आपल्यापैकी अनेक जण सकाळी लवकर उठून व्यायाम करण्यासाठी धडपडत असतो. रात्री उशिरापर्यंत काम करून थकलेले असतानाही सकाळी लवकर उठून मुलांना शाळेत सोडायचे असते, कामावर जायचे असते. त्यामुळे अनेकांना ठरवूनही व्यायामासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी ९०,००० हून अधिक लोकांवर झालेल्या एका अभ्यासानुसार, दुपारच्या वेळी व्यायाम केल्याचे अनेक फायदे होत आहेत. नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, सकाळी किंवा संध्याकाळी घाईघाईने शारीरिक हालचाली करण्यापेक्षा दुपारी व्यायाम केल्याने लवकर मृत्यूचा धोका कमी होतो.

अभ्यासात असे दिसून आले आहे की, दिवसाच्या कोणत्याही वेळी मध्यम ते जोरदार व्यायाम करणे मृत्यू, अगदी हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी व्यायाम न करण्यापेक्षा चांगले आहे. व्यायामाच्या वेळेचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी या अभ्यासाची रचना करण्यात आली नव्हती. आपले शरीर सर्कैडियन रिदमशी जोडलेले असू शकते, जे २४ तासांच्या चक्राचे पालन करणारे शारीरिक, मानसिक आणि वर्तन पद्धती आहेत.

Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Arjun Kapoor confirming breakup with Malaika Arora and told about importance of emotional freedom
मलायका अरोराबरोबर ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितले, भावनिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम

नोएडामधील फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक आणि प्रमुख कार्डिओलॉजीस्ट डॉ. संजीव गेरा यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) दुपारच्या वेळेत जास्त असल्याने आपले शरीर व्यायामाच्या कोणत्याही स्तरांना अधिक अनुकूल बनवते. तसेच दुपारच्या व्यायामामुळे कमी हार्मोनल व्यत्यय आणि सकारात्मक अपचय स्थितीसह सर्कैडियन रिदमवर परिणाम होण्याची शक्यता कमी असते.

दुपारी व्यायाम करणे शरीरासाठी चांगले असते का?

दिवसाच्या कोणत्याही वेळी व्यायाम करणे अजिबात व्यायाम न करण्यापेक्षा चांगले आहे. परंतु दुपारच्या व्यायामामुळे वजन कमी करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम यांसारखे अधिक फायदे मिळू शकतात.

दिवसाच्या कोणत्याही वेळी, विशेषत: दुपारच्या वेळी कोणत्याही स्वरूपात व्यायाम केल्यास वजन कमी होणे, रक्ताभिसरणक्षमता वाढवणे, साखरेचे प्रमाण आणि कोलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासह हृदयाचे आरोग्य सुधारते. कामावर असताना व्यायामानंतर तणावाची पातळी कमी केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.

व्यायाम करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

व्यायामासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करणे. पण आपला बीएमआर दुपारच्या वेळेत जास्त असल्याने आपले शरीर व्यायामाच्या कोणत्याही पातळीला अधिक अनुकूल बनते. दुपार किंवा संध्याकाळी व्यायाम केल्याने कमी हार्मोनल व्यत्यय आणि सकारात्मक कॅटाबोलिक स्थितीसह सर्कैडियन लयीवर परिणाम होण्याची शक्यता कमी असते.

हेही वाचा – डायजेस्टिव्ह बिस्किट ठरतायत धोकादायक? डॉक्टरांनी सांगितले, परफेक्ट ब्लड शुगरसाठी नाश्ता कसा असावा? रोज …

व्यायामाच्या वेळेचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो?

अनेक अभ्यासांनी व्यायामाच्या वेळेचा सामान्य आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ९०,००० व्यक्तींवर नुकत्याच झालेल्या एका मोठ्या अभ्यासात असा निष्कर्ष समोर आला आहे की, दुपारच्या जेवणाच्या वेळेत व्यायाम केल्याने हृदयविकाराचा झटका किंवा झोपेचा त्रास होण्याची शक्यता कमी होते आणि आयुष्य वाढते. सकाळी व्यायाम केल्यामुळे वजन लवकर कमी होते आणि स्नायूंची ताकद कमी होते. तर संध्याकाळी उशिरापर्यंत व्यायाम केल्याने सर्कैडियन रिदममध्ये अडथळा येऊ शकतो. पण अजिबात व्यायाम न करण्यापेक्षा व्यायाम करणे हे नेहमी चांगले आहे.

दुपारच्या व्यायामाचा सर्वाधिक फायदा कोणाला होऊ शकतो?

वृद्ध, लठ्ठपणा आणि आधीपासून हृदयविकार असलेल्या व्यक्ती आणि नाइट शिफ्टर्सना याचा सर्वाधिक फायदा होतो. याचे कारण म्हणजे ते सकाळच्या तुलनेत दुपारी जास्त उत्साही असतात.

पुरुष आणि स्त्रियांसाठी वेळ भिन्न आहे का?

व्यायामाच्या वेळेबाबत पुरुष आणि स्त्रिया यांच्यात कोणतेही मोठे फरक नाहीत, परंतु एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, स्त्रिया सकाळी व्यायाम करताना पुरुषांपेक्षा जास्त फॅट बर्न करतात, याचे कारण म्हणजे हार्मोनल वातावरणातील फरक असू शकतो.

दुपारच्या जेवणानंतर किती तासांनी व्यायाम करता येतो?

जेवणानंतर व्यायाम करण्याची सर्वोत्तम वेळ व्यायामाची तीव्रता, जेवणाची रचना आणि अन्नाला मिळणारा हार्मोनल प्रतिसाद यावर अवलंबून असते. डॉक्टरांच्या शिफारशींनुसार, व्यायामाची चांगली वेळ म्हणजे जेवणानंतर किमान दोन तासांनंतर असली पाहिजे, तर नाश्त्यानंतर किमान एक तास अशी आहे.