High environmental temperatures can be dangerous to your body : एप्रिल महिन्यापासूनचं तीव्र उष्णतेच्या झळा सहन कराव्यात लागत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ दिसून येत आहे. संपूर्ण उत्तर भारतात तापमान ४० अंशांवर जाऊन पोहचले आहे. येत्या दोन दिवसांत तापमानात ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यात महाराष्ट्रातही तापमानात सतत वाढ होतेय. सळाकी ८ वाजता सूर्याची किरणे तीव्र होऊ लागली आहेत. यामुळे काही दिवस राज्यात कडक ऊन सहन करावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
यात महाराष्ट्रात दोन तीन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात उष्माघातामुळे जवळपास १३ लोकांचा मृत्यू झाला तर १८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे उष्माघाताची समस्या गंभीर बनत आहे. यामुळे उष्माघातासंबंधीत अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. यात अति उष्णतेची मर्यादा काय आहे जी आपण सहन करु शकतो? असा प्रश्न सतत उपस्थित होत आहे.
कधीकधी उष्णता इतकी वाढते की शरीराला सहन होत नाही. वाढत्या उष्णतेमुळे शरीराची स्थिती बदलू लागते आणि बिघडू लागते. यावेळी शरीराकडे लक्ष देण्याची खूप गरज असते. अशा परिस्थितीत तीव्र उष्णतेत आपले शरीर कसे प्रतिक्रिया देत यासह अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ .
हीट स्ट्रेस म्हणजे काय?
वाढत्या तापमानाचा मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलताना डॉक्टर आणि संशोधक अनेकदा ‘हीट स्ट्रेस’ हा शब्द वापरतात. हीट स्ट्रेसबाबत डॉक्टर सांगतात की, ‘जेव्हा आपले शरीर अति उष्णतेमध्ये असते, तेव्हा ते त्याचे मूळ तापमान नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते. वातावरण आणि शारीरिक परिस्थितीनुसार, शरीर आपले कोर तापमान राखण्याचा प्रयत्न करते, यामुळे थकवा जाणवू लागतो.
हीट स्ट्रेसची लक्षणे कोणती?
हीट स्ट्रेसच्या लक्षणांबाबत बोलायचे झाल्यास, उष्णतेचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला तर शरीराला त्रास होतो. वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये त्याचा परिणाम वेगवेगळा असला, तरी सामान्यतः दिसणार्या लक्षणांमध्ये पारा ४० ते ४२ अंशांवर गेल्यास डोकेदुखी, उलट्या, शरीरात पाण्याची कमतरता अशी लक्षणे जाणवतात, जर पारा ४५ अंश असेल तर कमी रक्तदाबामुळे बेशुध्द पडणे, चक्कर येणे किंवा अस्वस्थता येणे आणि ब्लड प्रेशची समस्या जाणवते.
जर आपण ४८ ते ५० अंश तापमानात दीर्घकाळ राहिलो तर काय होईल?
जर तुम्ही ४८ ते ५० अंश किंवा त्यापेक्षा जास्त काळ तापमानात राहिल्यास, स्नायू पूर्णपणे अनियंत्रित होतात आणि मृत्यू देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला किंवा आजारी व्यक्ती लवकर बळी पडू शकतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
मनुष्य किती कमाल तापमानापर्यंत जगू शकतो?
जास्तीत जास्त तापमान किती तापमान मनुष्य जगू शकतो याचे अचूकपणे देता येत नाही. कारण आपल्या पृथ्वीवर निरनिराळ्या प्रकारचे हवामान आहे आणि शरीर देखील भिन्न क्षमतांनी युक्त आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकेल असा कोणताही अभ्यास आजपर्यंत नाही. पण ४० ते ४५ अंश सेल्सिअस तापमानानंतर सामान्य स्थिती असलेल्या प्रत्येक व्यक्तीने सावध आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
शरीर आणि उष्णता यांची केमिस्ट्री नेमकी काय
मानवी शरीराचे सामान्य तापमान ९८.४ अंश फॅरेनहाइट किंवा ३७.५ ते ३८.३ अंश सेल्सिअस असते. याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला ३८ किंवा ४० डिग्री सेल्सिअस तापमानात उष्णता जाणवत नाही. खरं तर, हे शरीराचे मुख्य तापमान आहे. म्हणजेच, त्वचेच्या पातळीवर कमी तापमान देखील जाणवू शकते.
आपल्याला हवेत जास्त उष्णता असल्याचे कसे जाणवते?
हे घडते कारण हवा उष्णता वाहक नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, तुम्ही तापमानाची तुलना तुमच्या शरीराच्या संपर्कात येणाऱ्या वातावरणाशी करता. जेव्हा तुमचे शरीर हवेच्या संपर्कात येते तेव्हा हवेचे तापमान तुमच्या शरीरात हस्तांतरित केले जाते, परंतु तुमच्या शरीराचे तापमान हवेत हस्तांतरित होत नाही कारण हवा ही उष्णता वाहक नाही. पण पाणी आहे. जेव्हा आपण पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा आपल्या शरीराचे तापमान पाण्यात हस्तांतरित केले जाते. यामुळेच ४५ किंवा ५० डिग्री सेल्सिअस तापमान असलेले पाणी तुम्हाला त्याच तापमानाच्या हवेइतके गरम वाटत नाही.
तापमान वाढते तेव्हा शरीर कसे प्रतिक्रिया देते?
वैद्यकीय संशोधनानुसार, जेव्हा तापमान वाढते तेव्हा शरीर विशिष्ट पॅटर्नमध्ये प्रतिक्रिया देते. शरीराचा ७० टक्क्यांहून अधिक भाग पाण्याने बनलेला असतो. म्हणजेच, वाढत्या तापमानात शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील पाणी उष्णतेशी लढते. घाम येणे या प्रक्रियेचा एक भाग आहे. पण जर शरीर या प्रक्रियेत जास्त काळ राहिल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.
तापमान वाढल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात?
पाण्याची कमतरता होताच प्रत्येक शरीर त्याच्या परिणामानुसार प्रतिक्रिया देते. काहींना चक्कर येऊ शकते, काहींना डोके दुखू शकते आणि काहीजण बेशुद्ध होऊ शकतात. खरं तर, पाण्याच्या कमतरतेमुळे श्वासोच्छवासाच्या संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हृदय आणि फुफ्फुसावर अधिक दबाव येतो. त्याचा रक्तदाबावरही परिणाम होणे स्वाभाविक आहे.
रक्तप्रवाहामुळे मेंदूवर सर्वाधिक परिणाम होतो. म्हणूनच डोकेदुखीची समस्या हे सहसा पहिले लक्षण असते. डॉक्टर मायग्रेनच्या रुग्णांना उष्णतेत जाण्यापासून टाळण्याचा सल्ला देतात. या परिणामांनंतर होणारे सर्वात वाईट म्हणजे उष्माघात. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, उष्माघाताने गंभीरपणे प्रभावित झालेले २८ टक्के लोक उपचार असूनही एका वर्षाच्या आत मरण पावले.
उष्ण तापमानात सुरक्षित कसे राहाल?
१) शरीर हायड्रेटेड ठेवा.
२) उन्हात जाणं टाळा.
३) चहा, कॉफीचं सेवन टाळा.
४) मसालेदार अन्न खाणे टाळा.
५) मांसाहारापासून दूर रहा.