लहान पिवळ्या बिया म्हणजे मेथी दाणे किंवा fenugreek आपल्या भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. सहसा सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या या मेथीच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहेत. ज्यांना वजन कमी करण्यासाठी लोक मेथीच्या बियांचा वापर जास्त करतात. “वजन कमी करण्यासाठी मेथी हा सर्वोत्तम पदार्थ आहे,” असे आहारतज्ज्ञ मॅक सिंग यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे.

”मेथीच्या बिया उष्ण असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमचे पोट बिघडू शकते. त्यामुळे जर तुम्ही डायबेटीज रुग्ण असाल तर काळजी घ्या आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेथीचे सेवन करा,” अशी चेतावनीदेखील मॅक यांनी दिली आहे.

health benefits of fenugreek seeds
तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
mpsc 1333 post exam
नोकरीची संधी: लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेद्वारे भरती
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
bigg boss marathi dhananjay irina vaibhav and jahnavi visit suraj chavan hometown
दिवाळीनिमित्त सूरजच्या गावी पोहोचले Bigg Boss Marathi 5 मधले ‘हे’ सदस्य! फोटो आला समोर, नेटकरी म्हणाले, “तुमची दोस्ती…”

मेथीचे दाणे आरोग्यासाठी भरपूर फायदे देतात. आहारतज्ज्ञ मॅक यांनी मेथीच्या बियांचे काही फायदे सांगितले आहेत.

  • मेथीमध्ये फायबर, मिनरल्स आणि इतर न्युट्रिशिअंट्स असतात. एक चमचा बियांमध्ये दैनंदिन प्रमाणापैकी २० टक्के लोह, ७ टक्के मँगनीज आणि ५ टक्के मॅग्नेशियम शरीराला मिळते.
  • या बियांमुळे हँगओव्हर कमी होतो आणि पोट भरलेले आहे असे वाटते, ज्यामुळे जास्त अन्न खाल्ले जात नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते. मेथीच्या बियांमध्ये असलेले म्यूसिलेज हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल जळजळ शांत करण्यास मदत करते आणि पोट आणि आतड्यांसंबंधी भिंतींभोवती (intestinal walls) आवरण तयार करते. छातीत होणारी जळजळ आणि ॲसिड रिफ्लक्ससाठी (Acid reflux) हे चांगले आहे असे मानले जाते.
  • मेथीमध्ये आढळणारे सॅपोनिन्स (Saponins) हे फॅट्स असलेल्या पदार्थांमधून मिळणाऱ्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. काही संशोधनानुसार, सॅपोनिन्स शरीराला कमी कोलेस्टेरॉल निर्माण करण्यास मदत करते, विशेषत: एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉल तयार करण्यास मदत करू शकते.
  • मेथीच्या बिया या हायपरग्लाइसेमिक सेटिंग्जअंतर्गत (hyperglycemic settings) होणारा इन्सुलिनचा स्राव (insulin secretion) सुधारू शकते आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवू शकते.

‘तसेच, या बिया महिलांकरिता PCOS किंवा PCODच्या समस्यांसाठी उत्कृष्ट आहेत, ॲनिमियावर उपचार करण्यास मदत करतात, स्तनांमध्ये दुधाचे उत्पादन वाढवतात, मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करतात आणि तसेच कर्करोग टाळण्यास मदत करू शकतात. तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवतात,”असे सिंग सांगतात.

हेही वाचा – भोपळ्याच्या बिया रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात का? जाणून घ्या काय सांगतात पोषणतज्ज्ञ

मेथीच्या वापराबाबत आणखी संशोधनाची आश्यकता

पण, या निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी, योग्य डोस आणि वापराचा कालावधी निश्चित करण्यासाठी आणि इतर संभाव्य आरोग्य फायदे जसे की जळजळ कमी करणे, रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारणे आणि पाचक आरोग्य वाढवणे यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे,” असे नानावटी येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहार आणि पोषण विभाग प्रमुख उषाकिरण सिसोदिया यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

हेही वाचा – पावसाळ्यात ट्रेकिंगचा प्लॅन करताय? ट्रेकिंग करताना काय खावे, काय टाळावे? जाणून घ्या स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात

मेथीचे सेवन कसे करावे?

  • एक-दोन चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजवा. रात्रभर ठेवा.
  • हे शून्य-कॅलरी असलेले डिटॉक्स पेय सकाळी रिकाम्या पोटी प्या.
  • उरलेले मेथी दाणे चावून खा.

Story img Loader