबद्दल समाजमाध्यमावरील व्यक्ती ठामपणे आरोग्यकारक दावे करते . अनेकदा अशा डाव्यांमागे “मला फरक पडलाय, तुम्हीपण वापरून पाहा” असा सूर असतो.

उदाहरणार्थ : एक चमचा अमुक तमुकमध्ये दुधाइतके प्रोटीन आहे ! पूर्णपणे नैसर्गिक औषध करेल केसांची वाढ! अमुक टॅबलेट घ्या आणि चरबी वितळवा.

यातील धोका : आपल्या आहारात विविध अन्नघटक आहेत आणि त्यांचे विविध फायदे आहेत. त्यात असणारे पोषणघटक , जीवनसत्त्वे यातही तितकेच वैविध्य आहे. एखादा पदार्थ जर पॅकेटमध्ये असेल तर त्यावर प्रक्रिया झालेलीच असते. त्यात नैसर्गिक घटकांसोबत इतर घटक असतातच, ज्यामुळे त्याच्या पचनाचा दर व्यक्तीसापेक्ष असू शकतो; म्हणजेच जे मला लागू झालं ते इतर सगळ्यांनाच लागू पडेल असं नाही. किंबहुना माझ्या घरातल्या व्यक्तींनीदेखील असे नैसर्गिक किंवा होलिस्टिक औषधे घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader