देशात सध्या हिवाळा सुरु असून कडाक्याची थंडी पडली आहे. या काळात देशभरात विविध राज्यांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. जे लोक हाय कोलेस्ट्रॉल, हाय व लो ब्लड प्रेशर, थिक ब्लड किंवा ब्लड क्लॉटिंगच्या समस्येने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी तर हा धोका आणखी वाढू शकतो. तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का? हिवाळ्यात बाथरुमध्येच सर्वात अधिक हृदय विकाराचा झटका का येतो? याच्यामागचे सर्वात मोठे कारण काय आहे, हे जाणून घेऊया. काही लोक अंघोळ करत असताना एक छोटीशी चूक करतात ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. तसेच केवळ हाय कोलेस्ट्रॉल, हाय व लो ब्लड प्रेशर, थिक ब्लड किंवा ब्लड क्लॉटिंगची समस्या असलेल्यांनाच नाही तर कुणालाही धोका निर्माण होऊ शकता.
अंघोळ करताना या चुका टाळा
अंघोळ करत असताना जर तुम्ही पाणी सर्वात आधी डोक्यावर टाकत असाल तर ही चूक जीवघेणी ठरु शकते. ऋतू कोणताही असू द्या, पण अंघोळ करताना कधीही डोक्यावर पहिले पाणी घेऊ नका. अंघोळ करताना सर्वात आधी पाय, कंबर, मान आणि त्यानंतर सर्वात शेवटी डोक्यावर पाणी घालावे. थेट डोक्यावर थंड पाणी घेतल्यामुळे कैपलेरी वेन्स संकुचित पावण्याचा धोका असतो. ही वेन जर संकुचित पावली तर रक्त प्रवाह विचलित होतो आणि अचानक रक्तदाब (Blood Pressure) वाढतो. थंड पाण्यामुळे डोक्यातील धमण्या संकुचित पाऊन उच्च रक्तदाबामुळे त्या फुटण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो. यामुळेच स्ट्रोक येतो. तर अनेकवेळा हृदयाला रक्त पुरवठा न झाल्यामुळे हृदय विकाराचा झटका येतो.
हे वाचा >> फक्त अंतर्वस्त्र घालून लंडनमध्ये महिला व पुरुषांनी केला प्रवास, कारण ऐकून तुम्हीही डोक्यावर हात माराल
रक्त प्रवाहावर काय फरक पडतो
शरीराचे रक्ताभिसरण हे डोक्याकडून पायाकडे होत असतं. डोक्यावर थंड पाणी अचानक पडल्यानंतर रक्त प्रवाहित करणाऱ्या धमन्या संकुचित पावतात. त्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया संथ होते. यामुळे स्ट्रोक किंवा हृदय विकाराचा धोका अधिक वाढतो. कारण हृदयापर्यंत रक्त व्यवस्थित पोहोचत नाही. यामुळेच बाथरुमध्ये डोक्यावर थेट थंड पाणी ओतू नका.
अंघोळची योग्य पद्धत काय?
भारतातील पारंपरिक पद्धत अंघोळची सर्वात योग्य आणि सुलभ पद्धत आहे. तुम्ही बादली, मग घेऊन अंघोळ करता. त्यामुळे पाण्याचा वापर आपल्या मर्जीनुसार करता येतो. यामुळे शरीराला पाण्याचे तापमानाशी जुळवून घ्यायला मदत होते आणि कोणताही धोका निर्माण होत नाही. पायापासून हळूहळू वरच्या भागात पाणी ओता. सर्वात शेवटी डोक्यावर पाणी घाला. शॉवरने अंघोळ करताना आपण थेट डोक्यावर पाणी घेतो, हे चूक आहे.