Best Drinks For Exam Focus : परीक्षा जवळ आली की, आपल्यातील अनेकांना ‘टेन्शन’ येण्यास सुरुवात होते. काही जण परीक्षेच्या काही महिन्यांअगोदर अभ्यास करण्यास सुरुवात करतात; तर काही अगदी पेपरच्या एक दिवस आधी संपूर्ण रात्र जागे राहून परीक्षेची तयारी करतात. यादरम्यान मुलाने वा मुलीने व्यवस्थित जागे राहून अभ्यास करावा यासाठी पालक त्यांना चहा किंवा कॉफी तयार करून देतात. परीक्षेच्या काळात कॉफी ही खरी जीवनरक्षक आहे, असे म्हणतात. पण, निरोगी आहाराशिवाय तुम्हाला या दिवसांमध्ये बेस्ट रिझल्ट मिळणे कठीणच असते. तर हेच लक्षात घेऊन सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट पूजा मखिजा यांनी कॉफीऐवजी काही आरोग्यदायी पर्याय (Healthy Drinks For Students) शेअर केले आहेत. ‘इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशन’च्या जर्नलमधील अभ्यासानुसार, नैसर्गिक हायड्रेशन आणि अँटिऑक्सिडंटनी समृद्ध पेये सतत ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करण्याला समर्थन देतात”, असे सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट पूजा माखिजा हिने इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. परीक्षेची तयारी करण्याच्या तणावपूर्ण काळात तुम्हाला ऊर्जा पातळी टिकवून ठेवणे आवश्यक असते. तेव्हा कॅफिनमुळे तीव्र ऊर्जा क्रॅश (विस्कळित) होऊ शकते. त्यामुळे डिहायड्रेशनचा सामना करण्यासाठी सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट पूजा माखिजा हिने ताज्या लिंबाचा सोडा, काही पुदिन्याच्या पानांसह संत्रे आणि लिंबाचा रस किंवा इलेक्ट्रोलाइटयुक्त नारळाचे पाणी पिण्याचा सल्ला (Healthy Drinks For Students) दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

सोडादेखील पिऊ नये (Healthy Drinks For Students) …

तर याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने, बंगळुरू येथील क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्सच्या सेवा प्रमुख एडविना राज (Edwina Raj) यांच्याशीही चर्चा केली. त्यांनी सांगितले की, कॅफिन हा जास्त भार लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून काम करतो आणि तुमच्या शरीरातून पाणी काढून टाकतो, ज्यामुळे निर्जलीकरण होते. त्यामुळे या काळात कॅफिनचा समावेश संयम राखून करावा. तसेच सोडादेखील पिऊ नये, अशी शिफारस त्यांनी केली आहे.

तसेच जर कॅफिन माफक प्रमाणात समाविष्ट करायचे असेल, तर फळांचा ज्यूस आणि आवळा, तुळशीच्या पानांचा रस यांसारख्या नैसर्गिक पेयांमध्ये अँटिऑक्सिडंट्सच्या वाढीसह हायड्रेशनच्या अतिरिक्त स्रोतासह एकत्र केलेले असतात. तसेच फळांचे स्मूदी, भाज्यांचे सूप, नारळाचे पाणी, हळद व मिरपूड घालून तयार केलेले ताक हे द्रवरूप पदार्थ डिहायड्रेशन टाळण्याचे काम (Healthy Drinks For Students) करतात. अगदी मॅच लॅटमध्ये कॅफिनचा एक छोटा डोस असतो. अशा प्रकारे, तुम्ही परीक्षेची तयारी करताना सोडा किंवा साखरयुक्त पेये टाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच फळे, भाज्या व पालेभाज्या, नट्स आणि बियांमध्ये असलेले ओमेगा -3 स्रोतांमधील अँटिऑक्सिडंट्सद्वारे पोषण देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy drinks for students celebrity nutritionist pooja makhija has shared some healthy options to coffee asp