तुमच्यापैकी अनेकांना जेवताना किंवा जेवणानंतर दही खायला आवडत असेल, यात शंका नाही. पण, हिवाळा आला की, अनेक जण दही खाणं टाळतात. कारण- हिवाळ्यात दही खाणं योग्य की अयोग्य याबाबत अनेकांची वेगवेगळी मतमतांतरं आहेत. त्यामुळे अनेकदा लोकांना हिवाळ्यात दही खावं की नको, असा प्रश्न पडतो; शिवाय काही लोक दही खाणं बंद करा, असा सल्लाही देतात. त्यामुळे लोकांना नेमकं काय करावं? हे सुचत नाही. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला दही खाण्याशी संबंधित जे प्रश्न पडतात, त्याबाबतची तज्ज्ञांनी नेमकी काय उत्तरं दिली आहेत; तसेच हिवाळ्यात दररोज दही खाण्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात, याबाबतची माहिती देणार आहोत.

पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, दही थंड असते, असा लोकांचा गैरसमज आहे. उलट दही उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात त्याचे सेवन करणे चांगले मानले जाते. शरीरावरही त्याचा चांगला परिणाम होतो. “तुम्ही हिवाळ्यात आहारात दह्याचा समावेश करू शकता. कारण- दह्यामुळे तुम्हाला थंडीपासून आराम मिळतो. तसेच त्यामध्ये निरोगी प्रो-बायोटिक्स असतात; जे तुमच्या आतड्यांसाठी आवश्यक असतात,” असंही त्या म्हणाल्या. तर “तुमच्या शरीराच्या प्राथमिकता ठरवा आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून दही वापरण्याचा विचार करू शकता,” असं क्रीडा पोषणतज्ज्ञ डॉ. पूजा शर्मा, रिच डाएट्स२४ यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं आहे.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
pizza advertisment banned
पिझ्झा, केक आणि शीतपेयाच्या जाहिरातींवर बंदी; ‘या’ देशाने केली कारवाई, कारण काय?

हेही वाचा- झटपट वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहार घेतल्याने तुमच्या हृदयावर विपरीत परिणाम होतो? डाॅक्टर काय सांगतात…

कुकरेजा म्हणाल्या, “दही पचनक्रियेला चालना देतं आणि चयापचय वाढवण्यास मदत करतं; ज्यामुळे शरीरात आंतरिक उष्णता निर्माण होण्यास मदत होते. हे प्रो-बायोटिक्स पचनास मदत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात; ज्यामुळे तुमचा संसर्गजन्य आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.”

परंतु, थंडीच्या दिवसांत तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल, तर थेट फ्रिजमधून बाहेर काढलेले दही खाणं टाळा; अन्यथा यामुळे काही समस्या उदभवू शकतात. त्यासाठी उपाय म्हणून कुकरेजा सांगतात की, काळ्या मिरीच्या पावडरसह दही खाल्ल्यास तुमचा घसा दुखणार नाही.

हिवाळ्यात दररोज दही खाल्ल्याने काय होते?

क्रीडा पोषणतज्ज्ञ डॉ. पूजा शर्मा, रिच डाएट्स२४ यांनी स्पष्ट केलं की, हिवाळ्यात दही खाणं फायदेशीर ठरू शकतं. कारण- ते आतड्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले प्रो-बायोटिक्स देतात, जे पोषक घटकांचा एक चांगला स्रोत आहे. “दररोज एक कप दही खाल्ल्यानं तुमच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण वाढते, जे कॉर्टिसॉल (कॉर्टिसॉल हे एक स्टिरॉइड हार्मोन आहे.) तयार होण्यावर मर्यादा आणतं. त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते”, असंही डॉ. शर्मा म्हणाले.

आरोग्य प्रशिक्षक दानिश अब्बासी यांनी सांगितलं, “दह्यामध्ये बायोअॅक्टिव्ह पेप्टाइड्स असतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करतात. दह्यामधील प्रो-बायोटिक्स चांगल्या कोलेस्ट्रॉल पातळीशी संबंधित असतात, जे हृदयविकाराचा धोका कमी होण्याशी संबंधित असतात.”

डॉ. शर्मा यांच्या मते, दही शरीरातील काही भागांतील पातळ स्नायूंचं आरोग्य जपतं; जे वजन कमी झाल्यानंतर अनेक दिवसांपर्यंत तुमची शरीरयष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतं. “त्याशिवाय हिवाळ्यात दही खायचं नसतं हा चुकीचा समज आहे. उलट शरीराचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी उष्ण पदार्थांचा आहारात समावेश करणं आरोग्यासाठी आवश्यक आहे.” असंही डॉ. शर्मा यांनी सांगितलं.

Story img Loader