झोप ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून आठ ते नऊ तासांची झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्ही तरुण आहात, तुम्ही नेहमी ॲक्टिव्ह असता. त्यामुळे तुम्हाला आठ-नऊ तास झोपेची आवश्यकता नाही. त्याऐवजी तुम्ही पाच ते सहा तासांची झोप घेतली तरी तुमचे आरोग्य चांगल्या स्थितीमध्ये राहू शकते. तर असे वाटते हा तुमचा मोठा गैरसमज आहे. त्याचप्रमाणे एखाद्या रात्री प्रकल्पाचे सादरीकरणासाठी बराच वेळ काम करणे किंवा एखाद्या रात्री उशिरापर्यंत पार्टी करणे अपवाद म्हणून कधीतरी चालू शकते; असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण- त्यामुळे तुमचा झोपेचा कालावधी कमी होतो; ज्यामुळे हृदयाची गती आणि रक्तदाबावर विपरीत परिणाम होतो. हा परिणाम सहजासहजी पुन्हा बदलता येत नाही, असे एका अभ्यासात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यूएसमधील पेन स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी १५ निरोगी पुरुषांच्या ११ दिवसांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. त्या अभ्यासादरम्यान या पुरुषांना पाच रात्र कमी झोप मिळाली होती आणि झोप पूर्ण करण्यासाठी त्यांनी दोन रात्री पुरेशी आणि शांत विश्रांती घेतली होती. ”झोप पूर्ण करण्यासाठी दोन रात्री शांत झोप घेतली तरी जागरणामुळे वाढलेला रक्तदाब आणि हृदयाच्या गतीवरील परिणाम कमी करता येत नाही”, असे दिसून आले. हे निष्कर्ष ‘सायकोसोमॅटिक मेडिसिन’मध्ये प्रकाशित झाले आहेत.

हेही वाचा – आता लघवीच्या चाचणीद्वारे हृदयविकाराचा लावता येणार अंदाज! लवकर उपचार घेणे शक्य

”हा अभ्यास मर्यादित संख्येच्या निरोगी पुरुषांवर आणि कमी कालावधीचा असला तरी त्याचे परिणाम असे दर्शवतात की, पाच दिवसांची कमी झोपदेखील हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते,” असे चंदिगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER), प्रगत कार्डियाक सेंटर, कार्डिओलॉजी विभागाचे प्रा. (डॉ.) राजेश विजयवर्गीय यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले आहे.

”काही हार्मोन्स फक्त रात्रीच्या झोपेदरम्यान शरीरातून बाहेर सोडले जातात. झोपेच्या कमतरतेमुळे त्यांचे बिघडलेले कार्य दैनंदिन नुकसानीशी संबंधित आहे; ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदय गती, वजन वाढणे व इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते”, असे हृदयरोग तज्ज्ञ स्पष्ट करतात.

हेही वाचा – काळी मिरी वापरा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा, हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी कसे करावे सेवन? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

मग आपण रोज कमी झोपण्यामुळे होणारे नुकसान का बदलू शकत नाही?

याबाबत मोहाली येथील आयव्हीवाय हॉस्पिटलच्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आणि थोरॅसिक सर्जरी विभागाचे संचालक डॉ. वीरेंद्र सरवाल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती दिली. ते स्पष्ट करतात, “तर्क साधा आहे. दिवसभरात शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आठ तासांची झोप आवश्यक आहे. ही झोप हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी मदत करते. तसेच ती दिवसातील १६ तासांदरम्यान शरीराची होणारी झीज भरून काढण्यासही मदत करते. कारण- आपण आजकाल पाहत आहोत की, झोपेच्या कमतरतेमुळे शरीराची झीज होते आणि हृदयाच्या समस्या निर्माण होतात. झोप पूर्ण करण्यासाठी आठवड्याच्या शेवटी जरी आपण पुरेशी विश्रांती घेतली तरी त्याचा फायदा शरीराला होत नाही. कारण- त्यामुळे शरीराची रोज होणारी झीज भरून येत नाही आणि शेवटी मृत्यू होईपर्यंत हृदयाचे नुकसान होतच राहते. त्यावर उपाय म्हणजे शरीराला दररोज बरे होऊ देणे हे साधे तत्त्व आहे. कारण- शरीरात उरलेला दाह (Residual Inflammation) हा रक्तदाब, हृदय गती व शरीराच्या ऊतींमध्ये ऑक्सिजनला नुकसान पोहोचवू शकतो; जे दोन्ही हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart health and blood pressure study finds why even six hours of sleep or weekend catch up sleep may not be enough snk
Show comments