सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी उंची हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. कमी उंचीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय लहान मुलाची उंची वयानुसार योग्य प्रमाणात वाढत नसेल तर पालकांना त्याचं खूप टेन्शन येतं. यासाठी ते मुलांची उंची वाढवण्याठी अनेक उपचार करत असतात. वेगवेगळ्या डॉक्टरांचे सल्लेही घेतात. मात्र, उंची वाढण्यासाठी इतर उपचारांपेक्षा सर्वात महत्वाचा असतो तो मुलांचा आहार, कारण चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली यांचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असतो. कारण सध्याच्या मुलांमध्ये मोबाईलचा वापर वाढल्यामुळे ती खाण्यापिण्यासह खेळण्याकडेही दुर्लक्ष करतात.
आजकालची लहान मुलं तर हातात मोबाईल नसेल तर जेवण करणंही टाळतात. त्यामुळे पालकांनाही त्यांच्या हातात मोबाईल द्यावा लागतो. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणे आणि जेवणाच्या नावाखाली केवळ जंक फूड खाण्यामुळे मुलांच्या आहारात आवश्यक त्या पोषक तत्वांची कमतरता भासते, ज्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो.
हेही वाचा- दर अर्ध्या तासाने ५ मिनिटे चालणं आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर; जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात
मुलांच्या चुकीचा आहारामुळे त्यांच्या शरीराची वाढ खुंटते. मुलांच्या कमी उंचीमुळे बहुतेक पालक त्रस्त असतात. मुलांची वयानुसार उंची न वाढवणे ही पालकांची सर्वात मोठी समस्या आहे. हेल्थलाइनच्या मते, मानवी शरीराच्या वाढीसाठी हार्मोन म्हणजेच एचजीएचचे महत्वाचे योगदान आहे. पिट्यूटरी ग्रंथीमधून एचजीएच सोडले जाते, ज्यामुळे आपली उंची वाढते. तर आहारात प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वांची कमतरतेमुळे मुलांची शारीरिक वाढ खुंटते.
डॉ.राणा चंचल (फेलोशिप मँचेस्टर) यांच्या मते मुलांची उंची वाढवण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेच आहे. आहारात काही प्रभावी पदार्थांचा समावेश करून मुलांच्या शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. मुलांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, ज्यामुळे मुलांची उंची वाढेल याबाबतची माहिती जाणून घेऊया.
हेही वाचा- काकडी खाल्याने खरंच सर्दी होते ? हिवाळ्यात काकडी खाणे कितपत योग्य? जाणून घ्या
दूध –
मुलांच्या आहारात दुधाचा समावेशा प्रामुख्याने करायला हवा. दूध हा कॅल्शियमचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. ज्यामुळे मुलांची हाडे मजबूत होतात. मुलांना रोज दूध दिल्याने त्यांच्या शरीराचा विकास झपाट्याने होईल आणि त्यांची उंचीही वाढेल.
दही आणि पनीर –
हेही वाचा- वजन कमी करायचंय पण सतत भूक लागते? ‘हे’ ५ सुपरफूड खाल्ल्याने भूक आणि लठ्ठपणा नियंत्रणात ठेवता येईल
दह्यामध्ये दुधाचे गुणधर्म असतातच शिवाय त्यामध्ये प्रोबायोटिक्स देखील असतात जे पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. मुलांच्या आहारात दह्याचा समावेश केल्याने त्यांची पचनक्रिया सुधारू शकते आणि उंची वाढण्यासही मदत होते. दह्यासह मुलांच्या आहारात पनीरचा समावेश करु शकता.
गूळ आणि मध –
गुळ खाल्ल्याने मुलांची उंची वाढते आणि शरीरही मजबूत राहते. साखरेऐवजी गुळाचा वापर करून तुम्ही पाल्याचे आरोग्य सुधारू शकता. मधामध्ये ७२ टक्के पाणी असते आणि उर्वरित कार्बोहायड्रेट असते. यामुळे मुलाचे वजन आणि उंची वाढेल. मध ब्रेडला लावून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता.