तुम्हाला तुमच्या अवतीभवती अशी बरीच ज्येष्ठ वयाची मंडळी भेटतील, जी मागची अनेक वर्षे आयुष्यभर शरीराने सडपातळ होती, मात्र आता उतारवयामध्ये त्यांच्या शरीराने बाळसे धरले आहे. असे ज्येष्ठ नागरिक जर तुमच्या पाहाण्यात असतील तर त्यांना लगेच सावध करा, की हे योग्य नाही. तुम्हांला वाटेल की, “उतारवयात का होईना, त्यांचे शरीर जरा गुटगुटीत दिसत आहे, तर बिघडले कुठे?” तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की प्रौढ शरीराला उशिरा वयात आलेले हे बाळसे हे आरोग्याचे नाही तर अनारोग्याचे लक्षण आहे. हे सौष्ठव नाही तर अंगावर जमलेल्या चरबीचे थर आहेत. काय शरीराचे हे वाढलेले वजन व्यायाम करुन मिळवले आहे? काय शरीरावरील स्नायुंचा आकार वाढला आहे? काय हे शरीर स्नायुबद्ध झाले आहे? एखाददुसरा अपवाद सोडता नाहीच. मग केवळ शरीरावर चरबीचे थर वाढल्याने शरीर आकर्षक दिसत असेल तर पाहाणार्यांच्या म्हणजे आपल्या नजरेत दोष आहे. मुळात शरीर सडपातळ असावे, चपळ असावे तर ते निरोगी असे आपले निरोगी शरीराचे गणित नाही आहे. स्थूल शरीर दिसले, त्याहुनही पोट मोठे दिसले म्हणजे आपण त्या शरीराला निरोगी म्हणतो. त्यामुळेच की काय कृश शरीराचे ज्येष्ठ नागरिक उतार वयात का होईना, जाड दिसू लागले की त्यांना व त्यांच्या घरच्यांना कोण आनंद होतो. पण हा आनंद व्यर्थ आहे, हे ध्यानात घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा