प्रेम ही आनंदाची भावना आहे. जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा आपल्या शरीरात काही आश्चर्यकारक बदल होतात. जणू आपलं शरीरही आनंद साजरा करीत आहे, असं वाटतं. प्रेमात पडल्यानंतर आपण आनंदी, उत्साही असतो आणि समोरच्या व्यक्तीशी जोडले गेलो आहोत, असे वाटते. आपलं हृदय वेगानं धडधडतं आणि आपण अधिक दीर्घ श्वास घेतो. हे शारीरिक बदल तुम्ही प्रेमात पडला असण्याच्या नैसर्गिक प्रतिक्रिया आहेत. म्हणून प्रेमात पडणं ही केवळ एक भावना नाही; तर तो एक संपूर्ण शारीरिक अनुभव आहे. त्यामुळे आपल्याला आपण जिवंत आणि आनंदी असल्यासारखं वाटतं.

दॅट कल्चर किंग या संस्थेच्या मानसशास्त्रज्ञ गुरलीन बरुआ यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितलं, “हृदयाचा अनेकदा प्रेमाशी संबंध जोडला जातो. असं असलं तरी प्रत्यक्षात मेंदूच बहुतेक बदल घडवून आणतो. आपला मेंदू डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन यांसारखी रसायनं सोडतो; ज्यामुळे आपण आनंदी, उत्साही असतो.”

What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
heeramandi fame actress sanjeeda shaikh opens up on woman groped her
“माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “या घटनेमुळे…”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Sai Tamhankar on divorce party with Ex Husband
“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…
Meta AI in whatsapp
Meta AI in WhatsApp: आता AI थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर; वाट्टेल ते विचारा, ते सगळं सांगेल! वाचा नेमकं वापरायचं कसं?
School Student Funny Marathi Love Letter Viral
PHOTO: “प्रिय आकाश तु मला प्रपोज केलं” शाळेतल्या मुलांचं ‘लव्ह लेटर’ व्हायरल; वाचून पोट धरुन हसाल
sai tamhankar bus incident
“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग

“मेंदूतून सोडल्या जाणाऱ्या रसायनांमुळे विविध शारीरिक आणि मानसिक परिणाम होतात” असंही त्यांनी सांगितलं. “जेव्हा आपण प्रेमात असतो, तेव्हा एखाद्याला जास्त आनंद जाणवतो आणि वेदना कमी जाणवतात. एखाद्याची जोडीदाराशी जवळीक साधण्याची इच्छा वाढते. या रासायनिक बदलांव्यतिरिक्त प्रेम हे शारीरिक संवेदनांमधूनही प्रकट होतं. या शारीरिक संवेदना म्हणजे आपल्या शरीरात हलकेपणा जाणवतो. एकंदर आनंदाची भावना जाणवते. त्याशिवाय मिठी मारणे आणि चुंबन घेणे यांसारख्या शारीरिक जवळीक निर्माण करणाऱ्या कृती केल्यास शरीरात ऑक्सिटोसिनचे उत्सर्जन होते; ज्याला ‘लव्ह हार्मोन’ म्हणून ओळखले जाते. हे लव्ह हार्मोन विश्वास, मानसिक शांतता व सुरक्षितता या भावनांना प्रोत्साहन देते”, असं त्यांनी अधिक स्पष्ट करताना सांगितलं.

what happens to the body when you fall in love

हेही वाचा – हिना खानला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर; ब्रेस्ट कॅन्सर तपासणीसाठी किती लवकर जाणे आवश्यक? कोणती चाचणी करावी?

जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा न्यूरोट्रान्समीटर आणि हार्मोन्स आपल्या भावना आणि वर्तनांवर कसा परिणाम करतात?

बरुआ सांगतात, “जेव्हा आपण प्रेमात असतो, तेव्हा डोपामाइन, ऑक्सिटोसिन व सेरोटोनिन यांसारखे न्यूरोट्रान्समीटर आणि हार्मोन्स आपल्या भावना आणि वर्तनांना आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. “डोपामाइन ज्याला बऱ्याचदा ‘फील-गुड’ न्यूरोट्रान्समीटर म्हटले जाते. जेव्हा ते आपल्या मेंदूमध्ये सोडले जाते, तेव्हा आपला मूड सुधारतो आणि आपल्याला अधिक आनंद जाणवतो. डोपामाइनची ही वाढ आपल्याला जीवनाबद्दल आपल्याला अधिक उत्साही, प्रेरित होण्यास मदत करते. जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा आपल्याला काय हवे आहे यावर अधिक लक्ष केंद्रित करतो. आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित होतो. नवीन गोष्टी करून पाहण्यास आपण उत्सुक असतो.”

