Weight loss tips: बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना वाढलेले वजन ही गोष्ट सातत्याने सतावत असते. वाढलेल्या वजनामुळे आजकाल अनेक जण चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येते. कारण- जास्त वजनामुळे शरीराला हळूहळू विविध आजार ग्रासू शकतात. वजन कमी करण्यासाठी अनेक जण तासन् तास जिममध्ये जाऊन घाम गाळतात. एवढेच नव्हे, तर खाण्या-पिण्यावरसुद्धा नको तितके नियंत्रण ठेवून डाएटिंग केले जाते. मात्र, तरीसुद्धा त्यांच्या पदरी निराशाच पडते. अशा वेळी काय करावे, असा मोठा प्रश्न अनेकांसमोर उभा असतो.

बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बिघडलेल्या सवयी यांमुळे लोक लठ्ठपणाची शिकार होत आहेत. त्याशिवाय कामाच्या वाढत्या दबावाओझ्यामुळे लोक त्यांच्या शरीराकडे हवे तसे लक्ष देऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांचे वजन वाढत चालले आहे. वजन जास्त असल्यामुळे तुम्हाला तुमचे आरोग्य नीट राखणे कठीण होतेय का आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळी वजन कमी करण्याचे उपाय शोधताय का? अशा या परिस्थितीत तुमच्यासारख्या व्यक्तींसकरिता वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञ शोनाली सभेरवाल यांनी एक उपाय सुचविला आहे आणि त्याविषयीचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊ…

तज्ज्ञ शोनाली सभेरवाल यांनी एक रेसिपी शेअर केली आहे. वाढलेले वजन कमी कसे करायचे याची चिंता तुम्हाला सतावत असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेले आरोग्यदायी पेय घेऊन आलो आहोत. त्यामुळे वजन कमी होण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल.

(हे ही वाचा : रोज ‘इतकी’ पावले चालल्याने Heart Attack चा धोका अन् वजन होईल झपाट्याने कमी; तज्ज्ञांनी सांगितलेली पद्धत एकदा जाणून घ्या )

लाइफस्टाइल जीनोमिक्सच्या डिसेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, गाजराच्या रसातील काही पोषक घटक वजन कमी करण्यास मदत करू शकतात. विशेषतः संशोधकांना असे आढळून आले आहे की, अ जीवनसत्त्व पोटाची चरबी कमी करून वजन कमी करण्यास मदत करू शकते.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, गाजर हे सुपरफूड म्हणून ओळखले जाते. काही लोक सॅलडमध्ये याचा समावेश करतात; तर अनेकांना गाजराच्या भाजीचा रस किंवा पुडिंग खायला आवडते. गाजरामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात; जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. नियमितपणे गाजर खाल्ल्याने दृष्टी चांगली राहते. एक ग्लास गाजराच्या रसाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामध्ये असलेले पोषक घटक शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.

त्याचप्रमाणे पांढरा मुळादेखील वजन कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहून, इन्सुलिनची पातळी संतुलित राहते; जी अयोग्य चरबी जाळण्यासाठी आवश्यक असते. ही कमी कॅलरीयुक्त भाजीदेखील आहे.

गाजर आणि पांढरा मुळा या दोघांचे मिश्रण चयापचय वाढवते. त्यामुळे दिवसातून एकदा गाजर आणि मुळ्याचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हा रस न्याहारी आणि दुपारच्या जेवणादरम्यान नाश्ता म्हणून घेतला जाऊ शकतो.

अशा प्रकारे बनवा आरोग्यदायी पेय

साहित्य

१/२ कप – किसलेले गाजर
१/२ कप – किसलेला मुळा
१ १/२ कप – पाणी

पद्धत

किसलेले गाजर आणि मुळा उकळून घ्या.
३-४ मिनिटे उकळवा आणि थंड झाल्यावर ते सेवन करा.