side effects of drinking too much lemon: उन्हाळ्यात घराबाहेर पडायचे म्हणजे जीव कासावीस होतो. किमान दहा मिनिटे जरी उन्हांत फिरलो तरी उष्णतेने घामाघूम व्हायला सुरुवात होते. अशावेळी आपण स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी, फळांचा रस, कोल्ड्रिंक्स पिणे पसंत करतो. तर काहीजण उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लिंबू पाण्याचे भरपूर सेवन करतात.त्यामुळे शरीर हायड्रेट राहते. वजनही नियंत्रित ठेवता येते आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते, परंतु तुम्हाला माहित आहे का की लिंबू पाणी पिण्याने तुमच्या आरोग्याचे नुकसानही होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जर तुम्ही उन्हाळ्यात लिंबूपाण्याचे भरपूर सेवन करत असाल किंवा वजन कमी करण्यासाठी अतिप्रमाणात लिंबूपाणी पीत असाल तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम देखील जाणून घेतले पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊया लिंबू सरबतचे अतिप्रमाणात सेवन केल्यानं काय नुकसान होते.

लिंबू पाणी पिण्याचे तोटे –

  • लिंबू पाण्याचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ होऊ शकते. त्याच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. लिंबू पाणी प्यायल्यानेही डिहायड्रेशन होऊ शकते. खरंतर जेव्हा तुम्ही लिंबूपाणी पितात तेव्हा ते लघवीद्वारे शरीराला डिटॉक्स करते. लिंबूपाणी जास्त प्रमाणात पिल्यानं पोटॅशियमची कमतरता देखील होऊ शकते.
  • ‘व्हिटॅमिन सी’चे जास्त सेवन केल्याने रक्तातील लोहाची पातळी जास्त प्रमाणात वाढते आणि हे धोकादायक ठरू शकते. यामुळे अवयवांना इजा होऊ शकते. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने हाडे कमजोर होतात.
  • लिंबूपाणी जास्त प्रमाणात खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी होऊ शकते. लिंबूमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीरातील अ‍ॅसिडचे प्रमाण वाढू शकते. लिंबू हा व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्त्रोत आहे, जर आपल्या शरीरात या पोषक तत्वाची पातळी वाढली तर त्याचा परिणाम अनेक महत्वाच्या अवयवांवर होतो, म्हणून बरेच डॉक्टर देखील मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला देतात.

हेही वाचा – जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करताय का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम

  • जर तुम्हाला टॉन्सिलची समस्या असेल तर लिंबू पाण्याचे सेवन करू नका. एका संशोधनानुसार, लिंबू पाणी जास्त प्रमाणात सेवन केल्यास घसा खवखवणे, खोकला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेकदा लिंबामुळे तोंडाला वास येतो आणि दात स्वच्छ होतात, पण गरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी प्यायल्यास त्यात असलेल्या सायट्रिक ॲसिडमुळे तोंडाच्या ऊतींमध्ये सूज येते.