Heart Attack Cure: देशभरात मागील काही दिवसात अनेकांचे हसता खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाल्याचे प्रसंग आपण ऐकले आहेत. २०२२ या एकट्या वर्षातच सिद्धार्थ सूर्यवंशी, राजू श्रीवास्तव, सिद्धार्थ शुक्ला यांसारखे सेलिब्रिटीही जिममध्ये व्यायाम करताना अचानक कार्डियाक अरेस्टचा बळी ठरले होते. अगदी अलीकडेच सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर मेघा ठाकूर हिला सुद्धा हार्टअटॅक मुळे २१ व्या वर्षी आपले प्राण गमवावे लागले. यासंदर्भात शारदा हॉस्पिटलचे मुख्य सल्लागा डॉ. सुभेंदु मोहंती यांनी सांगितले की, हार्ट अटॅकचा धोका हा आता वयस्कर व्यक्तींपुरता मर्यादित राहिलेला नाही, उलट मागील १५ ते १५ वर्षात १८ ते २० या वयोगटात सुद्धा हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्विटरवर सुद्धा मागील काही दिवसांपासून #HeartAttack ट्रेंड होत आहे, याच पार्श्वभूमीवर डॉ. एडमॉन्ड फर्नांडिस यांनी सर्वांना ऍस्पिरिन ३०० ही एक गोळी सतत जवळ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. हार्टअटॅकची कोणती लक्षणे दिसताच ऍस्पिरिन घ्यावी हे सुद्धा डॉ. फर्नांडिस यांनी सांगितले आहे. तुमचं हृदय तुमचं आयुष्य आहे असे म्हणत त्यांनी एक ट्वीट केलं आहे.

हे ही वाचा<< मांजर पाळल्यास हार्ट अटॅक येणार नाही? ९५०० वर्षे जुना आहे माणूस आणि मांजर यांच्यातील ‘हा’ संबंध, जाणून घ्या

अपोलो हॉस्पिटलचे कार्डियोलॉजिस्ट, डॉ. सुदिप यांनी डॉ. फर्नांडिस यांच्या माहितीला जोडून सांगितले की, तुम्ही ऍस्पिरिनसह डिस्पिरीन ३२५ एम जी सुद्धा जवळ बाळगून हृदय विकाराच्या हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करू शकता. एक महत्त्वाची बाब म्हणजे या गोळ्यांमध्ये अँटी प्लेटलेट ड्रग वापरलेले असतात म्हणूनच या गोळ्या रोज घेण्याची गरज नाही. तसेच अन्य औषधांसह नीट नियोजन करून मग या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात.

डॉ आनंद कुमार पांडे, संचालक आणि वरिष्ठ सल्लागार- कार्डिओलॉजी, धरमशीला नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी सांगितले की “ऍस्पिरिन हे सॅलिसिलेट्स नावाच्या औषधांच्या गटातील आहे. हे ताप, वेदना, सूज आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून थांबवण्याचे काम करते. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ऍस्पिरिन देऊ नये.”

हे ही वाचा<< विश्लेषण: पहिल्या हार्ट अटॅकआधी पुरुष व महिलांमध्ये दिसतात वेगवेगळी लक्षणे; वयानुसार कसा ओळखाल धोका?

डॉ सुदीप सांगतात की, पण, प्रत्येकाने ऍस्पिरिनचे सेवन केले पाहिजे असे नाही. “गॅस्ट्रिक अल्सर आणि गंभीर अशक्तपणा असलेल्या रुग्णांनी ऍस्पिरिन टाळावे कारण यामुळे अनिश्चित रक्तस्त्राव आ होऊ शकतो. हृदयविकाराच्या रुग्णाने हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय अॅस्पिरिनच्या गोळ्या बंद करू नयेत,”

ऍस्पिरिन घेताना काय खबरदारी बाळगाल?

  • रिकाम्या पोटी ऍस्पिरिन घेऊ नका.
  • ऍस्पिरिन घेतल्यावर निदान एक पूर्ण ग्लासभर पाणी प्या
  • टॅब्लेट किंवा कॅप्सूल फोडू नका, चुरडू नका किंवा चघळू नका. तुम्हाला ऍस्पिरिन एकाच वेळी संपूर्ण गिळायची असते हे लक्षात ठेवा. आपल्याला चघळता येणाऱ्या गोळ्या हव्या असल्यास तसेही पर्याय उपलब्ध आहेत
  • तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या इतर औषधांच्या किंवा उपचारांच्या जागी ऍस्पिरिन घेऊ नका.
  • अल्कोहोलसह कधीही ऍस्पिरिन घेऊ नका. त्यामुळे पोटात रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे

छातीत दुखणे, छातीत दाब आणि जडपणा जाणवणे, अचानक चक्कर येणे, बेशुद्ध होणे, भरपूर घाम येणे आणि दम लागणे

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart attack can be stopped by aspirin 300 benefits and precautions when to take dispirin tablet in early sign of heart fail svs