रक्तामधील साखरेची सात्म्यता-विकृती हा शब्द वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल. आपल्या रक्तामधील साखर ही आपल्या शरीराला, आपल्या शरीरकोषांना अनुकूल असते, असली पाहिजेच. मग तिची विकृती कशी काय होईल? होते असे की, सेवन केलेल्या अन्नापासून तयार होणारी साखर ही शरीरकोषांना उर्जा म्हणून सातत्याने एका सम प्रमाणात मिळत राहायला हवी. तेव्हाच शरीरकोष अर्थात शरीर त्याची विविध जैवरासायनिक कार्ये विनासायास पार पडू शकेल. दुर्दैवाने आजच्या आधुनिक जगामध्ये दहापैकी तीन जणांच्या शरीरात रक्तामध्ये साखरेची सम पातळी राहात नाही. त्यांच्या रक्तामध्ये साखर खूप जास्त वाढते आणि मग एकदम कमी होते. साखरेचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने शरीरकोषांना उर्जासुद्धा कमी जास्त मिळत राहते आणि त्यानुसार त्यांना विशिष्ट लक्षणे त्रस्त करत राहतात. या अवस्थेमध्ये त्या मंडळींना आपल्या रक्तामध्ये साखर सम पातळीत राहत नाही आहे, हे लक्षात आले तर पुढच्या विकृती टाळता येतील. कारण हेच लोक पुढे जाऊन वजनदार शरीराचे व आळशी बनतात. आपल्या शरीरामध्ये असे काही घडत आहे, हे कसे ओळखता येईल? ते ओळखण्यासाठी खालील प्रश्न वाचा:

१. सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजेतवाने वाटत नाही?
२. झोपेतून उठल्यावरसुद्धा आळसावल्यासारखे वा पुन्हा झोपावेसे वाटते?
३. काय सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चहा-कॉफी प्यायल्याशिवाय उत्साह वाटत नाही?
४. तुम्हाला दिवसभरातून अनेकदा आळसावल्यासारखे वा झोपावेसे वाटते, विशेषतः जेवल्यानंतर?
५. अंगात उर्जा नाही म्हणून तुम्हाला व्यायाम करावासा वाटत नाही?
६. काय तुम्हाला मन एकाग्र करताना नेहमीच त्रास होतो?
७. तुम्हाला डोकेदुखीचा त्रास वारंवार होतो?
८. वेळेवर जेवण मिळाले नाही की तुम्हाला चीडचीड होते?
९. काय सहा तास अन्न मिळाले नाही तर तुम्हाला गळून गेल्यासारखे वाटते?

Health Special What exactly is insulin
Health Special : इन्सुलिनच्या जगात
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
mother and son died drowning Nashik district,
नाशिक जिल्ह्यात बंधाऱ्यात बुडून मायलेकासह तिघांचा मृत्यू
central cabinet, minimum selling price of sugar
साखरेची किमान विक्री किंमत वाढीचा प्रस्ताव लांबणीवर, केंद्रीय मंत्रिगटाचा निर्णय; साखर उद्योगात नाराजी
leaders linked to sugar mills in maharashtra polls 2024
एकगठ्ठा मतांसाठी ‘साखर’पेरणी; सर्वपक्षीय उमेदवारांच्या यादींमध्ये ‘साखरसम्राटां’चा जोर; २४ कारखानदार रिंगणात
sugar factory lobbies, maharashtra assembly election 24, candidates
उमेदवारांच्या यादीमध्ये ‘ साखर सम्राटां’चा जोर, २४ कारखानदार रिंगणात
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
chia seeds health benefits soaked chia seeds benefits and direction to use
रोज चिया सीड्स खाण्याचे हे आहेत आरोग्य फायदे, वाचा कशाप्रकारे करावे सेवन

यामधील अर्ध्याहून अधिक प्रश्नांची उत्तरे “होय” असतील तर तुमच्या रक्तामध्ये साखरेची पातळी सम पातळीत राहत नाही, अशी शंका घेता येते. कदाचित तुम्हाला रक्तशर्करा असात्म्यता विकृतीचा त्रास असण्याची शक्यता आहे. अर्थात ‘आळस’ या एका कारणामुळे सुद्धा वरील लक्षणे दिसू शकतात, हे विसरु नका. कसेही असले तरी स्वयंनिदान करण्याची चूक करु नका.