आपल्या देशामध्ये वाहतुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जलवाहतूक, रस्ते वाहतूक व हवाई वाहतूक. विमान वाहतूक ही देशांतर्गत अणि देशाच्या बाहेर असणारी वाहतूक आहे. विमान चालवणारे पायलट हे असंख्य प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत असतात. तसेच त्यांना स्वत:च्या आरोग्याला निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचाही सामना करावा लागतो. पायलटला कामादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याची आणि अचानक हृदयाची हालचाल बंद पडल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. खूप वेळ आणि हवेत जास्त उंचीवर काम केल्यामुळे पायलटच्या हृदयावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हवेचा दाब कमी होणे, डिहायड्रेशन, शारीरिक व मानसिक तणाव यांमुळे हृदयावरील ताण वाढतो. मात्र, सुरक्षित उड्डाणासाठी उड्डाणाची तयारी, काही तपासण्या आवश्यक आहेत. शेवटी उड्डाणामुळे हृदयाची गती वाढते.
दीर्घ कालावधीसाठी किंवा बराच वेळ प्रवास केल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या प्रणालीवर मोठ्या प्रमाणात ताण पडू शकतो. दीर्घ काळ असणारा ताण, अनियमित असणारी झोप व खूप उंचीवर असणे या सर्व कारणांमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.पण, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की, नियमितपणे शारीरिक तपासणी करणाऱ्या पायलट्सना हवेतच हृदयविकाराचा झटका कसा काय येऊ शकतो? याचे कारण म्हणजे नेव्हिगेशन आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी या कारणांमुळे त्यांना बहुतांशी उच्च पातळीच्या तणावाचा सामना करावा लागतो. वारंवार येणाऱ्या तणावामुळे रक्तदाब व हृदयाची गती वाढू शकते; ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त दाब पडतो. अनियमित कामाचे तास, पुरेशी झोप नसणे यांच्याशी ताण जोडला जातो, तेव्हा हृदयाचे स्नायू आणि उच्च रक्तदाबाशी संबंधित ताण वाढतो. तसेच उंचीवर असताना हृदयाची अनियमित गती, डीप वेन थ्रोम्बोसिस (DVT) व पल्मोनरी थ्रोम्बोइम्बोलिझम (PTE) यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित समस्यांचा धोका वाढतो. उच्च तणाव आणि जास्त उंचीवर काम करण्यासंबंधित घटकांमुळे हृदयाच्या सामान्य गतीवर परिणाम होऊ शकतो.
याबाबत नोएडा येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, मेट्रो हॉस्पिटल्स अँड हार्ट इन्स्टिट्यूटच्या वरिष्ठ कन्सल्टंट डॉ. ग्यांती सिंग यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती दिली. त्या म्हणाल्या की, माझे अनेक रुग्ण मला विचारतात, ”दीर्घ काळ तणाव आणि लांब अंतराच्या उड्डाणांमध्ये उंचीवर असल्याने हृदयाचा झटका किंवा हृदयाची गती अचानक थांबू शकते का? खासकरून जेव्हा पहिल्यापासून ज्यांना आधीपासूनच हृदयाशी संबंधित काही आजार असतात तेव्हा? ९० टक्के ऑक्सिजन पातळी असणारे किंवा मॉडरेट हार्ट फेल्युअर असणाऱ्या रुग्णांना ऑन-बोर्ड मेडिकल ऑक्सिजन पुरवठ्याची आवश्यकता असू शकते. ज्यांना हार्ट फेल्युअरचा त्रास आहे, त्या लोकांनी उड्डाण करणे टाळावे.”
मग प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत?
हृदयाची नियमित तपासणी : हृदयाची नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित काही धोका असल्यास तो ओळखण्यास मदत मिळू शकते.
दैनंदिन व्यवस्थापन : नियमित व्यायाम करणे, संतुलित आहार व तणाव कमी करणारे काही उपाय करून जीवनशैली निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे.
पुरेशी झोप : हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पुरेशी आणि नियमित झोपे घेणे आवश्यक आहे.
कामाच्या तासांची मर्यादा : दररोज किती तास काम करावे याचे नियोजन करावे आणि पुरेसा आराम मिळेल हे पाहावे. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.
वारंवार उड्डाण करणाऱ्यांनी काय केले पाहिजे? कारण- पायलट्सना अनोख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. एकसारखे हवेत उंचावर प्रवास करण्यामुळे त्यांना हृदयाशी संबंधित चिंतांपासून सुटका मिळत नाही. खूप कालावधीसाठी प्रवास करणे, वेळेत होत असणारा बदल आणि हवाई प्रवासाचा असणारा ताण हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. वारंवार उड्डाण करणाऱ्यांनी हायड्रेशन, फ्लाईटदरम्यान असणारी हालचाल यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
ज्यांना पहिल्यापासूनच हृदयाशी संबंधित काही आजार आहे आणि जे वारंवार लांब पल्ल्याचा प्रवास करतात अशा व्यक्तींना प्रवासादरम्यान स्वत:ची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अनेक गोष्टी मदत करू शकतात. लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाणाऱ्यांनी सर्वांत आधी वैद्यकीय सल्ला घ्यावा. वैद्यकीय सल्ला हा त्या व्यक्तीच्या विशिष्ट स्थिती आणि गरजेच्या आधारावर दिला जातो. तसेच स्वत:च्या औषधांचे योग्य वेळापत्रक असणे महत्त्वाचे असते. प्रवाशांनी आपल्या सामानामध्ये प्रवासामध्ये कायम आपली औषधे बरोबर ठेवावीत.
हेही वाचा : Weight Gain and Cashews : काजू खाल्ल्यामुळे वजन वाढते का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात …
प्रवासादरम्यान पाणी पिऊन हायड्रेट राहिल्याने डिहायड्रेशन होण्यापासून संरक्षण होते. तसेच विमान प्रवासात केबिनमध्ये थोडी हालचाल करणे, थोडासा स्ट्रेचेबल व्यायाम केल्याने रक्ताच्या गाठी होण्यापासून आणि डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT)चा धोका कमी होतो. कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज परिधान केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यासही मदत होऊ शकते. विमान प्रवासादरम्यान अशी सीट निवडावी की, जिथे शरीराची हालचाल करणे शक्य असेल आणि टॉयलेटपर्यंत तुम्हाला सहज जाता येईल. त्याशिवाय कॅफीन, अल्कोहोल व पचनास जड असलेले जेवण करणे टाळावे.