Heart Attack : सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात हृदयाशी संबंधित आजारामुळे मृत्यू दर वाढत असल्याचे अनेक अभ्यासांतून समोर आले आह. खरंच हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढते का? किंवा हृदयाशी संबंधित आजार वाढतात का? या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसने फोर्टिस हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजीचे अतिरिक्त संचालक डॉ. अरुण कोचर यांच्या हवाल्याने माहिती दिली.

डॉ. अरुण कोचर सांगतात, “हिवाळ्यात आपले हृदय लहान-मोठ्या हालचाली करत असते; ज्यामुळे आपले शरीर कोणत्याही अडथळ्याशिवाय सामान्यपणे काम करू शकेल. याच वेळी थंड वातावरणामुळे आरोग्यावरसुद्धा मोठा परिणाम होतो; ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हिवाळ्यात जरी एक अंश सेल्सिअस कमी झाले तरी मृत्यूच्या आकडेवारीत ०.४९ टक्के वाढ होऊ शकते.विशेषत: रक्ताभिसरणामुळे याची शक्यता जास्त ठरू शकते.”

Chest Pain & Heart Attack
Chest Pain & Heart Attack : छातीत दुखणे हे नेहमी हार्ट अटॅक येण्याचे लक्षण असते का? तज्ज्ञ काय सांगतात…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…
Two people died in accident on Peth road nashik
नाशिक : पेठ रस्त्यावरील अपघातात दोन जणांचा मृत्यू
Zeenat Aman shares her pill swallowing horror story
“औषध घेताना गोळी घशात अडकली अन् माझा श्वास…..”; झीनत अमानने सांगितला भयावह किस्सा; तुमच्याबरोबर असे घडले, तर काय करावे?
Why radish leaves or mulyachi pane deserve a place in your winter diet
हिवाळ्यात तुमच्या आहारात मुळ्याच्या पानांचा समावेश का असावा? तज्ज्ञांनी सांगितले कारण…
Heart disease risk , non vegetarian , health care,
हृदयरोगाचा धोका कमी करायचाय? मग, मांसाहार करणाऱ्यांनी…
What Happens To Your Body When You Eat A Clove Daily?
रिकाम्या पोटी दररोज एक लवंग खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होईल?; वाचाच एकदा डॉक्टरांनी सांगितलेले आश्चर्यकारक फायदे…

हिवाळा आणि हृदयाशी संबंधित आजार

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्यामागील कारण लवकर समजू शकत नाही. कारण- थंड वातावरणामुळे रक्तवाहिन्या लहान झालेल्या असतात; ज्यामुळे स्नायूंपर्यंत रक्तपुरवठा नीट होत नाही. हिवाळ्यात रक्तदाबावर पर्यावरणातील तापमानाचा विपरीत परिणाम दिसून येतो. यादरम्यान रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण पडतो; ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

हिवाळ्यात सहसा सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढताना दिसून येते. त्याशिवाय हिवाळ्यात सकाळी सकाळी हृदयविकाराचा झटका येण्याची अनेक प्रकरणे समोर येतात. नवीन वर्ष सुरू होण्यास काही दिवस असताना आता हिवाळा जसजसा पुढे जात आहे, तसतसे हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू, आणि अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, वर्षातील इतर ऋतूंपेक्षा हिवाळ्यात ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. अभ्यासास असेही सांगण्यात आले आहे की, ह्रदयविकाराचा झटका आणि ह्रदयाशी संबंधित समस्या या हिवाळ्यात सकाळच्या वेळी खूप जास्त प्रमाणात दिसून येतात.

हेही वाचा : मासिक पाळीदरम्यान खरंच महिलांना विश्रांतीची आवश्यकता आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी सकाळी रक्तदाब वाढतो; ज्यामुळे अनेक लोकांना सकाळी अचानक हृदयविकाराचा झटका येतो. त्याचबरोबर हार्मोन्स संतुलन बिघडते; ज्यामुळे सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. अनेकदा जास्त कॅलरीजयुक्त अन्न खाल्याने किंवा एकाच वेळी जास्त मद्यपान केल्यामुळेसुद्धा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
श्वास घेण्यास त्रास होण्यामुळेसुद्धा ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. हृदयाशी संबंधित रोगांमुळे मेंदू आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात; ज्यामुळे रक्तपुरवठा करताना अडथळा निर्माण होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो.

हिवाळ्यात कोणती काळजी घ्यावी?

हिवाळ्यात भरपूर व्यायाम करणे गरजेचे आहे. थंड वाऱ्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी गरम कपडे घालणे गरजेचे आहे. हिवाळ्यात कान आणि डोके झाकले जाईल, अशी टोपी वापरावी. ज्या लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत, त्यांनी उपचारासाठी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Story img Loader