Reason Behind Feet Pain In The Morning: हिवाळ्यात अनेकांना सकाळी टाचांमध्ये वेदना जाणवतात. काहींना तर वेदना इतक्या तीव्र होतात की त्यांना जमिनीवर पाय ठेवणे देखील कठीण होते. कोणत्या कारणांमुळे टाचांमध्ये अशा वेदना होतात आणि त्यावर काय उपाय करता येतील जाणून घ्या.
या कारणांमुळे टाचांमध्ये होतात वेदना
प्लांटर फॅसिटायटिस
प्लांटर फॅसिटायटिसमध्ये पायांना सुज आणि लालसरपणा येतो. टाच आणि पायाची बोटे यांना जोडणारे लिगामेंट जेव्हा काही कारणास्तव सुजतात, तेव्हा प्लांटर फॅसिटायटिस ही समस्या उद्भवते. याचा त्रास सकाळी जास्त जाणवू शकतो.
आणखी वाचा: घराच्या खिडकीत कबुतरांनी मांडलाय उच्छाद? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून लगेच पळवून लावा
ऍचिलीस टेंडोनिटिस
ऍचिलीस टेंडोनिटिस हे टिशू बंडल आहे जे स्नायूंना टाचांच्या हाडांशी जोडतात. जेव्हा या टिशूमध्ये सुज येते तेव्हा टाचांमध्ये वेदना जाणवू लागतात. याची लक्षणं सकाळी जास्त जाणवतात कारण त्यावेळी त्याभागात रक्ताभिसरण कमी होण्याची शक्यता असते.
रूमेटाइड अर्थराइटिस
रूमेटाइड अर्थराइटिस हा त्रास असणाऱ्या व्यक्तींनाही सकाळच्या वेळी टाचांमध्ये वेदना जाणवतात.
स्ट्रेस फ्रॅक्चर
अतिप्रमाणात व्यायाम केल्यानंतर स्ट्रेस फ्रॅक्चर होऊ शकते. यामुळेही टाचांमध्ये वेदना जाणवू शकतात.
आणखी वाचा: चहा करून पावडर फेकून देताय? त्याचे फायदे जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
टाचांना होणाऱ्या वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
- बर्फाने शेका
- मसाज
- स्ट्रेचिंग एक्सरसाइज
- टाचेला बँडेज बांधणे