ऑक्सिटोसिन; ज्याला ‘लव्ह हार्मोन’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आपल्या जोडीदाराबरोबर अधिक जवळचे नाते तयार करण्यास आणि अधिक जोडले जाण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच हे नातेसंबंधात विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करते. ऑक्सिटोसिन हे एकमेकांना मिठी मारणे आणि शारीरिक जवळीक यांसारख्या वर्तनांनादेखील प्रोत्साहन देते; ज्यामुळे जोडीदारांमधील नातं आणखी घट्ट होतं.

बरुआ सांगतात, “सेरोटोनिन मूड सुधारण्याशी संबंधित आणखी एक न्यूरोट्रान्समीटर आहे. जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा आनंद, समाधान व भावनिक स्थिरतेच्या भावनांना हातभार लागतो. हे चिंता आणि तणावाच्या भावना दूर करण्यास आणि मन शांत करण्यासाठी मदत करते. परिणामी, आपण आपल्या मानसिक आरोग्यामध्ये एकंदरीत सुधारणा अनुभवू शकतो.”

what happens to the body when you fall in love

हेही वाचा – कोंब आलेले बटाटे खाताय? थांबा, असे करण्यापूर्वी बटाट्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घ्या

प्रेमात पडण्याचे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम

बरुआ सांगतात, “प्रेमात असण्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही परिणामांसह दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. सकारात्मक बाजू पाहता, प्रेमात असणे भावनिक समाधान वाढवते. जेव्हा आपला जोडीदार आपल्याला समजून घेतो, आपल्यावर प्रेम करतो तेव्हा सकारात्मक भावना निर्माण होतात आणि ऑक्सिटोसिन व एंडोर्फिन यांसारख्या चांगल्या ‘फील-गुड’ हार्मोन्समध्ये वाढ होते. स्वीकृती आणि आपलेपणाची ही भावना तणाव कमी करते आणि मानसिक आरोग्य सुधारते. त्यामुळे एकूण आनंदात वाढ होण्यास मदत मिळते.

त्याशिवाय बरुआ सांगतात, “प्रेमसंबंधात राहिल्याने आपल्याला एक आश्वासक वातावरण मिळते जिथे आपण आपले विचार, भावना आणि अनुभव मोकळेपणाने शेअर करू शकतो. प्रेमळ जोडीदाराचा सहवास आणि भावनिक आधार मिळाल्याने आपल्याला अधिक निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य अनुभवण्यास मदत होऊ शकते.”

बरुआ सांगतात “हे मान्य करणे आवश्यक आहे की, प्रेमात असण्याचे दुष्परिणामदेखील असू शकतात. बरुआ यांनी जोर देऊन सांगितले, “कधी कधी प्रेमाशी संबंधित तीव्र भावना आपल्याला गोष्टी स्पष्टपणे पाहण्यास अक्षम करू शकतात आणि नातेसंबंधातील धोक्यांकडे (जोडीदाराच्या चुकीच्या वर्तनाकडे) आपण दुर्लक्ष करू शकतो. म्हणून प्रेमात असतानादेखील आपल्या नातेसंबंधांबाबत जागरूक आणि स्वत:ला संतुलित राखणं महत्त्वाचं आहे.”

“काही प्रकरणांमध्ये आंधळेपणाने प्रेम करीत राहिल्यानं नकारात्मक परिणाम होऊ शकतात. जसे की, जोडीदारावर अवलंबून राहणं, मित्र आणि कुटुंबापासून वेगळं राहणं किंवा टॉक्सिक (त्रासदायक) नातेसंबंधात राहणं. त्यामुळे प्रेमाच्या सकारात्मक व नकारात्मक पैलूंमध्ये समतोल राखणं आणि नातेसंबंधांचं मूल्यमापन हे सुनिश्चित करणं आवश्यक आहे”, असं बरुआ नमूद करतात.