“गाय किंवा म्हशीचे तूप विसरून जा, कारण आता नवीन प्रकारे शेळीच्या दुधाचे तूप बनवले जात आहे आणि ते पोषणाच्या बाबतीत एक शक्तिशाली स्त्रोत म्हणून ओळखले जाते. हे तूप बी१२, ई आणि डीसारखे जीवनसत्त्वे आणि ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिडने समृद्ध आहे,” असे आहारतज्ज्ञ डॉ. अर्चना बत्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
त्या सांगतात, शेळीच्या दुधाच्या तुपाचा आहारात समावेश केल्यास निरोगी पद्धतीने चयापचय (metabolism ) राखण्यास मदत होते आणि त्यातील आवश्यक पोषक घटक, जसे की फॅटी अॅसिड, पोषणातील कमतरता भरून काढतात आणि चयापचय नियंत्रित करतात.
तसेच त्यात असलेले मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम आणि जस्त यांसारखी खनिजे आहारातील कमतरता दूर करण्यास मदत करतात. “१०० ग्रॅम शेळीच्या दुधाच्या तुपात ९०० किलो कॅलरीज, ९९ ग्रॅम निरोगी फॅट्स असतात जी संतृप्त, मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सच्या स्वरूपात असू शकतात; २५० मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल; जीवनसत्त्वे डी, ई आणि के आणि ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड असतात,” असे डॉ. अर्चना सांगतात.

शेळीच्या तुपाचे फायदे (goat milk ghee Benefits)

शेळीच्या तुपात समृद्ध प्रोबायोटिक्स असतात, जे पचन सुधारतात आणि पचन समस्या टाळतात. “त्याचे हलके आणि पचण्याजोगे स्वरूप मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांसाठी योग्य आहे,” असे डॉ. अर्चना बत्रा सांगतात.

त्यात कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जे हाडे मजबूत करण्यास आणि स्नायूंच्या वाढीस मदत करतात. “हे मुलांना आणि प्रौढांना स्नायूंचे वस्तुमान आणि हाडांची घनता राखण्यास मदत करते,” असे डॉ. बत्रा म्हणाल्या.

हे तूप मज्जासंस्था आणि पचनसंस्थेला आधार देण्यासाठी सर्व वयोगटांसाठी फायदेशीर आहे. “त्याचे पोषकतत्त्वांनी समृद्ध गुणधर्म सर्व वयोगटातील लोकांमध्ये एकूण आरोग्य आणि चैतन्य यासाठी आहारातील पूरक आहार प्रदान करतात,”असे डॉ. बत्रा सांगतात.

शेळीच्या तुपात चांगले कोलेस्ट्रॉल आणि प्रथिने असतात, जे रोगांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात. ते शरीराच्या संरक्षण यंत्रणेला चालना देते.

शेळीच्या तुपातील चांगले फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी मदत करतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी आणि संज्ञानात्मक (जसे की विचार करणे, तर्क करणे, लक्षात ठेवणे, कल्पना करणे, शब्द शिकणे आणि भाषा वापरणे) आरोग्य संतुलित होते, असे डॉ. बत्रा यांनी नमूद केले.

शेळीच्या दुधाचे तूप, गायीचे तूप आणि म्हशीचे तूप यांची तुलना (Comparison between goat milk ghee, cow ghee, and buffalo ghee)

म्हशीच्या तुपात फॅट्सचे प्रमाण जास्त असते, तर शेळी आणि गायीच्या तुपात मध्यम प्रमाणात फॅट्स असते.
शेळीच्या दुधाच्या तुपात जीवनसत्त्वे अ आणि डचे प्रमाण जास्त असते, तर गाय आणि म्हशीच्या तुपात ते कमी असते.

शेळीच्या दुधाचे तूप पचन, आतड्यांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी सर्वोत्तम असते, तर गायीचे तूप एकूण आरोग्यासाठी सर्वोत्तम असते आणि म्हशीचे तूप वजन वाढवण्यासाठी आणि शक्तीसाठी सर्वोत्तम असते.

शेळीचे तूप कोणासाठी फायदेशीर आहे?

डॉ. बत्रा यांच्या मते, सर्व वयोगटातील लोक विविध आरोग्य फायद्यांसाठी शेळीच्या दूधाचे तुपाचे घेऊ शकतात.

“शेळीचे दूध हे प्राण्यांपासून बनवलेले उत्पादन मानले जाते आणि पॅलियो आहार(फळे, भाज्या, पातळ मांस, मासे, अंडी, काजू आणि बिया) घेणारे लोक ते सेवन करू शकतात, कारण ते लॅक्टोज-मुक्त आहे. कमी दुधाचे उत्पादन असल्याने ते गाय आणि म्हशीच्या तुपाच्या तुलनेत जास्त महाग आहे. शेळीच्या दुधाच्या तुपाची किंमत सरासरी १,५००-३,००० प्रति किलो आहे, जी शुद्धता आणि ब्रँडवर अवलंबून असते, त्या तुलनेत गायीच्या तुपाची किंमत ६०० रुपये आणि म्हशीच्या तुपाची किंमत ७५० रुपये आहे,” असे डॉ. बत्रा सांगतात.