प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यात २०२२ मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बदलती जीवनशैली आणि इतर अनेक कारणांमुळे आजकाल कोणालाही ह्रदयविकाराचा झटका येत आहे. इतर आजारांप्रमाणे ह्रदयविकाराची देखील लक्षणे दिसून येत असतात, मात्र ती वेळीच ओळखणे गरजेचे असते. पण तुम्हाला माहीत आहे का, पुरुष आणि स्त्रियांमध्ये ह्रदयविकाराची लक्षणे ही वेगवेगळी असतात. या लक्षणांवर वेळीच उपचार केले तर त्यापासून दूर राहता येते. महिलांमध्ये ह्रदयविकाराची लक्षणे कशी वेगळी असतात हे जाणून घेऊ…
अनेक स्त्रियांना छातीत दुखत नाही
पुरुषांमध्ये छातीत दुखणे हे ह्रदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य लक्षण आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अनेक महिलांना ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी छातीत दुखतं नाही. यात छातीपासून पाठ, जबडा आणि हात दुखण्याची लक्षणं स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही जाणवतात. अनेक अभ्यासातून दिसून आले की, महिलांना ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी पाठ, मान आणि जबडा दुखण्याची अधिक शक्यता असते.
बिअर प्यायल्याने किडनी स्टोन ठीक होत असल्याचे भारतीयांचे मत; वाचा सर्व्हे काय सांगतो?
महिलांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणे
महिलांना ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी मळमळ, उलट्या, जबडा, मान किंवा पाठीच्या वरच्या भागात तीव्र वेदना, छाती किंवा पोटाच्या खालच्या भागात वेदना होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर, अपचन आणि थकवा ही लक्षणं जाणवतात. याशिवाय झोप पूर्ण न होणे, चिंता, चक्कर येणे, अपचन आणि गॅस यांसारखी लक्षणेही ह्रदयविकाराचा झटका येण्यास कारणीभूत ठरतात.
५० वर्षांवरील महिलांना अधिक धोका
रजोनिवृत्तीमुळे महिलांमध्ये ह्रदयाच्या समस्या निर्माण होतात. एका अहवालानुसार, ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. वाढते वजन, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि रेडिमेंट पदार्थांच्या सेवनामुळे ह्रदयविकाराचा धोका वाढतोय. परिणामी अनेक महिलांना ह्रदयविकाराचा झटका येतो.
पुरुष अथवा स्त्रियांनी ह्रदयविकारांपासून वाचण्यासाठी त्यामागील कारणं समजून घेणे गरजेचं आहे. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्ऱॉलचे अधिक प्रमाण, मधुमेह, धुम्रपान, व्यायामाचा अभाव, किडनीचे आजार यामुळे ह्रदयविकारचा झटका येऊ शकतो.