Skipping Breakfast side effects : सकाळी कामाला उशीर होऊ नये म्हणून लोक अनेकदा नाश्ता वगळतात. बऱ्याच वेळा जास्त वेळ झोपण्यासाठी आपण सकाळचा नाश्ता करणे टाळतो. अनेकदा लोकांना असे वाटते की, सकाळचा नाश्ता वगळण्याने कोणतेही विशेष नुकसान होत नाही आणि जरी असे झाले तरी दुपारच्या जेवणात थोडे अधिक खाल्ल्याने आपण ही कमतरता दूर करू शकतो. परंतु, जेव्हा तुम्ही महिनाभर ते सतत वगळले तर काय होते? हे जाणून घेऊयात.

बेंगळुरूमधील फोर्टिस हॉस्पिटल्सच्या सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रणव होन्नावरा श्रीनिवासन यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ating eggs with cholesterol
दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो? बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात होते वाढ? वाचा डॉक्टर काय सांगतात
food and drug interactions
Food And Drug Interactions : औषधे घेण्यापूर्वी किंवा औषधे घेतल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावेत? वाचा, आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ माहिती…
Meal Plan For Winter
Meal Plan For Winter : सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत… थंडीत तुम्ही कसा आहार घेतला पाहिजे? वाचा, ‘ही’ आहारतज्ज्ञांनी दिलेली यादी
Here’s what happens to the body if you have ghee water on an empty stomach daily
Ghee: झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा
What happens to the body when you sleep at 8 PM and wake up at 4 AM? health tips
जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला, तर शरीरावर काय परिणाम होईल? वाचा डॉक्टर काय सांगतात
Eating Guava in winters can improve heart health, reduce blood sugar 8 Health Benefits of Guava Fruit
Guava Fruit Benefits: हिवाळ्यात रोज पेरू खाल्ल्यास काय होते? आश्चर्यकारक फायदे वाचून तुम्हीही रोज पेरू खाल

डॉ. श्रीनिवासन यांनी अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनाचा हवाला दिला आहे, ज्यात सूचित केले आहे की, “नियमित नाश्ता केल्याने पचनाची समस्या नाहीशी होते. याउलट नाश्ता न केल्यानं टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.” याव्यतिरिक्त ते सांगतात की, जर्नल ऑफ न्यूट्रिशनल सायन्समधील एका अभ्यासात असे आढळून आले की, नाश्ता वगळल्याने नंतरच्या काळात (जेवणानंतर) रक्तातील ग्लुकोज आणि इन्सुलिन वाढते आणि त्यामुळे पचनाला त्रास होतो. त्यामुळे महिनाभर सकाळचा नाश्ता न केल्यानं हार्मोनल असंतुलनामुळे ऊर्जेमध्ये चढ-उतार, थकवा यांसारखे परिणाम वाढू शकतात.

स्मरणशक्ती आणि शैक्षणिक कामगिरीवर परिणाम

“फ्रंटियर्स इन ह्यूमन न्यूरोसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले की, सकाळचा नाश्ता न केल्यानं त्याचा परिणाम स्मरणशक्ती आणि शैक्षणिक कामगिरीवर होतो. विशेषत: मुले आणि किशोरवयीन मुलांवर याचा परिणाम होतो. महिनाभर नाश्ता वगळल्याने चिडचिड, चिंता आणि नैराश्याची लक्षणेदेखील वाढतात.

वजन आणि शरीराच्या रचनेत बदल

डॉ. श्रीनिवासन यांचा असा विश्वास आहे की, नाश्ता वगळणे आणि वजन यांच्यातील संबंधांवरील संशोधन गुंतागुंतीचे आणि अनेकदा परस्परविरोधी आहे. “ओबेसिटी रिसर्च अँड क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये प्रकाशित झालेल्या काही अभ्यासानुसार, नाश्ता वगळणे हे वजन वाढण्याशी आणि लठ्ठपणाचा धोका वाढण्याशी संबंधित आहे. तर पुढे डॉक्टर असंही सांगतात की, नाश्ता वगळणे आणि वजन वाढणे यांच्यात कोणताही महत्त्वाचा संबंध आढळला नाही तर काही प्रकरणांमध्ये असेही आढळले की वजन कमी होण्यासही मदत झाली. याचे परिणाम समजून घेण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता असल्याचं ते सांगतात.

हेही वाचा >> Proteins supplements: तुम्हीही दररोज प्रोटीन सप्लिमेंट्स घेता का? जाणून घ्या आरोग्यासाठी किती चांगलं, किती वाईट?

डॉ. श्रीनिवासन म्हणतात, अनेक अभ्यासांनी दीर्घकालीन नाश्ता वगळण्याशी संबंधित संभाव्य दीर्घकालीन आरोग्य धोके ओळखले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत.

१. मेटाबॉलिक सिंड्रोम: अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित मेटा-विश्लेषणात असे आढळून आले की, नाश्ता वगळणे हे मेटाबॉलिक सिंड्रोमच्या उच्च जोखमीशी संबंधित आहे, ज्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.

२. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग : संशोधन असे सूचित करते की, जे लोक नाश्ता वगळतात त्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी घटनांचा धोका जास्त असतो.

३. टाईप 2 मधुमेह : सार्वजनिक आरोग्य पोषणमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासासह अनेक अभ्यासांनी न्याहारी वगळण्याला टाइप 2 मधुमेह होण्याच्या जोखमीशी जोडले आहे. हा अनियमित खाण्याच्या पद्धतींमुळे होणारा परिणाम आहे.

४. पौष्टिक कमतरता : नाश्ता वगळल्याने जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचे अपुरे सेवन होऊ शकते, ज्याचे एकूण आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.

Story img Loader