Japanese Healthy Habits For live longer In Marathi : जपान हा देश दीर्घकाळ आयुष्य, निरोगी स्वास्थ्य असलेल्या लोकसंख्येसाठी ओळखला जातो. आरोग्य प्रशिक्षक शिवांगी देसाई यांनी जपान या देशाला काही दिवसांपूर्वी भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी काही कारणे डीकोड करण्याचा प्रयत्न केला. शिवांगी देसाईंच्या म्हणण्यानुसार, कोणताही जपानी नागरिक ट्रेनमधून प्रवास करताना किंवा चालताना खात नाहीत. ते त्यांच्या खाण्याची वेळ, जागा, पॅटर्न (पद्धती) बाबत खूप काळजी घेतात.
१. जपानचे रहिवासी अन्नाबरोबर कोल्ड्रिंक पित नाहीत, तर ते सूप किंवा चहासारखे गरम पेय पिणे पसंत करतात; जे पचनास मदत करतात.
२. जपानच्या रहिवाशांचे खाण्याचे प्रमाण मर्यादित असते, ते ओव्हरइटिंग करत नाहीत.
३. मिसो आणि नट्टोसारखे प्रोबायोटिक्स हे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचे असते, त्यामुळे जपानी रहिवासी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीच्या जेवणात याचा आवर्जून समावेश करतात.
जेवणाचे प्रमाण मोजण्यासाठी कप किंवा फूड स्केल वापरा :
तर अशा सवयी खरोखरच फायदेशीर ठरू शकतात, हे शोधण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला. झांड्रा हेल्थकेअरचे,डायबेटोलॉजीचे प्रमुख आणि रंग दे नीलाचे सह-संस्थापक, डॉक्टर राजीव कोविल यांच्या मते, लिन प्रोटीन (lean proteins), संपूर्ण धान्य, हेल्दी फॅट्स, भरपूर भाज्या यांसारख्या पौष्टिकतेने युक्त अन्नपदार्थांचा आपल्या जेवणात समावेश केल्याने आपल्या आरोग्यास मदत होऊ शकते (Healthy Habits) , त्यामुळे तुमच्या जेवणात फायबरसह कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, हेल्दी फॅट्सचा समावेश करा आणि संतुलित, आरोग्यदायक जेवण तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवा.
त्याचप्रमाणे जास्त खाणे टाळण्यासाठी, तुमच्या जेवणाचे प्रमाण अचूक मोजण्यासाठी कप किंवा फूड स्केल वापरा (Healthy Habits), असे डॉक्टर कोविल यांनी सुचवले. तसेच जेवणाबरोबर थंड, साखरयुक्त पेयाचे सेवन करणे टाळा, कारण ते पचन प्रक्रियेत अडथळा आणून पचनाच्या समस्यादेखील उद्भवू शकतात. पण, शर्करायुक्त पेयातून येणाऱ्या अतिरिक्त कॅलरीज लक्षात ठेवायला विसरू नका, असे असे डॉक्टर कोविल म्हणाले.
याव्यतिरिक्त, फूड लेबल्सकडे लक्ष द्या आणि ॲडेड शुगर, सॅच्युरेटेड फॅट्स, सोडियम कमी असलेली उत्पादने निवडा (Healthy Habits). जपानी नागरिकांप्रमाणे प्रत्येक अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी तुमचा-तुमचा वेळ काढा, तुमच्या अन्नाची चव, टेक्स्चरवर लक्ष द्या. हळूहळू खाल्ल्याने तुम्ही जास्त खाणे टाळू शकता आणि पचनाच्या समस्या होण्यापासून वाचू शकता; असे डॉक्टर कोविल म्हणाले आहेत.
आहाराव्यतिरिक्त नियमित शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त राहणेदेखील आवश्यक आहे, ज्याचे शरीरासाठी असंख्य फायदे आहेत. व्यायामामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत होते, याचा अर्थ तुमचे शरीर इन्सुलिनचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकते. हे वजन व्यवस्थापनातदेखील मदत करते, हृदयरोगाचा धोका कमी करते, असे डॉक्टर कोविल म्हणाले.