Healthy food in Winter : सध्या हिवाळ्याला सुरुवात झाली असून, वातावरणातील गारवा वाढला आहे. हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे आणि हवामानातील बदलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अनेक जण लवकर आजारी पडतात. अशा वेळी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्याच्या समस्या समस्या दूर करण्यासाठी हिवाळ्यात काही विशिष्ट खाद्यपदार्थांचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (healthy food in winter to boost immunity in winter days expert told to include these foods in your diet)

तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे पदार्थ नेमके कोणते आहेत? याविषयी न्युट्रिशनिस्ट अपूर्वा अग्रवाल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या पदार्थांविषयीची माहिती दिली आहे. हे पदार्थ तुम्हाला हिवाळ्यात निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर

हिवाळ्यात खालील पदार्थ का खावेत? याविषयी अपूर्वा अग्रवाल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

तूप

आपल्याला वाटते की, तूप कॅलरीज वाढवते पण तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यावर शरीरातील खराब चरबी कमी होते आणि तुमचे शरीर उबदार ठेवण्यास मदत मिळते.

हेही वाचा : Breakfast That Spikes Blood Sugar: बटाट्याचे पराठे, एक वाटी पोहे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का? वाचा तज्ज्ञांचे मत आणि उपाय

गूळ

पचनक्रिया सुधारण्यासाठी गूळ हा अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे, जो आपल्याला हिवाळ्यात उबदार ठेवतो.

गरम सूप

हिवाळ्यात सायंकाळी एक वाटी गरम सूप प्यायला कोणाला आवडत नाही? झटपट उब मिळविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

सुका मेवा

हिवाळ्यात सुका मेवा हा एक उत्तम पर्याय असतो. अॅप्रिकोट, अंजीर व खजूर हे नैसर्गिक उबदारपणा देतात.

केशर

जर तुम्हाला हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवायचे असेल, तर तज्ज्ञांच्या मते, दुधात केशर उकळून, त्यात मनुके टाकावेत.

हेही वाचा : Eating Peanuts Every Day: दररोज मूठभर शेंगदाणे खाणं योग्य ठरेल का? आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे चार फायदे-तोटे जाणून घ्या

धान्य

बाजरी, नाचणी यांसारख्या धान्यांचा हिवाळ्यात तुम्ही आस्वाद घेऊ शकता.

दालचिनी

दालचिनी ही शरीराच्या चयापचय क्रिया सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दालचिनीच्या सेवनाने शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत होते आणि म्हणूनच हिवाळ्यात दालचिनीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

तीळ

तीळ हे श्वसनाशी संबंधित अनेक आजार दूर ठेवण्यास मदत करतात. तिळाचे लाडू, तिळाची बर्फी इत्यादी स्वादिष्ट पदार्थांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.

तुळशी आणि आले

तुम्ही कधी चहामध्ये आले आणि तुळशीचे पाने टाकून पाहिले आहे का? एकदा करून पाहा. आले आणि तुळशीच्या पानांचा चहा अत्यंत आरोग्यदायी आहे.

मध

हिवाळ्यात सर्दी आणि फ्ल्यूचा सामना करण्यासाठी मध हा अत्यंत उपयुक्त आहे.

न्युट्रिशनिस्ट करिश्मा चावला सांगतात, “मध थोड्या प्रमाणात खावा. कारण- त्यात कॅलरीज जास्त आहेत.” त्या पुढे सांगतात, “काजू, बिया, कांदे, लसूण, सफरचंद आणि इतर फळे, कच्चे सॅलड, मोड आलेली कडधान्ये फायबर आणि प्रथिनयुक्त असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. अँटिऑक्सिडंट्स, झिंक, चांगली चरबी असलेले पदार्थ खावेत.”

Story img Loader