Is Heating Honey Good or Bad : लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांना मध खायला आवडते. मधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मधामध्ये अँटिबायोटिक आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. असं म्हणतात की मध कधीही गरम करू नये, कारण गरम केल्याने मध विषारी बनते. खरंच मध गरम केल्यानंतर विषारी होते?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याविषयी लेखक कृष अशोक यांनी त्यांच्या इन्स्टग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते सांगतात की, मध गरम केल्यामुळे विषारी किंवा हानिकारक होत नाही. कृश पुढे सांगतात की, ” आजच्या काळात कच्चे, शुद्ध नसलेले मध धोकादायक ठरू शकते. कच्च्या मधापासून अनेकदा लहान मुलांना त्रास सहन करावा लागल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे.”

ते पुढे सांगतात, ” पाश्चराइज्ड मध विकत घ्या आणि हवे तसे वापरा. जर तुम्ही जंगलातील कच्चे मध वापरत असाल तर लक्षात ठेवा, हे मध गरम केल्याने यातील सर्व पोषक घटक आणि एन्झाइम नष्ट होतात. मधामध्ये सर्व पोषक घटक आणि एन्झाइम हे फुलांपासून येतात. हे फूल नंतर फळ आणि भाजीपाल्यामध्ये रुपातंरीत होतात. आपण भाजीपाला शिजवतो, मग ते विषारी बनत नाही तर मध गरम केल्यावर कसं काय विषारी बनू शकते.”

हेही वाचा : जेवताना टीव्ही पाहता का? लगेच थांबवा; तज्ज्ञांनी सांगितलेले दुष्परिणाम जाणून घ्या

या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. अहमदाबाद येथील झायडस हॉस्पिटलच्या प्रमुख आहारतज्ज्ञ श्रुती भारद्वाज यांनी मध गरम करणे चांगले की वाईट या विषयी सविस्तर माहिती सांगितली.

आहारतज्ज्ञ श्रुती भारद्वाज सांगतात, “मध गरम केल्यानंतर इतर घटकांबरोबर त्याचे सेवन करणे सोपे आहे, पण मधातील फायदेशीर एन्झाइम्स, अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक कमी होऊ शकतात, ज्यामुळे मधाचे पौष्टिक मूल्य घसरू शकते.”

त्या पुढे सांगतात, “कच्चे मध हे नैसर्गिक असते, त्यामुळे त्यात अधिक पौष्टिक गुणधर्म आढळतात. मध अगदी कमी गरम करा, जे बेकिंग किंवा सॉस बनवताना कामी येऊ शकते. मध गरम करावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, पण तुम्हाला मधाचे नैसर्गिक फायदे टिकवून ठेवायचे असेल तर कधीही कच्चे मध सेवन करणे चांगले आहे.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heating honey is good for eating read what expert told should we heat honey or not ndj
Show comments