सडन कार्डियाक अरेस्ट (म्हणजे अचानक ह्रदयाचे ठोके बंद होणे) ही जगभरातील लोकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. यात भारतातही तरुणांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. अलीकडे बेंगळुरू (IIMB) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामचे (PGP) शिक्षण घेणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणाचा सडन कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला. चांगली कामगिरी करणारा एक यशस्वी कॉर्पोरेट इंटर्नचा जर अशाप्रकारे मृत्यू होत असेल तर चिंतेची बाब आहे. याबाबत दररोज अनेक बातम्या वाचतो, ऐकतो तरीही तुम्ही या आजारासंबंधित अनेक लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष करता. पण, प्रत्येकाने आपल्या निरोगी भविष्यासाठी या आजाराशी संबंधित धोके आणि लक्षणे समजून घेणे अधिक महत्वाचे आहे.

सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?

सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजे अचानक ह्रदयाचा झटका येणे. ही एक अशी स्थिती आहे, ज्यात हृदयाची धडधड अचानक थांबते आणि रक्तदाब कमी होतो. या अनियमिततेमुळे हृदय घाबरवण्याच्या स्थितीत जाते. अशा परिस्थितीत हृदयाच्या एकूण कार्यपद्धतीवरच विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक असलेले ऑक्सिजनयुक्त रक्त हृदय पंप करू शकत नाही. हृदयाची विद्युतीय हालचाल अनियमित होते. पहिल्या काही मिनिटांत मेंदूच्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि रुग्ण संवेदना गमावतो. यावेळी आठ मिनिटांच्या आत रुग्णाला उपचार न मिळाल्यास त्याचे सर्व प्रमुख अवयवांमधील रक्तप्रवाहाचे कार्य बंद पडते. अशा परिस्थितीत रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. अशी माहिती बेंगळुरूमधील मणिपाल हॉस्पिटलचे सल्लागार, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रदीप हरनाहल्ली यांनी दिली आहे.

How much power does Noel Tata head of Tata Trusts have What are the challenges
नोएल टाटा आता टाटा न्यासांचे प्रमुख… त्यांच्याकडे किती अधिकार? आव्हाने कोणती?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
marburg virus
जगातील सर्वांत घातक विषाणूमुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू; काय आहे मारबर्ग व्हायरस? त्याची लक्षणं काय?
Reserve Bank of india loksatta vishleshan
विश्लेषण: रिझर्व्ह बँकही फेडरल रिझर्व्हचे अनुकरण करत व्याजदर कपात करेल?
Why Indian doctors prefer to go to the abroad
भारतातील डॉक्टर परदेशाची वाट का धरतात?
reason behind celebration of wildlife week
विश्लेषण : वन्यजीव सप्ताह हा आता इव्हेंट झाला आहे का?
High Cholesterol Level in Youth Invites Future Heart Disease
तरुणांमधील उच्च कोलेस्टेरॉल पातळी देते भविष्यातील हदयविकारांना आमंत्रण!
tanishq
नैसर्गिक हिऱ्यांना कृत्रिम पर्याय नाही; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायणन यांची माहिती

हार्ट अटॅक आणि सडन कार्डियाक अरेस्ट एकच आहे का?

हार्ट अटॅक आणि सडन कार्डियाक अरेस्ट या शब्दात जरी साम्य वाटत असलं तरी हे दोन्ही आजार खूप वेगळे आहेत. हार्ट अटॅक हा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज किंवा प्लेक जमा झाल्यास किंवा गुठळ्या झाल्यास येतो. ज्यामुळे हृदयाच्या अवरोधित भागांमध्ये रक्त प्रवाह थांबतो. त्यामुळे स्नायूंना इजा होतात. पण, सडन कार्डियाक अरेस्ट ब्लॉकेजमुळे होत नाही. हार्ट अटॅकने हृदयाचे कार्य बिघडते हृदयाचे ठोके अनियमित शकतात अशावेळी व्यक्तीला सडन कार्डियाक अरेस्टचा झटका येऊ शकतो.

ईसीजीच्या मदतीने हार्ट अटॅक लवकर ओळखता येतो. पण, सडन कार्डियाक अरेस्टमध्ये तुम्हाला तितकासा वेळ मिळत नाही, अशी माहिती मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलच्या सल्लागार आणि सिनियर कार्डियाक सर्जन डॉ. मनीष हिंदुजा यांनी दिली.

सर्वसामान्य लोकांमध्ये सडन कार्डियाक अरेस्ट धोका कशामुळे वाढतो?

१) आत्तापर्यंत झालेल्या वैज्ञानिक संशोधनानुसार, तरुणांमध्ये सडन कार्डियाक अरेस्टचा झटका येणे हा हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी (HCM) नावाच्या अनुवांशिक स्थितीचा परिणाम आहे, जो एक दुर्मिळ अनुवांशिक विकार आहे. या स्थितीत ह्रदयातील स्नायू घट्ट होतात, जे असामान्य जीन्समुळे होते. हृदयाचे स्नायू घट्ट झाल्याने ते हृदयाच्या ठोक्यांसह प्रत्येक आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त पंप करू शकत नाही. यामुळे ह्रदयाचे ठोकेदेखील अनियमित होतात आणि सडन कार्डियाक अरेस्टचा झटका येतो, असे डॉ. हरनाहल्ली यांनी सांगितले. एचसीएम असणाऱ्या लोकांना सहसा याची लक्षणे जाणवत नाहीत. त्यांना फक्त व्यायाम किंवा भरपूर शारीरिक हालचाली झाल्यानंतरच ही लक्षणे जाणवू शकतात, यावेळी त्यांच्या हृदयाची लय असामान्य होते.

