जमिनीवर झोपणे ही विविध संस्कृती आणि परंपरांमध्ये रूजलेली एक प्रथा आहे. बहुतेकदा असे मानले जाते की, “ते शरीराची स्थिती, पाठीचा कणा आणि एकूणच आरोग्याच्या कल्याणासाठी फायदेशीर ठरते. आधुनिक जगात गाद्यांवर झोपणे आरामादायी वाटते असले तरी सध्या लोक साधी, निरोगी जीवनशैली शोधत असल्याने जमिनीवर झोपण्याला पसंती देत आहेत. जमिनीवर झोपल्याने शरीराला त्याच्या नैसर्गिक स्थितीत आराम मिळतो.”

पण जेव्हा तुम्ही तुमच्या बेडच्या जागी दोन आठवडे थेट फरशीवर किंवा जमिनीवर झोपता तेव्हा नेमके काय होते?

शारीरिक बदल (Physical changes)

पब्लिक हेल्थ इंटलेक्चुअल डॉ. जगदीश हिरेमठ द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगतात, “जमिनीवर झोपल्याने तुमच्या मणक्यावर परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या शरीरावर दबाव येऊ शकतो. जमिनीमुळे तुमच्या खालच्या पाठीच्या नैसर्गिक वक्रतेला आधार मिळू शकत नाही.”

गुड डीड क्लिनिकचे संचालक आणि वरिष्ठ सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रिल चुघ पुढे सांगतात, “काही लोकांसाठी, विशेषतः ज्यांना मऊ गादीमुळे पाठदुखीचा त्रास होतो, त्यांच्यासाठी जमिनीवर झोपणे फायदेशीर ठरू शकते. कठीण पृष्ठभाग पाठीचा कणा सरळ ठेवतो, ज्यामुळे अस्वस्थता कमी होते. पण त्याचा तोटा असा आहे की, गादी नसल्यामुळे कंबर आणि गुडघे यांसारख्या संवेदनशील भागात वेदना होऊ शकतात.”

झोपेच्या गुणवत्तेवर आणि कालावधीवर परिणाम (Impact on sleep quality and duration)

“चांगली झोप अनेक गोष्टींवर अवलंबून असते: विश्रांती, ताण कमी करणे आणि झोपेचे चक्र सुरळीत राहणे. मऊ गादीपेक्षा जमिनीवर झोपल्याने शरीराच्या काही भागांवर जास्त दबाव येऊ शकतो.” अभ्यासांवरून असे दिसून आले आहे की, “जमिनीवर झोपल्याने झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे लोक वारंवार कूस बदलतात, ज्यामुळे गाढ झोपेवर परिणाम होतो आणि शेवटी झोपेची गुणवत्ता कमी होते,” असे डॉ. हिरेमठ सांगतात.

“नॅशनल स्लीप फाउंडेशन (२०११)च्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, “शरीराचे वजन समान रीतीने वितरित करणारी गादी (supportive mattresses) प्रेशर पॉईंट्सवर येणारा ताण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय जास्त काळ शांत झोप येते. कठीण पृष्ठभागावर झोपणाऱ्यांना अस्वस्थतेमुळे झोपेचा कालावधी कमी होऊ शकतो, ज्यामुळे दुसर्‍या दिवशी शरीराला बरे होऊन पुन्हा ऊर्जा मिळवणे आणि त्याच्या संज्ञानात्मक कार्यावर परिणाम होतो.”

ज्या व्यक्तींना जमिनीवर झोपण्याचा फायदा होऊ शकतो किंवा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो (Individuals who might benefit from or be negatively affected by sleeping on the floor)

डॉ. हिरेमठ सांगतात, ज्यांना दीर्घकालीन पाठदुखीचा त्रास आहे त्यांना असे आढळून येईल की, “जमिनीवर झोपल्याने पाठीचा कणा चांगला होतो, विशेषतः जर त्यांची पूर्वीची गादी खूप मऊ असेल तर.

“जर्नल ऑफ बॅक अँड मस्क्युलोस्केलेटल रिहॅबिलिटेशनमध्ये प्रकाशित झालेल्या २०१६ च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, “‘स्लिप डिस्क’ संबंधित पाठदुखी असलेल्या व्यक्तीला जमिनीवर झोपल्याने मणक्याच्या तटस्थ स्थितीला प्रोत्साहन देऊन मदत करू शकते. पण ते नमूद करतात की, “संधिवात, सांधे समस्या किंवा स्नायू शोष असलेल्यांसाठी कठीण पृष्ठभागावर झोपल्याने कंबर आणि खांद्यावर जिथे जास्त दाब असतो, अशा ठिकाणी सांध्यांमध्ये अस्वस्थता जाणवू शकते.

वृद्ध, प्रौढ किंवा ऑस्टियोपोरोसिस असलेल्या व्यक्तींना कठीण पृष्ठभागावर झोपताना हाडांवरील दाबाव वाढू शकतो किंवा सांधे कडक होऊ शकतात. गर्भवती महिला किंवा सांध्यावरील दाब कमी करण्यासाठी जास्त गादीची आवश्यकता असलेल्या लोकांना ही पद्धत त्रासदायक वाटू शकते.

काय करावे आणि काय करू नये?

डॉ. हिरेमठ सल्ला देतात, “ज्यांना जमिनीवर झोपायचे आहे त्यांच्यासाठी विशेषतः कंबर, खांदे आणि पाठीच्या खालच्या भागात प्रेशर पॉईंटवरील ताण कमी करण्यासाठी पातळ चटई किंवा ब्लँकेट वापरावे.”

उशीने डोक्याला आधार दिला पाहिजे आणि मान संरेखित ठेवली पाहिजे. शरीराला जुळवून घेण्यासाठी वेळ हवा आहे, म्हणून कमी वेळेसाठी जमिनीवर झोपण्यापासून सुरुवात करणे मदत करू शकते. झोपण्यापूर्वी आणि नंतर स्ट्रेचिंग व्यायाम समाविष्ट केल्याने लवचिकता राखण्यास आणि कडकपणा कमी करण्यास मदत होऊ शकते.

याव्यतिरिक्त, वैयक्तिक आरोग्य स्थितींचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. ज्यांना आधीच पाठीच्या कण्यातील समस्या किंवा सांध्यातील समस्या आहेत, त्यांनी कोणतेही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Story img Loader