How many teaspoons of salt should you eat daily?: मीठ आवश्यक असले तरी त्याचे हानिकारक परिणाम टाळण्यासाठी संयम राखणे महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने तात्काळ अस्वस्थता आणि दीर्घकालीन आरोग्याचे गंभीर धोके दोन्ही होऊ शकतात. जसे की, उच्च रक्तदाबापासून ते मूत्रपिंडाचे नुकसान आणि कर्करोगाचा धोका वाढणे. आरोग्यसेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत केल्याने तुमच्या सोडियमच्या गरजा पूर्ण करणारा आहार तयार करण्यास मदत होऊ शकते आणि त्याचबरोबर तुमचे आरोग्यदेखील सुरक्षित राहू शकते. मीठ शरीरात द्रवपदार्थांचे संतुलन, स्नायूंचे कार्य आणि मज्जातंतूंचे सिग्नलिंग नियंत्रित करण्यास मदत करून महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने गंभीर आरोग्य धोके उद्भवू शकतात, ज्यामुळे दररोज प्रमाणात मिठाचे सेवन करणे फायदेशीर आहे. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार-अंतर्गत औषध डॉ. राकेश गुप्ता यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

आपण किती मीठ सेवन करावे?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, प्रौढांनी दररोज पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ सेवन केले पाहिजे, जे सुमारे २,००० मिलीग्रॅम सोडियम इतके आहे. दररोज १,५००-२,३०० मिलीग्रॅम सोडियम सेवन करण्याची ते शिफारस करतात. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याने उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि स्ट्रोक टाळण्यास मदत होते, जे जास्त मीठ सेवनाशी जवळून जोडलेले आहेत.

जास्त मीठ सेवनाचे परिणाम काय आहेत?

जेव्हा तुम्ही शिफारसीपेक्षा जास्त मीठ सेवन करता तेव्हा शरीरावर नेमका काय परिणाम होतो? तेव्हा फरीदाबाद येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या इंटरनल मेडिसिन आणि रूमेटोलॉजीचे संचालक डॉ. जयंत ठाकुरिया यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

तहान वाढणे : जास्त मीठ तुमच्या शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडवते, ज्यामुळे निर्जलीकरण होते आणि संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी सारखी तहान लागते.

पाणी साठणे : तुमचे मूत्रपिंड सोडियम पातळी संतुलित करण्याचे काम करतात, ज्यामुळे द्रव साठणे आणि पोटफुगी होते. या जास्त द्रवामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये सूज येऊ शकते.

ब्लड प्रेशरमध्ये तात्पुरती वाढ : अतिरिक्त सोडियम तुमच्या रक्तप्रवाहात पाणी ओढते, ज्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते आणि परिणामी तुमचा रक्तदाब वाढतो.

दीर्घकालीन आरोग्य धोके कोणते आहेत?

डॉ. ठाकुरिया आणि गुप्ता दोघेही सहमत आहेत की, दीर्घकाळ जास्त मीठ सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

उच्च रक्तदाब : सतत जास्त मीठ सेवन केल्याने दीर्घकालीन उच्च रक्तदाब होऊ शकतो, जो हृदयरोग आणि स्ट्रोकसाठी एक प्रमुख कारण आहे. डॉ. राकेश गुप्ता यांनी अधोरेखित केले की, जास्त मिठाच्या सेवनानं हृदयावर परिणाम होऊ शकतो.

किडनीचे नुकसान : मिठाच्या जास्त सेवनानं मूत्रपिंडाचा आजार होऊ शकतो किंवा स्थिती आणखी बिघडू शकते.

हाडांचे आरोग्य : उच्च सोडियम पातळीमुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो.

पोटाच्या कर्करोगाचा वाढता धोका : अभ्यासकांनी असे म्हटले आहे की, जास्त मीठ असलेल्या आहारामुळे पोटाच्या अस्तरावर होणाऱ्या हानिकारक परिणामांमुळे पोटाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

मीठ आवश्यक असले तरी त्याचे हानिकारक परिणाम टाळण्यासाठी संयम राखणे महत्त्वाचे आहे. मिठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तात्काळ अस्वस्थता आणि दीर्घकालीन आरोग्याचे गंभीर धोके दोन्ही होऊ शकतात, जसे की उच्च रक्तदाबापासून ते मूत्रपिंडाचे नुकसान आणि कर्करोगाचा धोका वाढणे. आरोग्यसेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत केल्याने तुमच्या सोडियमच्या गरजा पूर्ण करणारा आहार तयार करण्यास मदत होऊ शकते आणि त्याचबरोबर तुमचे आरोग्यदेखील सुरक्षित राहू शकते.