२) हार्ट अटॅकमुळे हृदयातील विद्युत आवेग मंदावतो आणि सडन कार्डियाक अरेस्टचा झटका येतो. डॉक्टरांच्या मते हार्ट अटॅकच्या सुमारे १० ते १५ टक्के अशा असतात, ज्यात हार्ट अटॅकमुळे सडन कार्डियाक अरेस्टचा झटका येतो. हे प्रमाण तरुणांमध्ये अधिक आहे.

३) डॉ. हरनाहल्ली यांच्या मते, इतर इलेक्ट्रोलाइट चॅनेलशी संबंधित अनुवांशिक परिस्थितीदेखील हृदयात असामान्य लय तयार होते. बहुतेकदा ते घटना होईपर्यंत समजत नाही. यावेळी रुग्णाला अत्यंत थकवा जाणवतो आणि तो आपले भान गमावून बसतो, यानंतर खाली कोसळतो.

४) डॉ. हिंदुजा यांनी हृदयाच्या आजारांकडे लक्ष वेधत म्हटले की, हृदयाचे स्नायू ताणले गेले किंवा घट्ट होऊ लागले तर व्यक्तीमध्ये हृदयासंबंधित समस्या विकसित होण्याचा धोका वाढतो.

५) ताणतणाव हा ह्रदयविकाराचा झटका येण्याचे मुख्य कारण आहे. पण, आधीच तणावाखाली असलेल्या आणि त्यानंतरही अधिक क्लेशकारक अनुभव असलेल्या एखाद्या व्यक्तीमध्ये हृदय विकाराच्या समस्या वाढतात, असेही डॉ. हरनाहल्ली म्हणतात.

६) एंडोथेलियल डिसफंक्शन हा एक प्रकारचा नॉन-ऑब्स्ट्रक्टिव कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) आहे. यात धमन्यांमध्ये अडथळे नसले तरी हृदयाच्या रक्तवाहिन्या पसरण्याऐवजी अरुंद होतात. यामुळे पुन्हा हृदयाच्या असामान्य तालांची असुरक्षा वाढते, ज्यामुळे अचानक हार्ट अटॅक येतो, असेही डॉ. हरनाहल्ली म्हणतात.

७) जागतिक डेटानुसार, कोरोनाच्या संसर्गामुळे मायोकार्डिटिसचा धोका वाढतो, ज्यामुळे हृदयाच्या लयमध्ये व्यत्यय आणणाऱ्या हृदयाच्या ऊतींमध्ये अडथळे येतात.

८) कधीकधी तुम्ही अचानक काही शारीरिक हालचाली करतात, ज्या ह्रदय सहन करू शकत नाही. समजा, तुम्ही रोज बैठी जीवनशैली जगत असाल आणि अचानक तुम्ही पटकन शारीरिक हालचाली करता, त्यावेळी सडन कार्डियाक अरेस्टचा झटका येऊ शकतो,
यामुळे शरीरात अचानक बदल, जसे की जोरदार शारीरिक हालचाली सुरू करणे, HIIT, जिमिंग करणे थांबवा. रुग्णाने त्यांच्या व्यायामाची सवय हळूहळू वाढवा असेही डॉ. हरनाहल्ली यांनी स्पष्ट केले.

लक्षणे काय आहेत?

सडन कार्डियाक अरेस्टमुळे व्यक्ती अचानक बेशुद्ध पडते, यावेळी व्यक्तीला कोणतीही लक्षणे दिसत नाही. परंतु, अचानक थकवा, घाम आणि चक्कर आल्यास सावध राहा. कधीकधी तुम्हाला हृदयाचे असामान्य ठोके, धडधडणे यांसारखी लक्षणे दिसतात, अशावेळी त्वरीत वैद्यकीय मदत घ्या.

सडन कार्डियाक अरेस्टचा धोका कसा टाळायचा?

भारतीयांनी सडन कार्डियाक अरेस्टचा धोका टाळण्यासाठी लहान वयातचं ECG आणि इकोकार्डियोग्राम करणे आवश्यक आहे. प्री-ॲथलेटिक किंवा स्पोर्टिंग इव्हेंटची आरोग्य तपासणी तसेच बेसलाइन शुगर आणि कोलेस्ट्रॉल तपासणी केली पाहिजे, असेही डॉ. हरनाहल्ली म्हणाले; तर डॉ. हिंदुजा यांनी म्हटले की, जर तुमच्या कुटुंबात कोणाला हार्ट अटॅक आला असेल तर त्यानंतरच्या पिढीतही तो येण्याचा धोका वाढतो. जर तुमच्या आई-वडिलांना ह्रदयाचा झटका येण्याचा इतिहास असेल, तर रुग्णांनी योग्य वयातच तपासणी केली पाहिजे.

यावर उपचार पद्धती

जर रुग्ण गंभीर स्थितीत असेल आणि त्याला वेळीच रुग्णालयात दाखल केले तर त्याला योग्य उपचार मिळू शकतील. हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठी तुमच्या त्वचेखाली प्रत्यारोपण करण्यायोग्य कार्डिओव्हर्टर डिफिब्रिलेटर (ICDs) ठेवा. योग्य आहार, झोप, व्यायाम, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे आणि वजन कमी करण्याच्या दृष्टीने जीवनशैली सुधारणे गरजेचे आहे, असेही डॉ. हरनाहल्ली यांनी म्हटले.