निरोगी राहण्यासाठी Healthy Life योग्य आहारासोबतच नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. नियमितपणे व्यायाम Exercise केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अलिकडे जिमला जाण्याचा ट्रेन्ड फारच वाढलेला बघायला मिळतो. सकाळी लवकर केलेला व्यायाम करणे अधिक आरामदायी असते, परंतु इतर कोणत्याही वेळी केलेला व्यायाम आरामदायी प्रकारात येत नाही. सकाळची वेळ कार्डिओसाठी योग्य असते. एखादी गोष्ट पूर्ण केल्यावर तुम्हाला मिळालेली प्रेरणा तुमच्या दिवसाला किकस्टार्ट करण्यासाठी पुरेशी आहे. हे आपल्याला ऊर्जावान बनवते.
धाप लागणं किंवा श्वासोच्छवास अतिशय वेगाने होणे ही समस्या हल्ली अगदी सामान्य झाली आहे. वयस्कर लोकच नाही तर तरुण मुलं सुद्धा अलिकडे या समस्येमुळे त्रस्त झालेली पाहायला मिळतात. अनेकांना रनिंग करताना धाप लागते किंवा लवकर थकवा जाणवतो. या कारणाने ते जास्त रनिंगही करू शकत नाहीत आणि ना कार्डिओ एक्सरसाइज करू शकतं. ही समस्या अलिकडे तरूणांमध्येही अधिक बघायला मिळते.
(हे ही वाचा : दूध की अंडी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर काय? एकत्र खाल्ल्याने शरीरावर काही वाईट परिणाम होतो का? )
वर्कआउट करताना अनेकदा आपण श्वासोच्छवासाच्या पद्धतीकडे लक्ष देत नाही. कोणताही व्यायाम करताना, श्वासोच्छवास योग्य प्रकारे कसा घ्यावा हे सर्वात महत्वाचे आहे. धावण्यामुळे तुमच्या स्नायू आणि श्वसन प्रणालीतून तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि सतत हालचाल करण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असते. अशा स्थितीत धावत असताना नीट श्वास घेणे खूप गरजेचे आहे. अनेकजण पळताना किंवा चालताना नाकातून श्वास घेतात आणि तोंडातून श्वास सोडतात. मात्र, धावताना आपल्याला अधिक ऑक्सिजनची गरज असते.
काही लोक धावायला घाबरतात कारण धावताना जास्त धाप लागते. असे तर रनिंग करताना धाप लागणे सामान्य गोष्ट आहे, कारण त्यावेळी हार्ट वेगाने पम्प होते आणि बॉडीची ऑक्सीजनची आवश्यकता वाढते. धावताना श्वास भरून येण्याची समस्या होणे ही सामान्य बाब आहे. पण जेव्हा त्रास अधिक वाढतो तेव्हा ही समस्या गंभीर होऊ शकते.
(हे ही वाचा : महिलांनो PCOS चा त्रास होतो? मग कोणता आहार घेतला तर फायदा होईल? स्त्रीरोग तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला येईल कामी! )
व्यायाम करताना दम लागू नये यासाठी करा ‘हे’ उपाय
तज्ज्ञ सांगतात, एक्सरसाईज करताना श्वास घेण्याचा पॅटर्न योग्य असायला हवा. तुम्ही नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा.
बहुतांश लोक रनिंग करताना जास्त श्वास घेण्याच्या नादात तोंडाने श्वास घेण्यास सुरूवात करतात. ज्यामुळे लवकर थकवा येतो. यासाठी नेहमी नाकाने श्वास घेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेण्याच्या दरम्यान नेहमी लक्षात ठेवा की खोल आणि दिर्घ श्वास घ्या, जेणेकरून ब्रिथिंगची प्रक्रिया योग्य प्रकारे चालू शकेल आणि लवकर थकणार नाही.
जेव्हा तुम्ही चालता किंवा धावता तेव्हा तुमचा फॉर्म योग्य असणे खूप महत्वाचे आहे. या दरम्यान, तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा. पुढे पहा आणि अधिक क्षमतेने श्वास घेण्यासाठी तुमचे खांदे मोकळे करा. नीट श्वास घ्या. जर तुम्ही हळू धावत असाल तर तुम्ही तुमच्या नाकातून श्वास घेऊ शकता.
लवकर लवकर कमी श्वास घेतल्याने तुम्हाला लवकर थकवा येतो. या कारणाने जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही ऑक्सिजन योग्य प्रकारे घेऊ शकता आणि कार्बन डायऑक्साइड योग्य प्रकारे बाहेर सोडू शकता. त्यामुळे श्वास घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान नेहमी हे लक्षात ठेवा की, मोठा आणि लांब श्वास घ्या.